गणपतीची आरती/जयजयाजी विघ्नांतक हे गजानन

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>


जयजयाजी विघ्नांतक हे गजानना ॥ पंचारति करितो तुज विश्वपालना ॥ धृ. ॥

कार्यारंभी प्रेमभरें पुजिति जे तुला ॥ सकल अघा हरुनि सुखी करिसी त्यांजला ॥ निजपद त्या देऊनिया हरिसी भ्रांतिला ॥ देसी भक्तजनां हे दयाघना ॥ जय ॥ १ ॥

दास विनवि निशिदिनी तुज गौरीनंदना ॥ सुप्रसन्न होऊनि दे भजनिं वासना ॥ सत्कीर्तिदायक ही बुद्धि या दीना ॥ विठ्ठलसुत मागतसे पुरवि कामना ॥ २ ॥


<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg