पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१२५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हितगूज (भाग पहिला)

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

वस्थापन’ शस्त्राविषयी आपल्याला माहिती व्हावी याकरिता एक व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून माझ्या स्वतःच्या जीवनात मला कोणते अनुभव आले,सतत विकास पावणाच्या व परिवर्तन होत राहिलेल्या या क्षेत्रात बस्तान बसविताना मला काेणकाेेणत्या स्थित्यंतरांतून जावे लागले आणि एक व्यवस्थापन सल्लागार या नात्याने उद्योग आणि समाज यांच्या संपर्कात येत असताना माझी जडणघडण होत गेली,

याबद्दल आपल्याशी हितगूज करण्याचा विचार आहे.
 आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेने आगेकूच करताना आतापर्यंत झालेल्या प्रवासाचं सिंहावलोकन करणं हा प्रत्येकाचा छंद असतोच. मीही मागे वळून माझ्या गतायुष्याकडे नजर टाकतो, तेव्हा अनेक महत्वपूर्ण प्रसंगांची मला आठवण होते. या प्रसंगांमुळेच मला नवी दृष्टी मिळाली, चिंतन व कार्य यासाठी नवे विषय मिळाले आणि विविध प्रकारच्या मानवी स्वभावांचा जवळून परिचय झाला. यातून माझी व्यावसायिक कारकीर्द फुलत गेली.माझ्या आयुष्यातील अनेक काही 'मैलाचे दगड’ वाचकांनाही मार्गदर्शक ठरू शकतील.
वाचनाची आवड :
 वाचनाची आवड निर्माण होणंं हा माझ्या आयुष्यातील पहिला आणि सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा होता. माझ्या आईवडिलांचं वाचन जबरदस्त होतं. वाचनासाठी हॅण्डबिलापासून विश्वकोशापर्यंत कोणताही विषय त्यांना निषिध्द नसे. त्यांच्या रक्तातील हा गुण आमच्यापर्यंत आपसूकच पोहोचला व आम्हां सहाही भावंडांना वाचनाची गोडी बालपणापासून लागली. महाविद्यालयात जाण्यापूर्वी मी एका वाचनालयात संध्याकाळीकाम करीत असे. तेथील अनेक मराठी पुस्तकांचा फडशा पाडला होता.

 महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर माझे इंग्रजी पुस्तकांचे वाचन प्रचंड वाढलं.त्यामुळे त्या भाषेशी निकटचा परिचय झाला.वाचनाच्या आवडीमुळे माझ्या २० वर्षांच्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात मराठी,इंग्रजी व हिंदी साहित्याचे अंतरंग मला जवळून पाहता आले.या तिन्ही भाषांच्या जगतात मला मुक्तपणे संचार करता

हितगूज (भाग पहिला) /११६