गणपतीची आरती/विघ्नांत विघ्नेशा हे गजानन

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> विघ्नांत विघ्नेशा हे गजानना । आरती मी करितों तुज पुरवि कामना ॥ धृ. ॥

भाद्रपदी शुद्ध चतुर्थीस तव बरी। मूर्ति करुनि सर्व लोक पूजिती घरी॥ महिमा तव वर्णवे न पापगिरि हरी॥ येई ॥ घाई पाहीं करुनि त्वरा। विघ्नहरा। दे सुगिरा। हे कृपाधना ॥ विघ्ना. ॥ १ ॥

संकटि जे पडुनि प्रभो स्मरती तुजला । मुक्त करिसी जगती या खचित त्यांजला ॥ जाणुनि हे तव भजनीं ध्यास लागला ॥ गातो। नमितो। तारि आतां। या भक्ता। दयावंता। गौरिनंदना ॥ विघ्नां ॥ २

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg