परिपूर्ती/वेड लागलेले घर
२
वेड लागलेले घर
भोकाड पसरल्याचा आवाज आला. मी धावतच
गेले. पाहते तो धाकटीला गुडघ्याला लागले होते
आणि ती कळवळून रडत होती. “काय ग? कुठं
लागलं? काय झालं?" “अगं, अशी धावता धावता
खुर्चीवर आपटले!" ‘‘कार्टे, डोळे उघडे
ठेवून चालायला काय झालं होतं? चल वर,
औषध लावते. गुडघ्याला औषध लावण्यापेक्षा
डोळ्यातच औषध घातलं पाहिजे तुमच्या? रोज
दहादा धडपडता- काय दारं अरुंद आहेत, का
घरात अंधार आहे, म्हणून अशी चालता देव
जाणे! माझ्या तोंडाचा पट्टा रोजच्यापेक्षा जोरात
चालला होता. मी चांगलीच कावले होते. गेल्या
दोन तासांत तिघांनी धडपडून लागून घेतले होते.
औषध लावून गौरीचा गुडघा बांधला आणि
तिला बजावले की, “आता अशी आधळ्यानं
चाललीस, तर बघ चांगली सडकून काढीन
औषध वगैरे काही नाही!"
त्या दिवशी कुणाला आणखी लागले
नाही. दुस-या दिवशी धाकटीचा परकर शिवीत
बसले होते तो अंगणातून “बघ ग काय जम्मत
होती. खोलीत येतायेता टेबलाच्या अणकुचीदार कोपळ्यावर आता डोळा
आपटणार असे मला दिसले व मी हातातले काम टाकून "अग, अग..."
म्हणत उठले तो काय चमत्कार! टेबल गहूभर मागे सरकले व गौरी डोळ्याला
न लागता माझ्यासमोर येऊन थडकली. छे! टेबल कसे सरकेल? मला
काहीतरीच भास झाला. थोडक्यात पोरगी बचावली खरी. पण टेबल
सरकल्यासारखे दिसल्यामुळे मी इतकी बावचळले होते की, मला ती काय
सांगत होती ते समजलेच नाही व तिला बोलायचेही मी विसरले.
संध्याकाळची वेळ, खोलीच्या मध्यभागी उभा राहून नंदोबा काहीतरी
शाळेतली हकीकत अगदी रंगात येऊन सांगत होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे
सारी गोष्ट सांगून होत आल्यावर मागे मागे जात दारातून बाहेर पडणार
होता. दाराची एक फळी अर्धवटच उघडी होती व नेहमीप्रमाणेच नंदूचे डोके
धाडकन त्यावर आपटणार होते "नंद्या, नंद्या" म्हणून मी ओरडते आहे तो आपले दार हळूच उघडून भिंतीसरसे झाले व नंदोबा सुखरूप दाराबाहेर पोचले! दार कोणी उघडले म्हणावे तर दाराशी तर कोणीच नव्हते! मग काय दार आपणहूनच बाजूला झाले, मला भ्रम झाला? बाकीच्यांच्याकडे
पाहिले तर काही विशेष झाल्याचे कोणाच्याच चेहऱ्यावर दिसत नव्हते. झाला प्रकार इतका विलक्षणं की मी कोणाजवळ बोललेच नाही- झाली गोष्ट मनात ठेवावी व काय होते ते पाहावे असे ठरवले. पुढचे दोन दिवस मी स्वप्नात तर नाही ना असे मला सारखे वाटत होते. मुलांचे डोके आपटणार एवढ्यात भिंती आत वाकत व त्यांना लागण्याचे टळे; बागेत दगडाला ठेचाळणार तो दगड बाजूला होई खुर्च्या, टेबले, पलंग घडवंच्या
चटदिशी मागे सरकायच्या नाहीतर अंग चोरायच्या दोन दिवसात कोणाला काही लागले नाही
