Jump to content

गणपतीची आरती/आरती गौरिनंदनाची। गणाधिष

विकिस्रोत कडून

<poem>


आरती गौरिनंदनाची। गणाधिष विघ्ननाशनाची॥धृ॥

कमलसम अमरद्विरदवक्त्रां। एकरद मोदकर चरिंत्रा। तुंदउदरांक लघुविचित्रा। दिव्य क्रमनीय पूतगात्रा॥चाल॥ पूर्ण राकेशतिलकभाला। शिरसिधृतगरप, मथितविधिवरप चकिरहरसुरप, अमिंतकृतवृद्धि मंगलाची॥ श्रीवृद्धि सत्सुमंगलाची॥ आरती॥१॥

तडित्सम हाटकपीत पट तें। सुवेष्ठित मेखलादिकटितें॥ मूषकारुढ सदृढघटितें। भयद तनु धरुनी अर्धत्रुटितें॥चाल॥ अटनि अरिभृंग पणिकमळी। कमलामरदंग, पिटिति करिभृदगसमरातिसुरंग भंगुनि सिंदुराची॥ सुरंग भंगुनि सिंदुराची॥ आरती॥२॥

हिमालयतन्वि ह्रदयतोषा। सुखालय सदय सुजनपोषा॥ दॆन्य विपुदुपाद पूर्णशोषा। सदाशिवपद दुरितमीषा॥ चाल॥ समर सुरसाह्यकरण मान्या। अमितखल कंदन, करित यमसदन भरितनिजपदन, तोद्धवरवदन जयरवाची॥ करुनि ध्वनि गाति कीर्ती ज्याची॥ आरती॥३॥

मदन सौंदर्य चरणापाणी। ब्रह्मविद्यार्थ सिद्धखाणी॥ शिवप्रिय स्तविती विबुधश्रेणी। करित रविदास ललित वाणी॥ चाल॥ वरदमतिमधुरबाह्य थाया। कीर्ति गुणि अगुण, वर्ति परि सगुण, मूर्ति जन चरण वर्ति भवअर्तितमहाराची॥ जगदगुरु जननि हरिहरांची ॥ आरती ॥४॥


<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.