पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

श्रेयस्कर आहे. दुसऱ्याचं स्टडी मटेरियल वापरण्यांचा मोह टाळला पाहिजे. दुसऱ्याचं मटेरियल वापरण्यातील महत्त्वाचा तोटा हा की, त्यासंबंधी कुणी प्रश्न विचारला की, परिस्थिती अवघड होते.
प्रशिक्षणार्थाीची आकलनशक्ती :
 कोणत्याही व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाला हजर असणाऱ्या प्रशिक्षणार्थींमध्ये सर्वसाधारणपणे पुढील प्रकारे प्रशिक्षणार्थी असतात.
 १) शिकणारे प्रशिक्षणार्थाी : यांचे प्रमाण साधारणतः २५ टक्के असतं. ते कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकतात. त्यांना शिकण्याची इच्छा असते व हौस असते.ते प्रशिक्षकाला सहकार्य करतात. शंका विचारतात. अशा प्रशिक्षणार्थाींना शिकविणं तुलनेनं सहज असतं.
 २) शंकेखोर प्रशिक्षणार्थी : यांचेही प्रमाण २५ टक्केच असतं. त्यांची नावं प्रशिक्षणार्थींच्या यादीत असतात म्हणून ते आलेले असतात. त्यांना कार्यक्रमात खास रस नसतो. मुद्दाम शंका विचारून प्रशिक्षकाला भंडावून सोडणं, खोचक शेरेबाजी करणं यात ते पराक्रम मानतात. अशांची संख्या जास्त असेल व त्यांना हाताळण्याची हातोटी प्रशिक्षकाकडे नसेल तर कार्यक्रमाचा `फियास्को’ होऊ शकतो.
 ३) स्थितप्रज्ञ प्रशिक्षणार्थाी : सुमारे ५० टक्के प्रशिक्षणार्थाी न्यूट्रल म्हणावेत असे असतात. त्यांना शिकण्यात अधिक उत्साह नसला तरी प्रशिक्षकाला देण्याचीही वृत्ती नसते. प्रशिक्षकाची शैली प्रभावी असेल व शिकविण्याचे मुद्दे मनाला भिडणारे असतील तर हे प्रशिक्षणार्थाी कार्यक्रमात रस घेतात. असे विद्यार्थी समाधानी दिसले तर कार्यक्रम यशस्वी झाला असं समजण्यास काही हरकत नाही.
{{gap}]या सर्व पार्श्वभूमीवर प्रशिक्षकाला आपलं धोरण ठरवायचं असतं. व्यवस्थापन प्रशिक्षण हा एकपात्री नाट्यप्रयोगच असतो. प्रशिक्षण कार्यक्रमाचं यश उदाहरण देऊन विषय त्यांच्या मनावर बिंबविण्याची क्षमता, विविध प्रयोग व साधनांचा उपयोग करून प्रशिक्षणार्थींना कार्यक्रमात गुंतवून ठेवण्याची क्षमता यावर अवलंबून असतं. अर्थात या बाबी आत्मसात करणं सोपं नसतं. प्रशिक्षणाच्या या व्यवसायात अनेक जणांचा वावर असला तरी फार थोडे प्रशिक्षक दीर्घकाळपर्यंत टिकून राहतात. ९० टक्क्यांचा कारभार पहिल्या ३ वर्षांतच आटोपतो. ९ टक्के १० वर्षांपर्यंत टिकाव धरतात. तर केवळ १

टक्का ‘दीर्घायुषी' होतात.

संवाद साधण्याची कला/१३४