परिपूर्ती/जन्मांतरीची भेट

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

जन्मांतरीची भेट


गाडी हळूहळू चालली होती. प्रवास आता

अगदी थोडा राहिला होता. घरी घोटाळत
असलेली आमची मने पण हलके हलके नव्या
वातावरणाचा विचार करू लागली होती व डोळे
बाहेरची शोभा पाहात होते. स्टेशन आले
उतरायची एकच धांदल उडाली. आमचे स्वागत
करावयास तलाठी व पटेल आले होते.
स्टेशनच्या बाहेर कुंपणावरून आमची मागच्या
वर्षांची कामकरी मंडळी जोरजोराने ओरडून
आमचे स्वागत करीत होती. महादा आला होता.
वाघजी, वरसंग, षडिया, हिराजी एवढी मंडळी
दिसली. त्यांच्याच शेजारी पोरी पण हसऱ्या
चेहन्याने उभ्या होत्या- मणी, लासू, बब्वो,
सूरज. एवढे कायछोटा भिकला पण
सर्वांच्या पुढे नाचत होता. बर्याच दिवसांनी
आपल्या मित्रांकडे पाहुणे जावे तसे वाटले.
 तशी मंडळी काही आम्ही फारशी नव्हतो.
ह्या कामाचे मुख्य प्रा.सांकळिया, मी, एक
छायाचित्रकारएक भूपर्यवेक्षक (स्वैयर!), एक
सांकळियांचे मदतनीस, एक माझा विद्यार्थी व

मदतनीस, आणि एक स्वैपाकी ऊर्फ महाराज,
20 / परिपूर्ती
 

पण आमचे सामान मात्र डोंगराएवढे होते. आमची कामकरी माणसे गेल्या वर्षाच्या अनुभवाने अगदी तरबेज झाली होती. हां हां म्हणता पाच-पंचवीस जणांनी सामान उचलले. काही गाड्यांवर लादले, काही आम्ही हातात घेतले व बंगल्याच्या वाटेने वाळू तुडवीत चालू लागलो.
 उत्तर गुजरात म्हणजे एक वाळूचा समुद्रच आहेजेथे माणसांचा पायरव फारसा नाही अशा जागी थोडेसे वाळलेले गवत व त्याच्या मुळ्या ह्यामुळे वाळू जरा तरी चिकटून कठीण झालेली असते. पण माणसांच्या पायाखालची वाट आली म्हणजे घोट्यापर्यंत पाय भुसभुशीत वाळूत रूततात. महाराष्ट्रातील कठीण काळी माती किंवा डोंगरांवरील कोळे कातळे ह्यांवर चालायला सरावलेले आमचे पाय ह्या बाळूत चालायला अगदी नाखुष असायचे. पायाखाली मुळी 'स्थिर जमीन लागायचीच नाही. दर पाऊल वायूत बुडालेले वर काढून परत टाकायचे. वहाण पायात असली तर पाऊल वर उचलल्याबरोबर वाळूचे ओथळ खाली वाहायला लागायचे आणि बूट असला तरं दरवेळी बुटात वाळू जमायची थोडा वेळ झाला की, आपला जडजड व्हायचा; नाहीतर बूट काढावा तो आतल्या बाजूने घासून घोट्याची साल गेलेली असायची अर्थात काही दिवसांनी हेही अंगवळणी पडत असे. आणि ह्या वाळूला तर आम्ही रोज शतशः धन्यवाद देत होतो, कारण हिंच्याच मायेच्या पांघरुणाखाली जतन झालेली दहा-पंधरा हजार वर्षांपूर्वीच्या मानवांन संस्कृती आम्हाला गेल्या वर्षी सापडली होती. गेल्या वर्षी दगडाची हत्यारे, खाऊन टाकलेल्या प्राण्यांची हाडे व दात अशा कितीतरी वस्तू आम्हाला मिळाल्या होत्या, व यंदा त्या काळातील माणसेही ह्या वाळूखाली पुरलेली आढळतील ह्या आशेने भोठी सामग्री घेऊन आलो होतो!
 आम्ही बंगल्यावर पोचल्यावर सामानाची लावालाब केली. टिकाव व फावड्याचे दांडे बसवून टिकवांना धार लावण्यासाठी सुतार व लोहारांना बोलावले दुसर्या दिवशी सकाळी खणयला कोण पुरुष येणार,मातीची घमेली टाकायला कोणं पोरी येणारं, वाळूतून सांस्कृतिक अवशेष निवडून काढायला कोणं येणार, वगैरेंची विचारपूस यादी केली. आमच्या कामाचे साहित्य बाहेर काढले. प्रत्येकाने खोलीचा एक-एक कोपरा धरून आपली महिनाभर राहावयाची निजायची जागा मुक़र केली. एकेला

खोलींत चार चारजण (एकेका कोपऱ्यात एक एकजण) होतो. इतके होते तो
परिपूर्ती / २१
 

पाणी "तापले म्हणून एकेकाने जाऊन आघोळ उरकली व संध्याकाळच्या जेवणाचीं वाट पाहांत सोप्यात खुर्च्या टाकून बसलो.ह्याच सुमारास गावातील चार शिष्ट मंडळी भेटावयास आली- एक मास्तर, एक डॉक्टर, एक व्यापारी व इतर दोन-तीनं मंडळी होती. ‘तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्या कुग्रामाला भेट देतात म्हणून आम्हास घन्य वाटतं,' वगैरे औपचारिक बोलणी चालली होती. त्यातला एक बराच म्हातारा होता तो म्हणाला,"अहो, कसंचं कुग्राम आणेि कसंचं शहर घेऊन बसलात! नशीब नेत तशी माणंसं फिरत असतात. ज्याच जिंथ अन्नपाणी तिथं तौ जातो." दुसरी म्हणाला, हे तर खरच आणि मागल्या जन्मीचे लागेबांधे असल्याशिवाय का तुमच्या-आमच्या गाठभेटी होतात?" श्री.सांकळिया सर्वांशी हसून बोलंत होते, आम्ही बाकीची 'स्तब्ध बंडून अधूनमधून माना डोलवीतं होतो. गेल्या वर्षांची परिचित सृष्टी समोर दिसत होती. सूर्य पिवळ्या लखलखंत्या सोनेरी किरणांनी सगळ्या वस्तूंना मुलामा चढवीत होतो. ही किरणात आल्हाददायक चमक होती, पण तीव्रता नव्हती आता सगळीकडे शुद्ध बावनकशी सोन्याच्या रंगात झाडांचे शेंडे घराची छपरे शेते रंगून निघाली होती. समोरच्या तळ्यावर वाऱ्याच्या झुळकीसरशी सोन्याच्या लहरी पसरत होत्या. हळूहळू ह्या शुद्ध सोन्याला लाली चढू लागली. गिनीची भट्टी तापत होती. "हं! पक्षी घरी यायची वेळ झाली: असे मी मनात म्हणते तोच माझ्या उत्सुक कानाना सारस पक्ष्याचा कर्कश पण आर्त स्वरं ऐकू आला व बंगल्यापुढून एक जोडी तळ्याच्या दिशेने गेली. किती खाली उडत होते ते! त्यांचे लाब, राखी, निळसर पंख ताणून पसरले होते, दोन-अडीच फूट लांब पाय मागे लांबवले होतें, तितकीच लांब गोलं मान पुढे लांब चोचीच्या टोकाशीं निमुळती झाली होती मधूनच ते 'कर क्रे' ओरडाचे वे आपल्याजड लांब पंखांची खालीवर हालचाल करायचे. ‘विमान चाललंयं जणू! आमच्यातला एकजण म्हणाला, 'मी मानेनेच नकार दिल.. छै! विमान किती उडाल तरी ह्या जिवंत सौंदर्याची प्रचीती मला कधी आली नाही. विमानांचे सगळे भाग कसे एकमेकांनां घट्ट साधलेले असतात. त्यांचे लांबलंबं पंख कसे कुठच्याही स्थितीत विमानाच्या अंगाशी एकच कोन करूनै ताठ पसरलेले असतांतं. छे: ते उडणं निर्जीव असतं, तो एक मानवी बुद्धीचा उत्कर्षे असतो. पण ही पक्ष्यांची

