पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुसरं करिअर

यस्कर कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवून घेणं सध्याच्या काळात परवडण्यासारखं

नाही. असं करणं म्हणजे संस्थेच्या पैशाचां अपव्यय केल्यासारखं आहे. यामुळं संस्थेचा दुहेरी तोटा होतो. एक, पगाराचा पूर्ण मोबदला संस्थेला देण्याची त्यांची क्षमता नसूनही, ते ज्येष्ठ असल्याने त्यांना पगार मात्र पूर्ण द्यावा लागतो आणि दुसरा, वयपरत्वे त्यांच्या कामाची गती धिमी झाल्याने आर्थिक नुकसान होतं. याचा थेट परिणाम संस्थेच्या, एकंदर नीतिधैर्यावर होत असल्यानं त्यांची उपस्थिती संस्थेच्या हिताला बाधक ठरते.'
 हे उद्गार जुन्या पिढीवर संतापलेल्या एखाद्या 'अँँग्री यंग' कर्मचार्याचे असतील, असं आपल्याला वाटेल, पण तसं नाही. ते आहेत बोस्टन विद्यापीठातील एफ. स्पेन्सर बाल्डविन सुप्रसिध्द अर्थतज्ज्ञाचे. आणि तेही १९११ मधील!
 वयस्कर कर्मचाऱ्यांचंं काय करायचं हा प्रश्न युरोप-अमेरिकेत गेल्या शतकाच्या सुरुवातीपासूनच उद्भवला होता. कारण तेथे औद्योगिक क्रांतीची सुरुवात होऊन अडीचशेहून अधिक वर्षांंचा कालावधी लोटला आहे. भारतात मात्र पाश्चिमात्य धतींचे उद्योग सुरू होऊन सव्वाशे वर्षांही झालेली नाहीत. सहाजिकच येथे ही परिस्थिती गेल्या १५ ते २० वर्षात निर्माण झाली आहे.
 याबाबत अनेक तज्ज्ञांनी भिन्न भिन्न मतं व्यक्त केली आहेत. उपायही सुचविले आहेत. तरीही या नाजूक प्रश्नाचं 'एक घाव दोन तुकडे' असं थेट उत्तर मिळू शकत नाही. याची दोन कारणं आहेत. एक अनेक वर्षे त्यांनी संस्थेला दिलेले योगदान आणि दुसरं, दीर्घकाळाच्या सेवेमुळंं संस्थेशी जुळलेले त्यांचे भावनात्मक संबंध.

 या दोन्ही कारणांचं निराकरण केवळ व्यावहारिक पातळीवरून आणि ‘गरज सरो वैद्य मरो'या (अ)न्यायानं करता येत नाही, याचा अनुभव अनेक संस्थांना आलेला आहे. शिवाय बऱ्याच औद्योगिक संस्थांचे स्वरूप असं असतं की, त्या केवळ तरुणाईच्या सळसळत्या उत्साहावर चालू शकत नाहीत. अनुभवांचीही आवश्यक असते. तो तरुण कर्मचाऱ्यांजवळ असेलच असं नसतं. शिवाय प्रत्येक वयोवृद्ध कर्मचारी कामाच्या

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ १३५