पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशा तर्हेनं ती पहिली भारतीय बहुराष्ट्रीय सल्लागार कंपनी ठरली. १९६२ नंतर या इकॉनचे सर्व परदेशी अधिकारी भारत सोडून गेले व ती पूर्णपणे भारतीयांच्या हातात आली. १९६० च्या दशकात तिची प्रगती चांगली झाली, मात्र १९७० पासून पासून तिला उतरती कळा लागली.
 १९७० ते २००० या तीस वर्षात व्यवस्थापकीय सल्लागार व्यवसायात आमूलाग्र बदल झाले आहेतइतके दिवस केवळ उत्पादन व उत्पादकता यांच्यावर लक्ष केंद्रित कलेल्या या व्यवसायाने या कालावधीत कर्मचारी भरती, कर्मचारी नियुक्ती, सेवाक्षेत्र, व्यावसायिक सर्वेक्षण आणि व्यवस्थापन विकास चर्चासत्र आदी क्षेत्रांमध्ये यशस्वी पदार्पण व प्रगती केली आहेमिनू मसानी व सोली पारूख ही नावं याच काळात सर्वपरिचित झाली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मिनिस्ट्रेटेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया व सरकारने स्थापन केलेल्या उत्पादकताविषयक संस्था यांनीही व्यवस्थापनाच्या शिक्षणाबरोबरच सल्लागाराच्या व्यवसायातही नाव कमावलं आहे.
संगणकाचा उदय : भारतात पहिला संगणक १९६१ मध्ये एस्सो कंपनीनं आणला. तर युनियन काबइड, बाटा, डनलॉप, भारतीय आयुर्विमा महामंडळ आदी संस्थांनी वापर सुरू केला. त्यानंतर संगणक व त्याच्या वापराबद्दल सल्ला देणाच्या सुरुवात झाली. टाटा कन्सल्टन्सी सव्हिंसेस या कंपनीनं सर्वाधिक फायदा सोफ्टवेअर व्यवसायात कमावला. या कंपनीतून बाहेर पडलेल्या डॉ. कनोरिया यांनी डाटामिकस कंपनी स्थापन केली. विसाव्या शतकाच्या अखेरीस संगणक सॉफ्टवेअर व माहिती तत्रज्ञान यांनी व्यवस्थापकीय सल्ला व्यवसायात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. याच कालावधीत एमसीएआय (मॅनेजमेंट कन्सल्टंट असोसिएशन ऑफ इंडिया) ही संस्था उदयास आली.नंतर तिचं नामांतर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टन्टस इन इंडिया असं करण्यात आल.सरकार व उद्योग यांच्यातील दुवा बनण्याचं महत्वााचं काम या संस्थेने केलं. व्यावसायिक प्रशिक्षण व व्यवस्थापकीय सल्लागार होण्यासाठी पात्रता मिळवून देण्याची सुुविधा या संस्थेनं प्राप्त करून दिली. या संस्थेचे विदेशी व्यवस्थापकीय संस्थांशी संबंध भारतातून ‘व्यवस्थापकीय सल्ल्या’ची निर्यात करण्याची संधी भारतीय तज्ज्ञांना मिळाली.

 या सर्व संस्थांची कार्यक्षेत्रे व कार्य करण्याची पध्दत वेगवेगळी असली तरी मूळ तत्व एकच आहे.ते म्हणजे लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या गोष्टीतील साधूप्रमाणे सोपे,अभिनव पण परिणामकारक उपाय शोधून काढून कमीत कमी खर्चात अधिकाधिक वबहुआयामी फायदा उद्योगधंदे तसेच संस्थांना मिळवून देणं, उत्तम व्यवस्थापनाचं गमक तर हेच आहे.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/१४९