गणपतीची आरती/आरती करितो गणपतीदेवा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

आरती करितो गणपतीदेवा, दे मज मति आतां। सर्व संकटे हरिसी सत्वर, गुण तुझे गातां॥धृ.॥

पार्वतीतनया विघ्ननाशका, तारिसी तू भक्तां । उद्धरले जड मूढ सर्वहि, नाम तुझे गातां॥१॥

नित्य निरंतर भजतां येईल, निजपद तें हातां। म्हणून चरणी लीन सदा हरि, तल्लीन तुज पाहतां॥२॥


<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg