Jump to content

केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re)

विकिस्रोत कडून


प्रकाशक :
प्रभाग प्रमुख
ग्राम विकसन विभाग.
ज्ञान प्रबोधिनी, ५१०, सदाशिव पेठ,
पुणे-४११०३०.
दूरभाष क्र. : ०२०-४४७७६९१,४४९१९५७
फॅक्स क्र : ०२०-४४९१८०६
इ-मेल : jpgram@sify.com



© सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन


प्रथम आवृत्ती :
गुढीपाडवा शके १९२६
(२१ मार्च २००४)

किंमत : ३० रुपये मात्र

अनुक्रमणिका
* प्रशिक्षण वर्गांचा आढावा.
*प्रस्तावना
* काही अनुभव......
  चोखपणा महत्त्वाचा .....
  दूर दृष्टीनेसंकटावर मात...
  आगळीवेगळी कलात्मकवाट...... ११
  पारंपारिक कलेला आधुनिकजोड ...... १३
  चिकाटीने करत राहायचं.. १५
  अनुभवातून उद्योजकतेकडे... १७
  स्वावलंबनासाठी सततची धडपड..... १८
  भक्कम पायाक्कम पाया महत्त्वाचा ..... १९
  योग्य उद्योगांची सांगड....... २१
 १० अथक परिश्रमांचे फळ ...... २२
 ११ नित्य नवे शिकेल, तोच स्पर्धेत टिकेल... २३
 थेंबे थेंबे तळे साचे.... . २५
 १२ उद्योजिकेच्या घरी लक्ष्मी वास करी.. २६
 १३ बाईमोठी जिद्दीची... २८
 १४ उद्योगाचं रोपटंमोठं केल.. २९
 १५ योग्यव्यवसायाची निवड... ३०
 १६ केलंकी सारं जमत जातं... ३२
* उद्योजकतेचे इतर काही अनुभव ............ ३४
* समारोप............... ३६
*****
प्रस्तावना
-------

 “ज्ञान प्रबोधिनी" "संस्था १९६२ पासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षण, ग्रामविकस, संशोधन आणि संघटन ही प्रमुख उदिष्टे समारे ठेवून अनेक प्रकल्प सुरु आहेत. व्यक्तिविकास व कार्यविकास याबरोबर समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रात नेतृत्वविकसन होण्यासाठी वैशिष्ठयपूर्ण कार्यपध्दतीची या सर्व प्रयोगांना जोड दिली जात आहे.

 ज्ञान प्रबोधिनी संस्थेमार्फत ग्रामीण उद्योजकतेच्या संदर्भात १९६५ ते २००० या कालावधीत काय उपक्रम राबविले, त्याचं उद्दीष्ट काय, त्यामागची भूमिका कोणती होती, या कामामुळे काय साध्य झालं, या साऱ्याचा आढावा घ्यायचं ठरलं. यासाठी ज्यांच्याबरोबर काम केलं, ज्यांच्यासाठी काम केलं, ज्यांनी काम केलं अशा अनेकांच्या भेटी घेतल्या. या उपक्रमात सहभागी असणाऱ्यांनी यासाठी वेळही दिला नि माहितीही दिली. सर्वांच्याच मुलाखती जागेअभावी सविस्तर देता आल्या नाहीत. तरीही सर्वांचे मुद्दे येतील असा प्रयत्न केला आहे. या साऱ्या मुलाखती घेण्याचं , त्याचं संकलन करण्याचं आणि त्यांना शब्दरूप देण्याचं काम सुनीला गोंधळेकर ह्यांनी केले.

 बीजारोपण -

 आर्थिक स्वावलंबन ही प्रत्येकाचीच प्राथमिक आवश्यकता आहे. खेडेगावातून या संधी दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. तिथल्या हुशार, उत्साही तरुणांना बेकारीचा प्रश्न जास्तच तीव्रतेनं भेडसावतो. शहरी भागातल्या तरुणांना शिक्षण तर ग्रामीण भागामध्ये उद्योजकतेचं प्रशिक्षण अशी दुहेरी भूमिका मग संस्थेनं निवडली. १९६५ पासून या प्रकारच्या कामाला सुरुवात झाली. संस्थेचे संस्थापक व आद्य संचालक वाचस्पती आप्पा पेंडसे यांची दूरदृष्टी आणि सामाजिक प्रश्नांचा वेध घेण्याची क्षमता यातून हे काम उभे राहिले.

 प्रबोधिनीचे प्रथम अध्यक्ष श्री. कोटिभास्कर यांनी या कामात पुढाकार घेतला. ते स्वत: मुंबईतले एक उद्योगपती होते. उद्योगधंद्याना चालना मिळण्याची निकड त्यांना जास्तच जाणवत होती. त्यांनी स्वत: प्रबोधिनीत ही कल्पना विकसित केली. त्यासाठी देणगीही दिली. त्याशिवाय १९६८ साली सुपरिचित उद्योगपती मा. शंतनुराव किर्लोस्कर यांच्या सहकार्याने ही संकल्पना जोम धरू लागली. शंतनुरावांशी असा व्यावसायिक प्रकल्प कसा उभा करता येईल याविषयी चर्चा झाली. मग त्यांनी त्यांच्या कारखान्यात प्रशिक्षण दिलं, आर्थिक मदत केली आणि उत्पादन केंद्र १९६९ मध्ये पुण्यात चालू झालं.

 १९७१ मध्ये हे उत्पादन केंद्र शिवापूर ह्या पुण्याजवळील सातारा रस्त्यावरील शिवापूर गावात सुरू झालं. स्वत: मा. शंतनुराव किर्लोस्कर त्याच्या उद्घाटनाला उपस्थित होते. त्यांनी ५० यंत्रे या केंद्राला देऊ केली आणि कामही दिलं. उद्योगला कोटिभास्कर स्मृति उद्योग अर्थात किर्लोस्कर ज्ञान प्रबोधिनी तत्रंशाळा असं नाव देण्यात आलं. १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर Unicef संस्थेमार्फत हातपंप तयार करण्याची मागणी आली. सुमारे १०-१५ हजार हातपंपांची यावेळी निर्मिती या उद्योगातून झाली. आणि मग मागणीप्रमाणे योग्य ते डिझाईन करणे, १२००तरुणाना या उद्योगात प्रशिक्षण देण्यात आले. त्यावर संशोधन करणे व मोठ्या असे अनेक प्रकल्प इथे हाताळले गेले. साधारणत: २०० कामगार या ठिकाणी काम करत होते.

 कालांतराने या कारखान्यातून 'यंत्रविस्तार योजना' ही कल्पना मूळ धरू लागली. या एका कारखान्यात काम देऊन सगळ्या भागाचा विकास होऊ शकत नाही. हे काम वाढण्यासाठी यंत्रविस्तार योजना १९७५ मध्ये सुरू केली गेली. या योजनेमुळे या भागात उद्योजक वाढावेत अशी कल्पना राबवण्यात आली. या प्रदेशातील तरुणांनी स्वत:चा उद्योग चालू करावा यासाठी त्यांना आवश्यक ती मदत या योजनेमुळे केली गेली. ३० ते ४० तरुणांना यात प्रत्यक्ष यंत्रे दिली. काहीना यंत्रासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं, कामेही पुरविण्यात आली. असं सर्वांगपरिपूर्ण सहाय्य गावातल्या तरुणांना प्रथमच मिळत असेल. १९८१ मध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. यातूनही आजपर्यंत सुमारे ४० उद्योगांना सुरुवात झाली. या प्रकल्पामधून सर्व आर्थिक स्तरांतील शेतकरी, नवशिक्षित तरुण, हरिजन, वाजंत्री वादक, मुस्लीम समाज अशा वेगवेगळ्या थरातून उद्योजक तयार झाले आणि स्वत:च्या पायावर उभे राहू शकले.

 बाजारपेठेशी सांधेजोड -

 या एका कारखान्याशिवायही ग्रामीण भागातल्या इतर उद्योगांना चालना मिळावी यासाठीही अनेक प्रकल्प राबवले गेले. यात प्रामुख्याने शिवगंगा खोऱ्यातल्या शेतकऱ्यांना पुण्यासारख्या जवळच्या बाजारपेठेत माल आणता यावा, विकता यावा यासाठी योजना तयार करण्यात आल्या. व्यावसायिक शेतीसाठी तांदूळ विक्री व दूध विक्री या महत्त्वाच्या बाजारपेठेशी ओळख अशा सगळ्याच बाबींचा समावेश होता.

 १९७८ साली पुणे जिल्ह्यातील दुर्गम वेल्हे तालुक्यातील करंजावणे येथे शिवभूमी खांडसरी उद्योग उभारणीचाही प्रबोधिनीने बदललेल्या शासकीय धोरणांमुळे राज्यातील अनेक खांडसऱ्या प्रमाणे हाही उद्योग स्थगित करावा लागला.

 प्रयत्न करुन पाहिला.

 शहरामध्ये उद्योजकता-

 ग्रामीण भागामध्ये हे प्रयत्न चालू असतानाच शहरी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालूच होते. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या माध्यमातून हे कौशल्य आत्मसात झाले तर वाढत्या वयात नक्कीच जोमाने विकास होईल हे त्यामागचे तत्त्व. खाद्यपदार्थांची विक्री या माध्यमातून काही वर्षे केली. प्रबोधिनीने कपॅसिटर्स बनवण्याचा व्यवसायही केला. सध्या उद्वाहक (लिफ्ट) बनवणे व त्याचे दुरुस्तीचे कंत्राट घेणे असा व्यवसाय १९८६ पासून चालू आहे. या उत्पादनाला व्यापक बाजारपेठ मिळवण्याच्या दृष्टीने दिल्ली, अहमदाबाद, बंगलोर इथे कार्यालये सुरू केली होती. या व्यापार उद्योग विभागातून त्या त्या शहरांमध्ये विक्रीची व्यवस्था करण्यात आली. प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थिनीना विद्यार्थी दशेतच विक्रि कौशल्य जोपासनेवर भर दिला गेला. शालेय वयापासून हे कौशल्य आत्मसात झाले तर वाढत्या वया नक्कीच जोमाने विकास होईल हे त्यामागचे तत्व. महिलासाठी तांत्रिक प्रशिक्षण व त्यातून उद्योजकता यावर अलिकडच्या काळात भर देण्यात आला आहे.

 प्रयत्नांचे फलित -

 जवळ जवळ ३० वर्ष केलेल्या उद्योजकतेच्या डोळस प्रयत्नांचं दृश्य, फलित आता पहायला मिळत आहे. प्रामुख्याने शिवापूर ते वेल्हा या पट्यातील गावांमध्ये हा बदल जाणवणारा आहे. गाव म्हणजे शेती आणि शेती संबंधित पूरक उद्योग, तांत्रिक ज्ञानाचा अभाव, समीकरण बदलली आहेत. १९७१ च्या आधी या भागात एकही कारखाना नव्हता पण आता सुमारे ४०० लहान- मोठे उद्योग या टापूत उभे आहेत. या उद्योजकांमध्ये तरुण आणि स्त्रियांचा सहभाग मोठा आहे.

 एवढ्या प्रमाणावर उद्योग याचाच अर्थ उद्योगाचं वातावरण इथे तयार झालं आहे. उद्योग म्हणजे मालाची पारख, दर्जाची खात्री, वेळेवर माल तयार होणे, बाजारपेठेची नाडी ओळखणे, कामगारांचे व्यवस्थापन, पैशांचे हिशोब, कामातलं सातत्य आणि नावीन्यही. या सगळ्यांची रुजवण गेल्या ३० वर्षांत इथे झाली आहे. तांत्रिक सक्षमता आणि कौशल्ययुक्त मनुष्यबळ याच खेड्यामधून निर्माण झालं आहे. त्यामुळेच नवीन तरुण पिढी केवळ नोकरीच्या आशेवर जगत नाही तर उद्योगातली धडाडी दाखवण्याची जिद्द त्यांच्यात तयार झालेली दिसते. २०-२५ वर्षांचे हे तरुण स्वत:च्या जबाबदारीवर यंत्र खरेदी करतात. माल खरेदी करतात आणि उद्योगाला सुरुवात करतात. अपयश आलं तरी अपयश हाही उद्योगाचाच उद्योगाचाच एक भाग आहे हे समजून पुन्हा नव्या उमेदीनं व्यवसायाला सुरुवात करतात.

 हेच तरुण उद्योजक उद्योजकांची पुढची पिढीही घडवत असतात. नवीन मुलांना तेच काम शिकवतात व आपल्या इथे कामही देतात. यातून गावातच नोकरीच्या संधी वाढतात. गावातला तरुण गावातच रहातो आणि निसर्गाच्या लहरींवर अवलंबून न रहाता स्वत:च्या पायावर उभा रहातो. या

 पाठोपाठ येणारी सुबत्ता, आर्थिक सुस्थिरता त्यांच्या दैनंदिन जीवनात, राहणीमानात नक्कीच डोकावत. आर्थिक स्थैर्याचा एक परिणाम म्हणून कुटुंब अधिक सुदृढ, तणावरहित आणि स्थिर होतं.

 उद्योग करायचा ठरवलं की बऱ्याच अडचणी डोळ्यांसमोर येतात. कधी पैसे असतात तर काय करायचं तेच समजत नाही. कधी काय करायचं ते पक्क असतं पण पैसे कसे उभारायचे ते समजत नाही. कधी हे दोन्ही जमतं पण बाजारपेठेचा अंदाज येत नाही. या अशा अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रबोधिनीने ग्रामीण भागात उद्योजकता प्रशिक्षणाचे ३ वर्ग घेतले. या वर्गामध्ये शिवगंगा-गुंजवणी खोऱ्यातील साधारण ९५ युवक व महिला सहभागी झाल्या. या वर्गांमध्ये उद्योग संधी, विपणन, अर्थसहाय्य व प्रेरणा जागरण अशा विविध विषयांचे प्रशिक्षण दिले. याचा उपयोग होऊन अनेकांनी स्वत:चे स्वतंत्र उद्योग सुरू केले. अशा प्रशिक्षणामध्ये जेव्हा १०० जणी सहभागी होतात तेव्हा कुठे १० जणी पुढच्या टप्प्यावर पोहोचतात. त्यातूनही टिकून यशस्वी होणाऱ्या थोड्याच असतात. यापुढे दिलेल्या कहाण्या या अशा थोड्यांपैकीच आहेत.

***






चोखपणा महत्त्वाचा . . १

 नाव - लक्ष्मणराव वसंतराव कोंडे
 राहणार - शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे.
 शिक्षण - कृषि तांत्रिक वर्ग
 व्यवसाय - लेथ मशिन - वर्क शॉप
 व्यवसायाचे नाव - गुरुप्रसाद इंजिनियरिंग. पुणे.
 सातारा हायवे वर वेळूगावाजवळ डावीकडे तीन दुकानांची एक बैठी जागा दिसते ...... त्या तीनपैकी मधला गाळा आहे लक्ष्मणराव कोंडे यांच्या 'गुरुप्रसाद इंजिनियरिंगचा.' बाजूची दोन्ही दुकानं कोंडे यांचीच. या तीनही भावांनी ठरवून उद्योग सुरू केले. एकानंतर एक योजनाबद्धतेने तिघांनी वेगवेगळ्या उद्योगांना सुरुवात केली.स्वत:च बांधकाम केलं आणि आज तीन उद्योग उभे राहिले आहेत.
 १९८८-८९ मध्ये शिवापूर इथल्या ज्ञान प्रबोधिनीने चालवलेल्या कृषि तांत्रिक शाळेत लेथ मशिन ऑपरेटरच्या वर्गात प्रशिक्षण घेतलं आणि कोटिभास्कर उद्योगात तिथेच कामगार म्हणून सुरुवात केली. शाळेच्या सरांचं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन यामुळे उभारी मिळाली. १९९५-९६ पर्यंत तिथे कामाचा अनुभव घेतला आणि त्यानंतर स्वत:च्या उद्योगाला हात घातला.
 योजनाबद्ध आखणी -
९६ पर्यंत लक्ष्मणराव नोकरीत असले तरी नंतर तीनही भावांनी व्यवसाय काढायचे हे आधीच निश्चित केलं होतं. त्याप्रमाणे हायवेसारख्या अगदी मोक्याच्या स्वत:च्या जागेत बांधकाम करून दुकानाचे तीन गाळे बांधून ठेवले होते. मग एकानंतर एक भाऊ आपापल्या उद्योगाची घडी बसवायला लागला. त्याचवेळी घरची शेती सगळे मिळून पाहात होतेच. अजूनही बघतात.
 दोन ते अडीच लाखाचं लेथ मशिन हप्त्यावर घेतलं. त्यासाठी बँकेतून आवश्यक ते कर्ज घेतलं. काही रक्कम आधीपासून जमवली होती. जागा आणि लेथ मशिन या भांडवलावर सुरुवात झाली. आसपासची ४ जणं हाताखाली शिकवून तयार केली. त्यांच्या मदतीने स्वत: मशिनवर उभं रहात उद्योग उभा राहिला लागला. आज चार वर्षांनंतर पूर्ण कर्ज फेडून उद्योग स्वयंपूर्ण झालाय.


 प्रबोधिनीच्या कोटिभास्कर उद्योगातील संपर्कमुळे आजूबाजूची कामे अजून मिळतात. त्यापेक्षा फारसं इतरत्र कामं शोधत जावं लागत नाही. लक्ष्मणरावांचे कोटिभास्कर उद्योग समूहाशी असलेले संबंध केवळ मालक- नोकर असे नव्हते. म्हणूनच विश्वासाच्या बळावर उद्योग चालतो. हा विश्वास विद्यार्थी, मग कामगार आणि आता प्रबोधिनीचा सहव्यावसायी या नात्यानी सतत टिकून आहे.


व्यावसायिक हिशोब - खतावणी -

 व्यक्साय यशस्वी होण्यासाठी जमा-खर्चाची योग्य नोंद आणि त्या योगे पैशाच्या उलाढालीवर निर्बंध असणं. गरजेचं असतं ही नस कोंड्यानी बरोबर पकडली आहे. खरंतर कॉलेजात जाऊन त्यांनी जमा-खर्च ठेवण्याचं शास्त्र अभ्यासलं नाही. पण स्वत:च्या अनुभवाच्या बळावर त्यांनी स्वतःची हिशोब मांडण्याची एक पद्धत शोधली आहे. त्यानुसार अतिशय शास्त्रीय पद्धतीनं ते आपली खातेवही ठेवतात. त्यांची हिशोबाची पद्धत आणि वही निश्चिततच आवर्जून पाहायला हवी अशी आहे.

***


 
दूर दृष्टीने संकटावर मात  


 नाव - शांताराम हरी घारे
 रहाणार - शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे.
 शिक्षण - आय. टी. आय.
 व्यवसाय -मेकॅनिकल वर्कशॉप
 व्यवसायाचे नाव -घारे इंजिनियरिंग.
 गावातून शहराकडे -

 कऱ्हाड इथल्या घारेवाडीतून १० वी पास होऊन तिथेच आय. टी. आय. चा कोर्स केलेला हा लहान मुलगा शिवापूरला आला. तो आपला स्वत:चा उद्योग सुरू करायचा हे स्वप्न मनात बाळगून. अशिक्षित शेतकऱ्याच्या घरातून आलेले घारे ७०-७१ साली शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला लागले. ५५ रुपये पगारावर नोकरीचा ओनामा परिचय प्रबोधिनीचे संचालक आप्पा, कार्यवाह अण्णा यांच्याशी झाला. त्यांच्या सहवासातून विश्वास, प्रेम, आत्मविश्वास आणि कामाचा आवाका वाढला. विविध पैलूंवर चर्चा घडल्या. यातून घारे यांचा उद्योगाशी संपर्क वाढला.

उद्योगाचा सर्वांगीण अनुभव -

 कोटीभास्कर उद्योगात त्यांनी शिकाऊ उमेदवारापासून व्यवस्थापकांपर्यंत सर्व पदे एकानंतर एक सांभाळली. त्यामधे जबाबदारीचा विभाग होता - संशोधन आणि विस्तार. नवीन जॉबवर संशोधन करून तो आपल्या इथे तयार करायचं आव्हानात्मक काम त्यांनी केलं. या प्रकारचा पहिला जॉब होता किर्लोस्कर वॉटर पंप्स. त्या जॉबचं डिझाइन घारे यांनी केले. या शिवाय पैशाचे व्यवहार, हिशोब हा विभागही सांभाळला. उद्योगाचं सर्वांगीण प्रशिक्षणच जणू इथे अनुभवता आलं आणि अर्थातच त्याचा उपयोग त्यांना स्वत:च्या उद्योगात झाला..

नोकरी करतानाच उद्योगासाठी तयारी -

 नोकरी करत असतानाच घारे मामा (याच नावानी मामांना सारे परिसरात ओळखतात.) आपला उद्योग चालू करायचाच हे ध्येय बाळगून होते. लहानपणी नात्यातली लोकं नोकरीसाठी मुंबईला जाऊन झोपडपट्टीत राहताना पाहिली होती. त्यामुळे अशी लाजिरवाणी नोकरी आणि असं जगणं त्यांनी केव्हाच अमान्य केलं होतं. त्यातूनच स्वत:चा व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिल.

 ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी घारे कुटुंब काटकसर करून जाणीवपूर्वक बचत करत होते. साधं जीवन जगायचं आणि पै पै करत भांडवल उभं करायचं असं धोरण बरेच वर्ष चालू होतं. वीस वर्षांची नोकरी आणि बचत यातून घारे यातून कुटुंबीयांनी एवढं भांडवल उभं केलं की ९२-९३ साली स्वत:च्या जिवावर उद्योग चालू करता आला.

उद्योग संकटांची मालिका आणि त्यावर मात -

 स्वत:च्या भांडवलातून घारेमामांनी मशिन घेतलं, शेडही उभी केली. कामगार तयार केले. त्यांना शिकवलं. उद्योग चालू झाला. पण ह्या उद्योगाला बाळसं चढेना कारण अनेक संकट कोसळू लागली. घारे मामांच्या पायावर मशिन पडलं आणि अधूपणा आला. कामं कमी झाली. बँकेत शिल्लक शून्य झाली. आर्थिक आणि मनुष्यबळाच्या अभावी उद्योग कमी कमी व्हायला लागला.

 यातूनही घारेमामांनी मार्ग शोधला. शून्यातून पुन्हा एकदा सुरुवात केली. काही काळ मध्यस्थाप्रमाणे काम केलं. जॉब दुसऱ्याकडून करवून घेतले. आर्थिक बाजू सावरती केली. पुन्हा एकदा कामगार जमवले आणि आज त्यांच्याकडे २५ यंत्रे आहेत आणि ३०-३५ कामगार. भारत फोर्ज, बजाज स्कूटर, यासारख्या उद्योगांसाठी सुटे भाग तयार करतात.  गेल्या काही वर्षापासून मंदीच्या लाटेमुळे आजूबाजूचे छोटे मोठे उद्योग कामाअभावी पटापट बंद पडू लागले. अशा परिस्थितीत घारेमामांचा उद्योग मात्र नीट चालू आहे. त्याचं श्रेय आहे घारे मामांच्या व्यावसायिक दूरदृष्टिला आणि भूमिकेला.

 व्यवसायाची तत्त्व -

 घारे मामा सांगतात उद्योग करताना काही तत्त्व सांभाळावी लागतात. शब्द देणं आणि दिलेला शब्द पाळणं हे रक्तात भिनावं लागतं आणि व्यवहारात ते वर्तनातून दिसावंही लागतं. याशिवाय आपलं काम चतु:सूत्रीवर चालतं - योग्य दर्जा, योग्य किंमत, योग्य वेळेत काम पूर्ण करणं आणि पूर्ण संख्येत माल देणं.

 ही चतु:सूत्री कसोशीने पाळणं हा उद्योगाचा पहिला महत्त्वाचा पाठ आहे. यामुळेच ग्राहकाचा विश्वास राखता येतो आणि इतरांपेक्षा आपला वेगळेपणा उठून दिसतो. कष्ट, मेहनत, चांगूलपणा यांच्याबरोबरीनं चतु:सूत्री पाळायला हवी.

 उद्योगाचा वेगळेपणा आणि आधुनिकता -

 लेथ मशिनवर जॉब करण्याचा अनेक जण करत असलेलाच व्यवसाय घारेमामा करत आहेत पण तरीही त्यांच्या उद्योगाचं स्वरूप इतरांपेक्षा वेगळं दिसतं. कारण घारेमामांनी आपली वेगळी क्षमता जाणीवपूर्वक सिद्ध केली आहे. उद्योग वाढवायचा आणि वाढता राखायचा असेल तरं उद्योगाचं स्वत:चं वेगळं वैशिष्ट्य आणि इतरांपेक्षा वेगळी क्षमता सिद्ध व्हायला पाहिजे हे घारेमामा ओळखतात.<

 त्यादृष्टीनी त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. अभियांत्रिकीची अनेक पुस्तकं, मासिकं ते आवर्जून वाचतात. तांत्रिक भागाचा अभ्यास करतात. या व्यवसायातले बदलते प्रवाह, नवी आव्हाने समजून घेतात. त्यासाठी पुण्या-मुंबईच्या प्रदर्शनांना भेटी देतात. यामुळे त्यांच्या उद्योगाला वेगळं परिमाण मिळालं आहे.

 अभियांत्रिकीची कुठलीही पदवी किंवा उच्च शिक्षण घेतलेले नसतानाही मामांनी अनुभवानं आपली तांत्रिक तज्ज्ञता स्वत: विकसित केली आहे. या अभ्यासातून त्यांनी उद्योगाची वेगळी शाखा चालू केली. त्यानुसार वर्कशॉपमधे ते नवीन डिझाइनसाठीची यंत्रे विकसित करतात. हे काम संख्यात्मक नसून गुणात्मक आहे म्हणूनच बाजारात त्याला सतत मागणी रहाणार हे गणित निश्चित आहे.

***


 आगळीवेगळी कलात्मक वाट   

 नाव - तानाजी नागू आरुडे .
 राहणार - नसरापूर, ता. भोर, जि. पुणे.
 शिक्षण - १२वी (वाणिज्य)
 व्यवसाय - बांबूच्या वस्तू
 उद्योगाचे नाव : आकार बांबू हस्तकला उद्योग
 शिबिर आयोजन आणि इतर मदत
 बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचं एक शिबिर ज्ञान प्रबोधिनीतर्फे वेल्ह्यात आयोजित करण्यात आलं होतं. शिबिरात तानाजी या बांबूच्या वस्तू बनवायला शिकले. बांबूच्या वस्तू म्हणजे सुपं, टोपल्या हे माहीत होतं. पण त्यापेक्षा वेगळ्या सुंदर व शोभिवंत वस्तू बांबूपासून बनवता येतात त्यातून चांगलं उत्पन्नही, मिळतं आणि हे बुरुडाच्या कामापेक्षा वेगळं असतं याची कल्पना नव्हती. अशा अनेक वस्तू प्रशिक्षणात योजलेल्या. तीच या कामाची सुरुवात म्हणता येईल. प्रबोधिनीकडून २,०००/- रुपये भांडवल घेऊन त्याने काम सुरू केले. याशिवाय नवीन वस्तूंच्या कल्पना, त्यासाठी नवी डिझाइन यासाठीही संस्थेतून मार्गदर्शन मिळालं. काही कामांची ऑर्डरही दिली. काही मालासाठी नवीन ओळखी संस्थेमुळे झाल्या. तर ग्रिटिंगसारख्या वस्तूंची विक्री योजनाही संस्थेने उपलब्ध करून दिली. या पाठबळामुळे आरुडेंचा जो मुळात छंद होता त्याचं उद्योगात रूपांतर होऊ शकलं.
 वस्तूंचं वैविध्य -
 या पार्श्वभूमीवर तानाजीनी अनेक वस्तू तयार केल्या. बाबूंची ग्रिटिंग कार्ड, दिव्यासाठी शेड, कप ठेवण्यासाठी कोस्टर, कप होल्डर, अॅॅश ट्रे, घड्याळाची केस, पेन ठेवण्यासाठी स्टँँड. नवीन वस्तू म्हणून बांबूचं कॅलेंडरही तयार केलं, आणि आता वस्तूच्या मागणीप्रमाणे स्वत: डिझाइन बसवून वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात.
 प्रक्रिया करताना -  बांबूच्या बहुतेक वस्तू या मूळच्या नैसर्गिक रंगातच केल्या जातात. पण तानाजीनी त्यावरची प्रक्रिया

करण्याची पद्धत आणि तीही नैंसर्गिक, स्वत: विकसित केली. त्याप्रमाणे आता बांबूच्या छटा, काळ्या व पिवळ्या रंगाच्या मिश्रणात वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळेही यांच्या वस्तूंचा वेगळेपणा उठून दिसतो व त्याला मागणी राहाते. या विषयाशी संबंधित काही पुस्तक वाचून, पाहून, प्रदर्शनांना भेटी देवून, बांबूवर प्रक्रिया करणाऱ्या संस्थेला भेट देऊन आरुडे यांनी आपला व्यावसायिक जम बसवला आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांनी आय.आय.टी. पवई येथेही डिझायनिंग विभागाला भेट दिली.

