पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१२४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


घ्यायचं बंधन व्यवस्थापकावर पडल्यास त्याचा परिणाम इतर कर्मचाच्यांवर होतो. चालकांचा सगासोयरा असणं ही पात्रता न मानता कामगिरी हाच मापदंड ज्या संस्थेत लावला जातो, तेथे कर्मचाऱ्यांंचंं व्यवस्थापन योग्य तऱ्हेनंं होतं. यासाठी चालकांनी हट्टाग्रही भूमिका सोडणं जरूरीचे ठरतं.

 याखेरीज जात, भाषा, प्रदेश, प्रांत, लिंग अशा ‘कामगिरीबाह्य’ घटकांचा प्रभाव कर्मचाऱ्यांची पारख करताना पडू न देणं हे व्यवस्थापकाचं व चालकाचं कर्तव्य आहे. त्यात कसूर न केल्यास सर्वसाधारण वर्गातील अनेक कर्मचाऱ्यांना कामसू बनविणं शक्य होईल. प्रवासी कर्मचाऱ्यांचा संसर्ग मर्यादित राहील व संस्थेची गाडी फायद्यात चालेल. यासाठी चालक व व्यवस्थापक यांनी मिळून कार्य करणं श्रेयस्कर आहे.

अद्भुतदुनिया व्यवस्थापनाची/११५