जोडी! त्यांचे ताठ लांबवलेले मान-पाय-पंख क्षणक्षणाला स्पंदन पावत
२२ / परिपूर्ती
 

असतात व मधेच दोन्ही पंख जडपणे झाप मारतात तेव्हा हा ताठपणा म्हणजे लवचिक जिवंत अवयवांनी इच्छेच्या बळावर धारण केलेले व क्षणिक टिकणारे जड अचल रूप आहे ह्याचा साक्षात्कार होऊन मनात काय आनंदाच्या लाटा पसरतात! ती जोडी मंद घिरट्या मारून तळ्याच्या पाळीला उतरली. उतरताना शरीराचा भार काटकुळ्या पायांवर एकदम पडू नये म्हणून लहान लहान उड्या मारून मग ती स्थिर झाली. नेहमीप्रमाणे "कर्र-कर्र-कर्र" करीत दोघांनी वादविवाद केला व तळ्यात जायचे ठरवल. मग एक-एक पाय उंचावून हळूच तळ्याच्या पाण्यात टाकला. काय नखऱ्यान पावले टाकायची! आपले वस्त्र भिजू नये व पाणी वर उडू नये म्हणून साडा सावरून हळूच पाऊल टाकावे ना, अगदी तसेच. पहिली जोडी पाण्यात शिरते न शिरते तोच इतरही जोड्या "कर्र-क्रे" करीत येऊ लागल्या. त्यात समोरच्या झाडावर मोर "म्यांवो, म्यांवो" म्हणून ओरडू लागले व पक्ष्यांच्या आवाजाने सारे अंतराळ भरून गेले. गेल्या वर्षी लांघणज सोडले तेव्हापासूनचा मधला काळ जणू नाहीसा होऊन, कालच्या पुढचा नवा दिवस मी अनुभवीत होते. असा आमचा छावणीवरील जीवनक्रम सुरू झाला.
 दुसऱ्या दिवशी सकाळी आठाच्या आत जेवणे उरकून आम्ही १ आमची कामकरी मंडळी खणतीच्या जागी निघालो, व सर्वांनी मिळून खपून दुपारच्या मधल्या सुटीपर्यंत यंदाचे खणायचे क्षेत्र आखून, खुंट्या ठाकून निश्चित केले. एक तास विश्रांती घेऊन परत कामाला सुरुवात झाली. म्हातारा हिरोजी सर्वांत वडील, त्याच्याजवळ टिकाव दिला व देवाच नाव घेऊन पहिला घाव मारावयास सांगितला. त्यानेही "जै मा-देवजी म्हणून पाहिले डिखळ घाव मारून काढले. सोळा फूट लांब व सहा फूट रुंद अशा चार फुट आंतरवरच्या दोन क्षेत्रात एकदम सरुवात केली. एका खड्डयावर मी काम पाहत होते, दुसऱ्यावर आमचे प्रमुख होते. दिवस संपता संपता थोडीथोडी दगड्याची हत्यारे सापडू लागली. दुसऱ्या दिवशी परत काम सुरू झाले. गेल्या वर्षीप्रमाणेच खूप अवशेष सापडत होते, व आम्ही सारख त्यांची नोंद करीत होतो. पण माणसाचे अवशेष काही मिळाले नाहीत. पहिला खड्डा खूप खोल गेला. सांस्कृतिक अवशेष संपले म्हणून तो टाकून नव्या खड्यात सुरुवात केली. एक दिवस माझ्या खड्यात उभी असताना मला माझ्या नावाने जोरजोराने हाक ऐकू आल्या.वर आले तो माझे सहकारी जवळजवळ

धावतच येऊन म्हणाले, "चला, चला लवकर; माणसाची कवटी सापडली
परिपूर्ती / २३
 

आहे." मीही उल्हासाने पुढे झाले, व नव्या खड्ड्यात उतरून पाहिले तो पिवळसर, गोल असे काहीसे मातीतून बाहेर डोकावत होते. सर्व कामकऱ्यांना दूर सारून लहान सुरी व दाभण ह्यांचे साह्याने माती हळूहळू उकरली व तो पदार्थ मोकळा केला; तो काय, एक मोठा गुळगुळीत गोटा आढळला! आमची निराशा हसण्याखाली लपवून काम पुढे चालू केले. थोड्या वेळाने मला परत बोलावणे आले. “काय उगीच दगड उकरायला बोलावता कोण जाणे!" असे पुटपुटत मी वर आले तो माझे सहकारी वर खड्याच्या काठाशी पुढ्यात एक मोठे ढेकूळ घेऊन बसलेले दिसले. “पाहा पाहा, आम्ही काय काढलं आहे ते! ह्या वेळेला गोटा म्हणून काढला तो कवटीच निघाली!" मी पाहिले तो खरेच त्या मातीच्या डिखळात रुतलेली ती एक कवटी होती. मी ती पुढ्यात घेऊन सुरी-दाभण-कुंचले ह्यांच्या साह्याने साफ करू लागले, व बाकीची मंडळी माझ्याभोवती गोळा झाली. छावणीत प्रत्येकाची कामे ठरलेली होती. चित्रकार व भूपर्यवेक्षक खड्डयाचे, अवशेषांचे फोटो व चित्रे काढीत आणि नकाशे तयार करीत. आमचे मुख्य सर्वांवर देखरेख करीत, पण मुख्यत्वेकरून ते प्रागैतिहासिक काळातील दगडाच्या हत्यारांचे एक निष्णात संशोधक होते. मी मनुष्याच्या कवट्या व हाडे ह्यांचा मुख्यत्वे अभ्यास केलेली होते. म्हणून माणसाचे हाड दिसले की, माझ्या ताब्यात द्यावयाचे असे ठरलेले होते. एकीकडे.मी कवटी साफ करीत होते व एकीकडे तोंडाने माझ्या सहकाऱ्यांना कवटीचे विशेष सांगत होते. "ही पाहिलीत ना मातीच्या दाबानं कवटीची कशी चिपटी झाली आहे? कवटीच्या निरनिराळ्या हाडांच्या शिवणी उसवून मधेमधे फटी पडल्या आहेत." कवटी एका म्हाताऱ्याची होती. दात जिवंतपणीच पडून हिरड्या बुजल्या होत्या. खालची हनुवटी दात जाऊन व हिरड्या झिजून अरुंद झाली होती. दुर्दैवाने म्हाताऱ्याच्या इतर हाडांचे अवशेष फारसे सापडले नाहीत. आता ह्यापुढे स्वच्छ करून फोटो काढावे म्हणजे जास्त बरे असे ठरले. म्हाताऱ्याच्या पाठोपाठच थोड्या अंतरावर एक सबंधच सांगाडा सापडला. त्या माणसाचे हात छातीवर एकमेकांवर ठेवलेले होते. उजव्या हाताचा पंजा डाव्या कोपरावर व डाव्याचा उजव्या कोपरावर होता. पाय मुडपून ठेवलेले होते. पण सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे चेहऱ्याच्या डाव्या बाजूला कपाळापासून तो हनुवटीपर्यंत साफ घाव बसून केवढी फट पडली होती! हाड

अगदी कापले गेले होते, व इतक्या सहस्रकांच्या अवधीनंतरही
२४ / परिपूर्ती
 

पाहणाऱ्यांच्या हृदयात भीतीची चमक उठत होती. माणूस अगदी तरणाबांड पुरुष होता जेमतेम २५-३० वर्षांचा असेल नसेल. कामकरीसुद्धा स्तब्ध होते. शेवटी म्हातारा हिरोज़ी म्हणाला, “बाई, हा माणूस लढाईत मेलेला असणार." त्याच्या शब्दाबरोबर सगळ्यांना वाचा फुटली. आमच्या साहेबांचा तरुण मदतनीस म्हणाला, “हो हो, हा जवान लढाईत मेला, आणि त्याच्या दु:खानं त्याचा म्हातारा बाप मेला." माझी व सांकळियांची दृष्टाष्ट झाली, वे आम्हाला दोघांनाही हसू लोटले.
  दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीच्या सांगाड्यापलीकड़े पाच-सहा हातांवर एक कुत्रे पुरलेले आढळले. “कुत्रं कसं बुवा मेलं?" मंडळी विचारीत होती. पण त्या कुत्र्यामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती. कुत्रा काही आपोआप मेलेला नव्हता. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारला होता. "ह्या जुन्या वसाहतीत एक, माणूस- बहुधा पुरुष... मला असला पाहिजे, व त्याला पुरताना त्याचे नोकरचाकर, हत्यारे, त्याचा विश्वासू कुत्रा, सगळ्यांना मारून पुरले असले पाहिजे, असा मी उलगडा गेला, तो सगळ्यांना पटला व काम दुप्पट उत्साहाने सुरू झाले.
 गेल्या वर्षी आम्हाला कितीतरी अवशेष सापडले होते, पण त्यान माझ्या मनाला असा चटका लागला नव्हता. यंदा मात्र गतकालाती जीवनाच्या ह्या अदभुत आविष्काराने माझे मन भारावल्यासारखे झाले होते. माझे शरीर व मनाचा एक भाग सगळ्यांच्याबरोबर काम करीत होता.
 माझ्या ताब्यात आलेले सांगाडे नीट उकरून, मातीसकट वर उचलून, मेणवून, त्यांना कापडाच्या लांब लांब पट्यांनी घट्ट बांधून, कापता गुंडाळून, ट्रंकेत ठेवणे वगैरे कामे मदतनीसांच्या साहाय्याने चालला पण मन मात्र मुळीच ठिकाणावर नव्हते. हिवाळ्याच्या दिवसात दाट धुक्यातून पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करावा, धुके क्षणमात्र विरळ ९ पलीकडे काहीतरी ओळखीचे दिसल्याचा भास होऊन ती वस्तू परत गुरफटून जावी तसे मला झाले होते. मी टेकाडावर उभी राहून एकदा च नजर टाकली. वाळूचा दर्या अनंत पसरला होता. खाली तळे एखाद्या

आरशासारखे नितळ पसरले होते. त्यावर लहानशीसुद्धा लाटचा नव्हती. समुद्र कधीच असा नितळ नसतो, कितीही शांत असला तरी लाटांच्या लहानलहान टेकड्या त्यावर असायच्याच, तसेच अगदी लहान लहान उचवटे ह्या वाळूच्या समुद्रावर वाव्याच्या दिशेने पसरलेले होते. पण ते
परिपूर्ती / २५
 

काही पाण्यातल्या लाटासारखे अव्याहते खालीवर हलत नव्हते. ह्या लाटा जणू थिजल्या होत्या. मी त्या लाटांच्या एका उंचवट्यावर उभी होते दोन्ही बाजूला उथळ खोलगट भाग होता; व त्यापलीकडे दुस-या लाटांचे उंचवटे दिसत होते क्षितिजापर्यंत अशा वाळूच्या लाटा पसरल्या होत्या. दहा-पंधरा हजार वर्षापूर्वीही त्या अशाच असणार हे टेकाड असेच पण जरा ठेंगणे असणार. आत्ता त्यावर गेल्या पंधरा सहस्रकांच्या वाळूचे थर साचले आहेत. त्यावेळी ही रानटी माणसे येथे वस्ती करून होती. अशाच तळ्याचे पाणी पीत होती. आणि.. आणि..? धुके क्षणभर बाजूला झाले होते. अज्ञातांच्या पलीकडे ओळखीचा चेहरा दिसल्यासारखा वाटला पण परत सर्व-धुक्यात बुडून गेले सबंध दिवस असाच गेला. रात्री निजले तीही क्मिनस्क अवस्थेत.. मन व शरीर कशी श्रांत झाल्यासारखी झाली होती.
 मी ताडकन उठले कसला तरी मोठाकोलाहल चालला होता. माझ्या नावाने हाका ऐकू येत होत्या.कसल्या तरी भीतीने मी थिजल्यासारखी झाले होते. पण कोलाहल वाढला. छे:! मला गेलेच पाहिजे. मी चालत जाऊन दाराच्या कडीला हात घातला. इतक्यात विजेच्या दिव्याचा झोत माझ्या अंगावर पडला, व “कोण आहे?" असा माझ्या सहकाऱ्याचा परिचित आवाज कानावर पडून मी जागी झाले. माझे पाया लटपटत होते, तोंडाला कोरड पडली होती. मी आहे. जरा बाहेर जाऊन येते, असे उत्तर देऊन ली खोली बाहेर सोप्यात आले थंडीच्या कडाक्यात माझे अंग शहारले. बाहेर ठेवलेल्या माठातील बर्फासारखे गार पाणी मी घोटभर प्याले. पाणी इतके गार होते की, पाण्याचा घोट तोंडातून पोटापर्यंत पोचला ती सबंध वाट जणू बर्फाने कापीत कापीत गेल्यासारखे वाटले, पण त्यामुळे माझी झोप पार उडाली. मी शुद्धीवर आले. अंधारी रात्र होती.उत्तर गुजरातची कडक थंडी पडली होती. स्वच्छ गडद आकाशात तारे चमकत होते व सर्व सृष्टी अगदी निस्तब्ध शांत होती. मी डोळ्यांवरून हात फिरवला; एक निश्वास टाकला. खूप रडल्यावर घसा दुखाचा, छाती जड वाटावी, तसे मला वाटले. पण मी का उठले? मला कसले स्वप्न पडत होते? काही आठवेनामी परत आत गेले माझ्या कोफ्यात जाऊन निजले

 ह्यानंतर दुस-याच दिवशी आम्हाला ‘ती’ सापडली. पहिल्याने तंगडीचे हाड मोकळे झाले, ह्यामुळे माणूस असल्याचा सुगावा लागून कामकन्यांना दूर सारले, व आम्ही लहान-लहान हत्यारांनी सावकाशपणे
२६ / परिपूर्ती
 
हाडांच्या अनुरोधाने माती उकरून संबंध सांगाडा मोकळा केला. पायाचा हाडे उघडी पडल्यापासूनच मला शंका आली होती. संबंध सागाडी दिसू लागल्याबरोबर तर शंका फिटली. “कुत्रा पाहिल्यापासून बाईचा सागाडी मिळणार म्हणून वाटतच होतं... हा घ्या मिळाला!"-- मी म्हटले. "म्हणजे? हिलाही मारून टाकली काय?" माझ्या विद्यार्थ्याने प्रश्न केला. ह्यात काय संशय? स्वर्गात जसे नोकरचाकर व इमानी कुत्रा लागतो तशा बायको नको का?" त्याच्या प्रश्नाला सांकळियांनी उत्तर दिले. पण ही बाईच कशावरून?" माझ्याकडे वळुन त्यांनी विचारले आणि मी त्यांना व इतरांना सांगाड्याची कमरेची हाडे, हाडाचा हलकेपणा, डोक्याच्या काही विशिष्ट हाडांच्या खणा यांची माहिती देऊ लागले. हे व्याख्यान संपल्यावर सर्व मंडळी उठली. “हे पहा, सांगाडा आता तुमच्या ताब्यात देतोफोटोसाठी नीट साफ करून ठेवा. अजून ऊन फार आहे, दोन तासांनी सूर्य मावळायला आला म्हणजे नीट बेताचा प्रकाश पडेल तेव्हा फाटा. आम्ही पलीकडे काम सुरू करतो, तम्हाला कोणी मदतनीस पाहिजे का! श्री.साकळिया म्हणाले मी मानेनेच नकार दिला व सर्व मंडळी निघून गेली. मी एकटीच त्या खड्ड्यात राहिले. वरून ऊन रणरण तापत होत. मी वाकून हलक्या हाताने, सांगाडा न चाळवता, हाड न हाड दाभण, चाकू व कुचला ह्यांच्या साह्याने साफ करीत होते. पंधरा हजार वर्षांनी मातीच्या पात्र बाहेर पडून त्यांना सूर्यदर्शन होत होते. बाई पुरुषाप्रमाणेच पाय मुडपून, हात छातीवर ठेवून व डोके कुशीला वळवुन पुरलेली होती; पण पुरुषाचा देह केवढा दिसत होता आणि हिच्या हाडाची जडी केवढ्याशा लहान जागेत मावली होती! शरीराची हाडे साफ करून माझे हात डोक्याकडे वळले. केवढे लहानसे डोके होते! घडणही मोठी नाजुक वाटली. तिच्या गुळगुळीत कवटीवर माझी बोटे फिरत होती व मन यंत्राप्रमाणे नोंद करीत होते; "डोक्याचा मागचा भाग बराच फुगीर आहे बरं का- आणि हे कपाळ जरा अरुदच आहे." माझा दाभण डोळ्याच्या श्वाचेतन माती उकरू लागत डोळ्याची खाच साफ झाली; “ही नाकाची हाडं, त्याखालील भोक रुदै दिसत आहेत. नाक बसकं न रुंद होतं वाटतं. गालफडाची हाड लहानच आहेत." माझे हात जबड्यापाशी पोचले. हाडांचा रंग पिवळसर-काळसर माताच्या रंगासारखाच होता. पण जबड्या वरून ब्रश फिरताच दात उघडे पडून उन्हात चकाकले. माझे हृदय धडधडत होते. जवळच्या खड्ड्यात आणि 
परिपूर्ती / २७
 

काठावर आमच्या माणसांच्या बोलण्याचा आवाज मी जणू स्वप्नात ऐकत होते. “अक्कलदाढा आलेल्या दिसत नाहीत- फारच तरुण होती." ही नोंद मला नकळत मनात होत होती. पण माझे अंत:करण काही विलक्षण हुरहुरीने औत्सुक्याने भरून गेले होते. त्या डोळ्यांच्या खाचात मला बुबुळे हालल्यासारखी वाटली. ते लखलखते दात मागल्या ओळखीने हसल्यागत भासले. माझी बोटे तिच्या अरुंद निमुळत्या हनुवटीशी गुंतली होती, पण हृदय आर्तपणे त्या सांगाड्याला विचारीत होते, “तू ती मीच का ग? तू ती मीच का ग?"