गणपतीची आरती/जय जय गणपति अघशमना

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> जय जय गणपति अघशमना । करितों आरती तव चरणा ॥ धृ ॥

छळिती षडरिपु बहु मजला। यांतुनि तारी जगपाला ॥ हरि या विविध तापाला। दॆन्यहि नेई विलयाला ॥ निशिदिनि करि मज साह्याला । विनंति ही तव पदकमला ॥

विठ्ठलसुत बहु प्रेमे विनवी तारी या दीना । दयाळा करिं मजवरि करुणा ॥ जय. ॥ १ ॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg