पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१५९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापकीय ‘धर्मांतर’


अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

णूस कितीही मोठा झाला तरी तो पिढ्यान् पिढ्या चालत आलेले संस्कार (कुणी बळजबरी किंवा युक्तीनं विसरायला लावल्याखेरीज) विसरू शकत नाही असं म्हणतात. या संस्कारांचा त्याच्या कार्यपध्दतीवर कळत - नकळत परिणाम होत असतो. उद्योग व्यवसाय व व्यवस्थापन यांच्या बाबबतही असं होत असत.
 पाश्चिमात्य व्यवस्थापनावर चर्च संस्कृती व रोमन कालखंडातील लष्करी यंत्रणा यांचा मोठा प्रभाव आहे.खिश्चन धर्माची स्थापना झाल्यानंतर काही दशकांतच रोमन कॅथॉलिक चर्च संस्था प्रबळ व सस्थिर बनल्या. जगभर खिश्चन धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणं आणि इतर संस्कृतीमधील अधिकाधिक लोकांचं धर्मातर करून आपले धर्माची लोकसंख्या वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट बनलं. याकरिता व्हॅटिकन सर्वोच्च धर्मपीठ ते भारत किंवा आफ्रिकेमधल्या घनदाट जंगलातील दुर्गम खेड्यात धर्मप्रसाराचं काम करणारा पार्टी अशी एक भक्कम साखळी बनविण्यात आली. सर्वोच्च धर्मपीठाच्या अधिपतीनं आदेश द्यायचा आणि तो त्यांच्या अधिकाराखाली काम करणाच्या सर्वांनी प्राणपणाने अंमलात आणावयाचा, अशी एक शिस्तबध्द व रचना तयार करण्यात आली.
 या साखळीमुळे तळागाळात कार्य करणाच्या मिशनऱ्यांच्या कामगिरीची माहिती सर्वोच्च धर्मपीठापर्यत पोहचू लागली आणि अशा मिशनऱ्यांना आर्थिक मदत साधनसामुग्री, संरक्षण व इतर आवश्यक पाठिंबा ‘वरून मिळू लागला. या बळकट संपर्क व्यवस्थेचा परिणाम म्हणून ख्रिश्चन धर्माचा जगभर प्रसार झपाट्यानं झाली.

 इतिहासकाळात पाश्चिमात्य सैन्य यंत्रणाही चर्चच्याच धर्तीवर बनविण्यात आली होती. अधिकाधिक भूमी जिंकून साम्राज्यविस्तार करणं हे रोमन कॅथॉलिक राजाचंं ध्येय होतं. त्याला अनुसरून सन्य यंत्रणा व सैन्यातील अधिकाऱ्यांची उतरंड तयार करण्यात आली होती. 'व्यावसायिक सैन्य' ही मूलतः एक पाश्चिमात्य संकल्पनाच आहे: युद्ध करणं आणि जिंकणं याखेरीज सैनिकांना अन्य व्यवधान नसे. राजाची आणि नव्या जिंकलेल्या प्रदेशाची संस्कृती एक नसेल तर अशा प्रदेशावर फार काळ सत्ता गाजवता

व्यवस्थापकीय धर्मांतर/१५०