गणपतीची आरती/वक्रतुंड एकदंत गौरिनंदना

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

वक्रतुंड एकदंत गौरिनंदना। आरती मी करितों तुज हे गजानना॥धृ॥

पाशांकुशा शोभे करी दु:खभंजना। रत्नजडित सिंहासन बुद्धिदीपना॥ सुरनरमुनि स्मरती तुला यतो दर्शना॥१॥

ऋद्धिसिद्धि करिती सद नृत्यगायना। देसि मुक्ति भक्तजनां हे दयाघना॥ विठ्ठलसुत लीन पदीं विघ्ननाशना। वक्रतुंड एकदंत॥२॥


<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg