पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१५७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शोध असा लागला असं म्हणतात.) ही कथा कदाचित खरी असेल किंवा काल्पनिक. काहीही असलं तरी ‘व्यवस्थापकीय सल्ला कसा असावा याचंं उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्यासाठी ती उपयुक्त आहे. व्यवस्थापकीय सल्ला देण्याच्या व्यवसायाची सुरुवात भारतात तशी प्राचीन काळापासून झाली. राजा-महाराजांच्या दरबारात बुध्दिमान व्यक्ती मंत्री म्हणून सेवारत असत; पण त्यांनाही न सुटणाच्या काही समस्या दरबाराशी संबंधित नसलेल्या स्वतंत्र आणि अनुभवी ज्ञानिजनांच्या सल्ल्याने सोडविल्या जात.

सिध्दनाम् लक्षणम् । साधकानाम् साधनम् ।।


 असं एक संस्कृत वचन आहे. म्हणजेच अनुभवी व्यक्तीची वर्तणूक ही इच्छ मार्गदर्शक ठरते. मात्र, खच्या अर्थाने या व्यवसायाची भरभराट औद्योगिक क्रांतीनंतर झाली. या क्रांतीनंतर या व्यवसायाचं स्वरूपही बदललं. औद्योगिक क्रांती जशी बाहेरून आली, तसं व्यवस्थापकीय सल्लागार व्यवसायाचं आधनिक स्वरूपदेखील बाहेरूनच येथे आलंपण काही पायाभूत तत्त्वं मात्र समानच आहेत.

 १९३७ मध्ये भारतात 'इस्टर्न बेडॉक्स' या नावाने पहिली व्यवस्थापकीय सल्ला एजन्सी सुरू झाली. बेडॉक्स या बेल्जियन तज्ज्ञानं स्थापन केलेल्या या एजन्सीनं भारताता कामगारांच्या क्षमतेचा अभ्यास करून त्यांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठा ‘इन्सेंटिव्ह देण्याची पध्दत सुरू केली. त्या काळी वस्त्रोद्योग जादा कामगारांच्या ओझ्यामुळे तोट्यात जात होता. त्याला या पध्दतीचा मोठा फायदा झाला. अशा तर्हेने सुरुवातीच्या काळात व्यवस्थापकीय सल्लागार कंपन्यांनी कर्मचाच्यांच्या उत्पादनक्षमतेवर लक्ष केंद्रित केले होत. जर्मनीच्या नाझी राजवटीशी संबंध आल्यानं बेडॉक्स यांना १९४३ मध्ये फाशी देण्यु आलं. मात्र त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे कार्य जॉन मूर यांच्या नेतृत्वाखाली 'इन्का (इंडस्ट्रियल अँँड बिझनेस कन्सल्टन्टस्) या नावाने सुरू राहिलं.
इब्कॉन युग :दुसच्या महायुध्दाच्या कालावधीत इकॉननं ब्रिटिश सरकारला युद्ध व्यवस्थापनामध्ये मोलाची मदत केली. इशापूर येथील रायफल कारखाना, लष्करी लेखापालन कार्यालय, लष्करी मालाची रेल्वेमार्फत ने - आण करण येथील बाबतीत ब्रिटिश सरकारला इब्कॉननं सल्ला दिला.
 महायुध्दानंतर इब्कॉनने वस्त्रोद्योगापासून सिमेंट, इंजिनिअरिंग वस्तू, स्थानिक प्रशासन, महापालिका, टाइम्स ऑफ इंडिया, आयकर खात , टिस्को, टेल्को इत्यादि कंपन्यांना सल्ला देण्याचे काम या कंपनीने बरीच वर्षे केलं. इकॉनमधून बाहेर पडलेल्या अनेक तज्ज्ञांनी नंतर स्वतःच्या कंपन्या स्थापन केल्या. बिकन्स,कोबिन इम्देस्को,सिग्मा या प्रसिध्द सल्लागार कंपन्या इकॉनमधूनच तयार झाल्या.

 १९५३ मध्ये इब्कॉननं आंतरराष्ट्रीय कंपनीची स्थापना केली. कंपनीला इराक, मेक्सिको, पनामा, ब्रह्मदेश, श्रीलंका इत्यादी देशांत कामं मिळाली.

उत्तम व्यवस्थापनाचं रहस्य/ १४८