गणपतीची आरती/ओंवाळू आर्ती देवा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

ओंवाळू आर्ती देवा श्रीमंगलमूर्ती॥ अघसंकट नासुनियां द्यावी चरणांसी मुक्ती॥धॄ.॥जय॥

देवा तूं आद्य सुरवरवंद्या गणराया। तुझीया स्वरुपी न सरी पावे दुसरी उपमाया॥१॥

शेंदूर अंगी चर्चुन कंठी मुक्तांची माळा। लंबोदर उंदीरवर शोभे लल्लाटी टीळा॥२॥

पीतांबर परिधान पायी घुंगुरध्वनि गाजे। दुर्वांकुर वाहिले आम्ही भक्तीचे काजे॥३॥

वार्षिक उत्साहाची सेवा यथाशक्ति केली। न्यूनाधिक तें क्षमा करुनि रक्षी माउली॥४॥

महानैवेद्य घृतशर्करा्मिश्रीत हे लाडू। अर्पू तुजला प्रसाद आपुल्या पात्री तो वाढूं॥५॥

पिता तुझा तो सांब सदाशिव ध्यातो। श्रीरामा हनुमंतानें त्याचे पायी धरिला सुप्रेमा॥६॥ <poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg
Question Copyright 2.png
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.