गणपतीची आरती/आरती मी करिन तुला

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

आरती मी करिन तुला श्रीगजानना । वक्रतुंड एकदंत मुषकवाहना ॥ धृ. ॥

त्रिविधताप दूर करी गौरीनंदना । दॆन्य हरुनि तारी मला विघ्ननाशना ॥ भक्तसखा तूंची एक सिंदुरानना । मी निशिदिनी ध्यातो तुला दुष्ट भंजना ॥ १ ॥

पंचारती ओवाळिन पुरवि कमना । साह्य करीं निशिदिनि मज भक्तातारणा ॥ भाविक जन पुजिति तुला स्वहित साधना । वासुदेव लीन पदीं धरुनि धारणा ॥ २ ॥


<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg