दत्ताची आरती/ येई बा नरहरीदत्ता गाणगापुरवासी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


येई बा नरहरीदत्ता गाणगापुरवासी ।
भक्ति भावे सेवा करितां पावसि भक्तांसी ॥ धृ. ॥

महिमा किती वर्णू मी तरी पामर मतिहीन ।
सेवेकरितां चरणी आलो निरसी अज्ञान ॥ १ ॥

नानारोग दुरितें जाती घेतां तव तीर्थ ॥
प्रपंच टाकुनि साधायासी आलो परमार्थ ॥ २ ॥

सेवक मी गुरुराया तुमचा शरणांगत चरणी ।
जीवन्मुक्त व्हावया तत्व उपदेशी कर्णी ॥ ३ ॥

मोरेश्वरसुत वासुदेव हा स्वामीगुण गाई ।
निश्चय माझा राहो देवा अखंड गुरुपायीं ॥ ४ ॥


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg