गणपतीची आरती/जग ताराया अवतरलासी भक्त
Appearance
<poem>
जग ताराया अवतरलासी भक्त पूजिती सद्भावे। कनवाळु तूं मुषकवाहन भक्तसंकटी तूं पावें ॥ बहु प्रेमानें ओवाळिन तुज मन वांछी तव गुण गावे। विघ्नहराया येई झडकरी ऋद्धिसिद्धिसह तू धावे॥१॥
वक्रतुंड गुणवंत विघ्नहर गौरिनंदन गणपति जो। आरति ओवाळीन मी त्यासी विघ्नांतक जगतारक जो॥धृ.॥
शुंडा शोभे सिंदुरचर्चित मस्तकी मुकुट झळाळी । मुक्ताहार हे कंठी रुळती कस्तुरितिलक हा तव भाळी ॥ मोरेश्वर सुत वासुदेव तुज प्रार्थी दीना प्रतिपाळी ॥ भक्तजनातें मंगलमूर्ती रक्षीं अतिसंकटकाळीं ॥ २ ॥ वक्रतुंड गुणवंत ॥
<poem>
![]() |
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. | ![]() |
