गणपतीची आरती/सकळारंभी देव आदि गणपती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>


सकळारंभी देव आदि गणपती ॥ ब्रह्मादिक हरिहर ऋषि मुनि ध्याती ॥ अकळे नकळे अगाध मंगलमूर्तिं ॥ जय जय करुणानिधी कल्याणकीर्ती ॥१॥

जयदेव जयदेव सिद्धी बुद्धी रमणा ॥ आरति (भावार्थी) ओवाळुं तुमचीया चरणा ॥जयदेव० ॥धृ०॥

विश्वाधीशा विराट स्वरुप विशाळा ॥ विश्व जन व्यापक अगाध लीला ॥ तारक भवाब्धि भक्त जन कृपाळा ॥ लक्षिता हा लक्ष निर्गुण निराळा ॥जयदेव० ॥२॥

ब्रह्मा विष्णु शिवादि तूं आदि मूर्ती ॥ नकळसी वेदशास्त्रा अगाध गुण कीर्ती ॥ मोरया गोसावी योगिया चित्तीं ॥ सबाह्य अभ्यंतर व्यापक गणपती ॥जयदेव० ॥३॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg