गणपतीची आरती/जय जय गणपती। ओवाळीत आरती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> जय जय गणपती। ओवाळीत आरती। साजि-या सरळ भुजा। परश कमळ शोभती॥धृ.॥

अवतार नाम भेद। गणा आदी अगाध॥ जयासी पार नाही। पुढे खुंटला वाद॥ एकचि दंत शोभे। मुख विक्राळ दोंद॥ ब्रह्मांडा माजि दावी।ऐसे अनंत छंद॥ जय.॥१॥

हे महा ठेंगणी हो। तुज नृत्यनायका॥ भोंवरी फ़ेरे देता। असुरा मर्दीले एका॥ घातले तोडर हो। भक्त जनपाळका॥जय॥२॥

सुंदर शोभला हो। रुपे लोपली तेजें। उपमा काय देऊं। नसे आणिक दुजे॥ रवि शशि तारांगणे। जयामाजी सहजे॥ उधरी सामावली। जया ब्रह्मांडबीजे॥जय.॥३॥

वर्णिता शेष लीला। मूखे भागली त्याची॥ पांगुळले वेद कैसे। चारी राहिले मुके॥ अवतार जन्मला हो। लिंग नामिया मुखे॥ अमूर्त मूर्तिमंत। होय भक्तीच्या सूखे॥ जय॥४॥

ऐसाचि भाव देई। तया नाचतां पुढे॥ धूप दीप पंचारती। ओवाळीन निवाडे॥ राखें तूं शरणांगता।तुका खेळतां लाडे॥ जय॥५॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg