परिपूर्ती/प्रेमाची रीत

विकिस्रोत कडून


प्रेमाची रीत[संपादन]
'तुला जर माझ्या मुक्याचा इतका

तिटकारा वाटत असेल तर परत नाही हो घेणार!
दुसरी एखादी असती तर तुझ्याशी बोललीसुद्धा
नसती. पण मला तुझ्या न तुझ्या नव-याबद्दल
माया वाटते ना!' म्हातारी का संतापली मला
समजेच ना. माझे लग्न व्हायच्या आधी माझा
नवरा जर्मनीत असताना त्याने जोडलेल्या
माणसांपैकी ती होती. तो तिला आजी म्हणे,
तिने त्याला जर्मन शिकविले. त्याला परदेशात
तिचे घर म्हणजे एक आसराच होता. पुढे मी
जर्मनीत गेल्यावर त्याची बायको म्हणून तिने
एखाद्या आप्ताप्रमाणे माझे स्वागत केले. चार
ठिकाणी हिंडून चांगल्या कुटुंबात मला बिऱ्हाड
बघून दिले. बर्लिनच्या विश्वविद्यालयातील दोन-
चार अध्यापकांना भेटून माझे नाव नोंदविले. मी
जरी कितीही कामात असले तरी पंधरा दिवसांतून
एका शनिवारी संध्याकाळी तिच्याकडे जावयाचे
व जेवून परत यावयाचे किंवा तिच्याकडेच
राहावयाचे असा माझा क्रम असे. आजही मी
नेहमीप्रमाणे घंटा वाजवल्यावर तिने दार उघडून

मोठ्या प्रेमाने माझे स्वागत केले व नंतर संतापाने
१० / परिपूर्ती
 

ती वरील वाक्य बोलली. म्हातारी म्हणजे एक लहानशीशी, नाजुक-साजुक, बाहुलीच होती जणू. तिचे पांढरे शुभ्र केस, गोरा-गोरा वर्ण, किंचित सुरकुतलेले तोंड, तिचा नीटनेटका श्रीमंती पोशाक- मागच्या पिढीचा नमुना म्हणून संग्रहालयात ठेवण्याजोगी होती ती. मी स्नेहभराने तिच्या खांद्यावर हात ठेवला व आश्चर्याने विचारले, “पण आजी, मी केलं तरी काय? तुला रागवायला झालं तरी काय?", म्हणे रागवायला काय झालं? तू आल्या दिवसापासून मी पाहते आहे, तुझा मुका घेतला की तू ताबडतोब गाल पुसून टाकतेस. इतकी का तुला घाण वाटते? का तू ब्राह्मण म्हणून तुला विटाळ होतो?" मी चकित झाले. खरंच का मी गाल पुसून टाकीत होते? मग ही क्रिया अगदी मला नकळत होत असली पाहजे. ‘‘मी जाणूनबुजून नव्हते गं तसं करीत. मी थोडी थांबले व पुढे म्हणाले, “किनी आमच्यात अशा चाल नाही. नकळत अपराध झाला. तुझा अपमान करणे माझ्या स्वप्नातसुद्धा येणार नाही हो! त्यातून तू तर नवण्याची आजी म्हणजे तुला केवढा मान द्यायला पाहिजे!’ म्हातारीचे एवढ्यावर समाधान झालेती चौकस होती व वाचणारीही. हिंदू रीतिरिवाज, नातीगोती, तिला थोडथोडी माहीत होती.आम्ही हातात हात अडकवून घरात जात असताना तिने विचारले, "काय ग, तुझ्या सासूनं तुझा मुका घेतला तर काय करतेस गं?" तिच्या प्रमाने मला हसूच लोटले. मी म्हटले, ‘‘माझी सासू तर मुका घेणार नाहा, पण माझी आईसुद्धा एवढ्या मोठ्या लेकीचा मुका घेणार नाही. आता चकित होण्याची तिची पाळी होती.
 ह्यानंतर काही दिवसांनी मी लाइपज़िगला गेले. तेथे ज्या कुटुंबात माझा नवरा राहिला होता तेथे मी महिनाभर राहावयाची होते. कुटुंबवत्सल घर होते. वृद्ध आईबाप व पाच मुलगे आणि चार मुली असा मोठा परिवार होता. मी गेल्यावर वृद्ध जोडप्याने व मुलींनी माझे मुके घेऊन स्वागत केल.

बाकीच्यांनी सुदैवाने करपीडनावरच भागवले. थोरल्या मुलाचे नुकते लग्न झाले होते व सूनही चार दिवस राहावयास आली होती. रात्री निजायला जाताना तिने सासरच्या प्रत्येक माणसाचा निरोप घेतला. जाताना ‘‘जाते हं, आई- जाते हं, बाबा -" सासु-सासऱ्यांचा मुका घेतला. नंतर आपल्यापेक्षा लहान दिरांचा व नंतर समस्त वन्सं व शेवटी मी . माझे लग्न झाले त्या दिवसाची मला आठवण झाली. माझ्या थोरल्या जाऊबाई सासरच्या मंडळींशी माझी ओळख घालून देत होत्या. ‘ह्या तुझ्या
परिपूर्ती / ११
 

मामेसासूबाई, ह्या तुझ्या मावससासूबाई, हे तुझ्या नवण्याचे मामा, हे काका ह्या वन्सं...’’ अशी एकामागून एक ओळख चालली होती, व मी दरवेळी खाली वाकून नमस्कार करीत आशीर्वाद घेत होते. मनातल्या मनात मी म्हटले, ‘‘इतक्या थोरल्या अनोळखी माणसांचे मुके घेण्यापेक्षा नमस्कार करण बर आहे!
 बर्लिनहून मी अधूनमधून एखाद-दोन दिवस लाइझिगला येत असे, पण सबंध सुटीभर राहावयास अशी जवळजवळ वर्षाने आले. एवढ्या अवधीत रीया (थोरली सून)ला छानसे बाळ झाले होते. मी तर आता अगदी घरचीच झाले होते. आल्याबरोबर म्हटले, “गडे रीया, तुझं बाळ गुलाबी गुलाबी, लठ्ठ-लठ्ठ, मऊ, लुसलुशीत! पाहिले की वाटे. संबंध खावे. मी चटदिशी तान्हुल्याला उचलले, हृदयाशी धरले व पटापट त्याच्या गालाचे मुके घेतले. थोड्या वेळाने मला वाटले, आपले काहीतरी चुकले! सारी मंडळी कशी काही धक्का बसल्यासारखी स्तब्ध होती. रीथाने बाळ माझ्या हातून घेऊन बिछान्यावर ठेवले, व आम्ही खोलीबाहेर पडलो. नेहमीप्रमाणे हसतखिदळत जेवणे झाली. दुपारी मी रीयाला विचारले की, सकाळी माझे काही चुकले की काय? तिने माझा हात धरून स्नेहपूर्ण स्वराने सांगितले, “हे बघ बाई, एखादं बाळ पाहिल्यावर असे मुके घेऊ नयेत. आमच्यात ते बरं समजत नाहीत. आज तू सकाळी आपल्या इथे केलंस तर फारशी हरकत नाही, पण लोकांकडे नको हो असं करूस! लहान मुलं ही फुलांसारखी असतात. त्याच्या प्रकृतीला फार जपावं लागतं. मोठ्या माणसानं आपलं तोंड तान्ह्या मुलांजवळ नेऊ नये, नाहीतर पडस, खोकला, क्षय, इत्यादी संसर्गजन्य रोग त्याला होतील. मी सांगितलं ह्याचा राग नाही ना आला तुला?’’ ‘छेः! छे:! मी हसून म्हटले व मला राग आला नाही ह्याची खात्री पटवण्यासाठी अगदी त्यांच्या पद्धतीने तिच्या लढू गोया गालांचे सशब्द चुंबन घेतले!
 दोन वर्षे तेथे राहून मला वाटले आता पुष्कळच प्रगती झाली आहे. कोणी बायांनी माझा मुका घेतला तर मी गाल पुसून टाकीत नसे. कोणी पुरुषांनी हाताचा मुका घेतला तर तोंड वाईट न करता व लगेच हात न धुता मी तशीच बसन राहात असे . पण मला अजूनही एक आश्चर्याचा धक्का

बसायचा होता. भाझर नवरा विलायतेला आला होता, व आम्ही दोघे मिळून स्वदेशी परत यावयास निघालो होतो त्या वेळची गोष्ट. आम्ही आगगाडीत
१२ / परिपूर्ती
 

तिसऱ्या वर्गाच्या डब्यांत बसलो होतो. गडी पॅरिसमधील एका स्टेशनवर उभी होती व प्लेटफॉर्मवर प्रवासी व स्यनां पोचवायला आलेली मंडळी ह्यांची ऍक गेंद उसळली होती. ओमच्याबरोबरच्या प्रवाशाने माहिती दिली की, ह्या गाडीने खूप तरुण शिपाई लांबच्या वसाहतीला जावयास निघाले आहेत व त्यांना पोचवण्यासाठी फार लांबून कुटुंबातील मंडळी आली आहेत, शिपाई अंगदी पोरसवदाच दिसत होते आणि प्रत्येकाला पोचवायल आईबाप; भावंडे, मम, चुलता, बायको वा प्रेयसी आणि तिची मातापितरे अशी सात-आठ माणसे तरी दिसत होती. पुरुष गंभीरपणे बालत होते; बायका अधूनमधून रडत होत्या, अधूनमधून हसत होत्या; दरं क्षणं दानं क्षणांनी मुके घेणे चालले होते आणि विशेष म्हणजे पुरुष-पुरुषही वारक भेटतात तसे भेदून एकमेकांचे मुझे घेत होते. इतक्यात घंटा झाली. गार्डने हिरवे निशाण दाखवले, आणि लॅटफॉर्मवर निरोप देण्याची एकच गर्दी उसळली. प्रत्येक शिपायांवर त्याच्या सर्व नातेवाईकांनी संशब्द मुकयांचा असा एकदम भडिमार केला की, "ओम्हीं त्या आवाजाने दचकलोच चुंबनाचा ध्वनी कधी एवढा मोठा होऊ शकेल ही कल्पनाहीं तोपर्यंत आम्हाला शिवली नव्हती. आम्हाला जे हसू लोटले ते आवरेंच ना. आमच्या शेजारचे लोक म्हणत असतील की, काय पाषणहृदयी हे पौर्वात्य! असल्या करून प्रसंगी रंडू येण्याऐवजी ते आपले हंसतचे आहेत!
 मी मायदेशी परत आले त थटती थेट माहेरी आले. ओल्याबरोबर वाकून आईच्या पाया पडले. तिच्या डोळ्यातून पुर वाहत होता. माझेही डोळे भरून आले होते. इतक्यात माझे वडील आले. त्यांनाही नमस्कार केला. तो त्यांनी माझे खांदे धरून मला उठवले, माझ्याकडे एकदा नीट पाहिले व मी रडते आहेसे पाहून म्हंटले, "अहो जावई, तुम्हाला वाटल की, ही बया विलायतेला जाऊन शहाणी होईल. मी सांगत नव्हतो ही रादुबई मूर्खच राहणार म्हणून? गेली तशी परत आली!" त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली. भावनेने कुंद झालेले वातावरण कसे एकदम लख्ख झाले. सगळीजण हसली. मला काय हुक्की आली कॉन जाणे, मी आईजवळ जाऊन "हे गं काय?" मी काही बोलायच्या आतच वडील म्हणाले, 'अग हे विलायती चाळे!"

  याहीनंतर काही वर्षे लोटली. आम्ही सर्व भावंडे जमलो होतो. 
परिपूर्ती / १३
 

मधल्या दिवाणखान्यात गप्पांना रंग भरला होता. संध्याकाळचे बेत चालले होते. एक भाऊन् वहिनी सिनेमाला जाणार होती; चवथ्याची बायको बाळंत होती तिला भेटायला तो दवाखान्यात जाणार होता. आम्ही दोघे फिरायला जाणार होतो. वडील जाणार होते पत्ते खेळायला आणि आई जाणार होती देवदर्शनाला. आईच्या मनात गेले दोन दिवस काही तरी खळबळ चालली होती. ती जराशी कुरकुच्या आवाजात बोलता बोलता म्हणाली, "काय अगदी एक दिवस दवाखान्यात भेटायला गेलं नाही तर ह्यांना चालत नाही!" वडील म्हणाले, "अग, जाऊ दे ग, माझ्या गाडीतून जाईल. मी जाईन आज पायीच. थोडे फिरणंही होईल." आई उसळूनच म्हणाली, "हो, आता त्यांची कौतुकं चालली आहेत. काय म्हणे दोघं सिनेमाला जाताहेत! मला कधी एक दिवस बरोबर नाटकाला नेलं नाहीतः दोघं फिरायला जाताहेत! कधी मी विचारलं, 'येता का?' की शिपायाला म्हणता; 'बाईसाहेबांच्या बरोबर जा.' मी बाळंत होत असे तेव्हा कधी दिवस दिवस माझी विचारपूस केली नाहीत, कधी आत येऊन मला पाहिले नाहीत! फार तर उंबरठ्यात उभे राहून दुरूनच 'काय? सर्व ठीक आहे ना?' एवढे विचारायचे." बोलता-बोलता आईचा गळा भरून आला. जन्मभर झालेल्या अवहेलनेच्या आठवणीने तिचे मन भरून आले होते. आम्ही सर्व हा प्रकार पाहून ताबडतोब चुपचाप झालो. पण माझे वडील लगेच म्हणाले, "अग, तुझी ना तरी काय आहे? ह्या पोरांच्या वागण्यानं तुला वाटतं, काय बायकोवर ह्यांचे प्रेम आहे म्हणून! आजकालची सर्वजणं करतात ते ती करतात. मी जर तुझ्याजवळ बसन राहिलो असतो. नाहीतर फिरायला गेलो असतो, तर तूच लोक हसतात म्हणून कुरकुरली असतीस. चार लोकाची रीत तीच आपली ठेवावी लागते. पण मी तर रूढीविरुद्ध वागून माझे प्रेम सिद्ध आहे." आम्ही सर्वजण वडिलांच्या तोंडाकडे पाहू लागलो. शेजारी माझे चुलते बसले होते, त्यांच्याकडे वळून ते म्हणाले, "भाऊ, तू सांग पाहू. तू वहिनीला मारलं आहेस की नाही?" भाऊ म्हणाले, "हो! दोन-चारदा मारली असेल." वडील पुढे म्हणाले, “काय गं, तात्या न दादा तर तुझ्यादेखत बायकांना मारीत होते ना? मी साच्या जन्मात एकदा तरी हात गारला आहे तुझ्यावर? दादा, तात्या, भाऊ, सर्व मला बायल्या म्हणत. मी कधी तुला मारलं नाही. मग चार लोक बायकांच्या पुढे पुढे करतात करणाच्या ह्या मुलांचं बायकांवरील प्रेम अधिक का चार लोकांच्या

चेष्टेला न जुमानता तुला मुळीच न मारणाच्या माझं प्रेम जास्त?" आमच्या हशात आईचे दु:ख कोठच्या कोठे नाहीसे झाले. पण भाऊ एवढ्यावर थोडेच थांबतात! "पण गणू, आम्ही बायकोला मारली म्हणजे आमचे प्रेम नाही असं का तुझं म्हणणं?" “छे:! मी कुठे तसं म्हणतोय? तू तर वहिनीच्या मुठीत होतास, आणि तिला मारली नसतीस तर बरोबरीच्या मुलांत वावरायची सोय नव्हती हे मला कळतं रे! पण ह्या हल्लीच्या पोराना अकलाच नाहीत. आणि त्यांचं पाहन हिला पण काहीतरी सुचतं झाल!"
 आमची बैठक मोडली, व आम्ही फिरावयास निघालो तो प्रेमाचा आणखी एक सनातन रीत मला दिसायची होती. रस्त्यालगतच एक झापड होते. अंगणात बरीच चिलीपिली खेळत होती. त्यातलेच एकजण, असेल चार-पाच वर्षांचे, खेळत-खेळत रस्त्यावर आले. त्याची आई अगणातूनच पाहत होती. इतक्यात एक टांगा आला. मुलाच्या अलीकडे लगाम खचून टांगा थांबला. अंगणातली बाई धावतच पुढे आली. तिने पोराच्या बखोटीला धरून त्याला खस्सदिशी ओढले, दोन-चार रट्टे दिले व म्हटल, "पटकी झाली मेल्याला! कशाला तडफडायला रस्त्यावर गेला होतास रे? आई भवानीची खैर म्हणून वाचलास!"