नाही म्हणून मी विचार करू लागले की, घराला व घरातल्या वस्तूंना झाले आहे तरी काय?-घरी कोणी नाहीसे पाहून एकदा सगळ्यांना सांगितलेसुद्धा की, "बाबांनो, तुम्ही मुलांना जपता ते ठीक आहे; पण तुमच्या अशा करण्यानं पोरं दिवसें दिवस जास्तच बेफिकीर राहू लागली आहेत. तुमच्या ह्या-लाडानं त्यांना पुढे पस्तावा करण्याची पाळी येईल." पण काही उपयोग झाला नाही, इतके दिवस बाकीच्या घरांसारखे वागल्यावर इतक्या दिवसांनी एकदस ह्या घराला वेड का लागले? मला आता आठवले. गौरीच्या गुडघ्याला लागले. त्या दिवशी भावजी आले होते. आम्ही चहा घेत असता ताईबाई गाणे गुणगुणत येता-येता हापटल्या. वाटेतल्या स्टुलावर, मी नेहमीप्रमाणे कडाडले. भाऊजींनी उठून ताईला हात धरून-उसी केले त्र-दोन
गोष्टी बोलून खेळायला पाठविले जाणि-नंतर मला एक व्याख्यान ऐकवले "मुलं म्हणजे कशी फुलांसारखी असतात. असं त्यांना सामावलं म्हणजे त्यांचा व्यक्तिविकास थांबतो व त्यांची मनं खुरटी होतात. तू एवढ़ी शिकलेली पण तुला साँटेसोरीली तत्वं काहीच कशी समजत नाहीत त्यांना काही लागायच्या आतच. आपण त्यांच्यापुढची अडचण काढावी." मी म्हटले, "बाबा रे, घरातल्या सगळ्या वस्तू काढूनसुद्धा भागणार नाही..."
"छे! असं बोलू नकोस. अशा बोलण्यानं ती जास्तच धडपडतात व त्यांना न्यूनगंड उत्पन्न होतो." मी भाऊजींशी वाद घातला नाही. ते गेल्यावर थोड्याच वेळाने गौरीला लागले व मी चोप देण्याची धमकी घातली. भाऊजींचे व्याख्यान सबंध घराने तर नाही ना मनावर घेतले? मी एक नि:श्वास टाकून कामाला लागले.
मुलांची बेपर्वाई न आंधळेपणा वाढत होता व सर्व घर त्यांच्या मार्गातून बाजूला सारून त्यांचा मनोविकास करीत होते. गौरी न् मी बागेत उभ्या होतो. इतक्यात समोरून आरोळी आली, “गौरी ग धाव, हा बघ मासा कसा करतोय ते!" गौरी फाटक उघडून रस्ता ओलांडायला धावली. नेहमी ती इकडे तिकडे पाहून जायची, पण आज मात्र तिने एकदम रस्त्यात उडी घातली. रस्त्यातून केवढी मोठी लष्करी मोटार भरधाव येत होती. तिचा कर्कश भोंगा वाजला, ब्रेक दाबून चाके खर्रकन रस्त्यावर वाजली व मी धावत जाऊन जवळजवळ गाडीपुढूनच पोरीला ओढून काढले. तिला घट्ट
हृदय पाखरासारखे पिटपिट करीत होते. तिला शांत केली, समोरच्या चंदूकडे पोचवली व मी धावत घराच्या गच्चीवर गेले. मी पण घाबरले होते,घाबरण्यापेक्षाही मला राग आला होता. मी हंदके देत पण रागानेच घराला वआतील सर्व वस्तूंना सांगितले, ‘पाहिलं तुमच्या लाडाचा काय परिणामझाला तो? सांगितलं नव्हतं मी की, मुलं जास्तच बेफिकीर व निष्काळजी होतील म्हणून? आज तुमच्यामुळे माझी पोरगी हातची जात होती. कसला आला आहे मनोविकास? माझ्या रागावण्यानं ती खुरटतात काय? मूर्ख नाही तर! त्यांची डोकी हापटली तरच शहाणपण येईल, एरवी नाही. आणि जर तुम्ही ह्याउपर ऐकणार नसाल तर साच्या मुलांना बोर्डिगात पाठवीन. मग तुम्हाला मुलांचं हसणं, रडण, भांडण, बोकाळणे, काही ऐकू यायचं नाहीं, "आई ग!" म्हणून एवढ्यात किंचाळणे ऐकू आले. मी खाली धावले तो नंदोबा रडत होता. डोके दारावर आपटून चांगलेच सुजले होते. थोडक्यात बचावला, नाहीतर डोळाच जायचा. ‘स्वैपाकघरात‘चल , हळदीचा ओढा घालते. मी त्याचा हात धरून त्याला नेले.