 बाजारपेठेपर्यंत -

 हा तयार झालेला माल बाजारपेठेत पाहोचवण्यासाठी काहीतरी व्यवस्था पाहिजेच. पुणे-बंगलोर अशा शहरांच्या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्यातून त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे तानाजी माल तयार करून देतो. मालाची ने-आण, विक्री व्यवस्था ही इतरांकडून केली जाते. त्यामुळे स्वत: बाजारपेठेपर्यंत जाण्यापेक्षा तसं काम करणाऱ्या अनुभवी व्यक्तींना माल पुरवणं हा मार्ग तानाजीनी स्वीकारला आहे. त्यांनी मालाचा दर्जा उत्तम असल्यामुळे संस्थेच्या वतीने त्याची विदेशातही विक्री होऊ लागली आहे.

 वाढता उद्योग - मदतनीसांची गरज -

 अशाप्रकारे ऑर्डर वाढत्या प्रमाणात मिळत आहेत. कामाचं प्रमाण वाढतं आहे त्यामुळे मदतीला माणसं पाहिजेत. पण त्याप्रमाणात कौशल्य असणारे मदतनीस मिळत नाहीत किंवा मिळाले तर ते हा उद्योग तात्पुरता करतात. त्यांची चिकाटी कमी पडते. पण तानाजींच्या मते हा व्यवसाय एक दर्जा, एक कौशल्य राखून सातत्यानं केल्यास त्यात यश नक्की आहे.

 या उद्योगाची प्रगती पाहून आता ते नवीन जागा बांधत आहेत. तिथे खरेदी केलेला बांबू ठेवायला जास्त जागा आहे. बांबूपासून तयार केलेल्या वस्तू हाताळायला थोड्या नाजूक असतात, त्याही सुरक्षित राहू शकतील व जास्त लोक एकावेळी काम करू शकतील अशी योजना आहे. त्यासाठी नवीन मदतनीसांच्या ते शोधात आहेत.

 बांबूपासून काय बनवायचं? तर नुसती सुपं, टोपल्या या पारंपरिक उत्तराला छेद देणारी उत्तरे आता वेल्ह्यातील अनेकजण देऊ लागली आहेत. तानाजीनं या उद्योगाला सुरुवात केली. आता बांबूचं काम म्हणजे परंपरागत 'बुरुड', ' कैकाड्याची कामं' असं न रहाता - जाणत्यांनी केलेली कौशल्यापूर्ण कलाकृती असं झालं आहे.

***

 पारंपारिक कलेला आधुनिक जोड   

 नाव - निवृत्ती हरिभाऊ सुतार

 शिक्षण - १०वी

 राहणार - वेल्हे, ता. वेल्हे, जि. पुणे.

 व्यवसाय - बांबूच्या वस्तू बनविणे

 उद्योगाचं नाव - तोरणा हस्तकला उद्योग.

 दहावीनंतर दिशा शोधताना-

 निवृत्ती हरिभाऊ सुतार या भारदस्त नावाचा हा अवघ्या २० वर्षांचा कृषि तांत्रिक विद्यालयातला मिसरुड फुटू लागलेला मुलगा. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर पुढे काय करावं? याचा विचार सुरू झाला. त्यातलाच एक प्रयत्न म्हणून शिवापूरच्या शाळेत निवृत्तीनी वेल्डरचं प्रशिक्षण घेतलं. तिथे पहिल्यांदा संस्थेशी संपर्क आला. त्यानंतर नागपूरला बांबूचा प्रशिक्षण वर्ग होणार असल्याची माहिती तिथूनच कळली. त्या प्रशिक्षणाला निवृत्ती गेला. तिथे बांबू निवडणं, त्यावर प्रक्रिया करणं इथपासून बांबूच्या अनेक वस्तूही शिकवल्या. यातून निवृत्तीला आपली दिशा सापडली. त्याचं ३ वर्ष काम केल्यावर अजून नवीन तंत्र शिकण्याची गरज भासली. संस्थेच्या मदतीने तो त्रिपुरातल्या अगरतळा येथल्या केंद्रावर ६ महिन्याचं पुढच्या टप्प्याचं प्रशिक्षणही घेऊन आला.

 स्वत:च्या उद्योगाला सुरुवात -

 घरामधे सुतारकामाची पार्श्वभूमी होतीच. वडिलांच्या या कामामध्ये निवृत्तीही मदत करत असे. बांबूचा प्रशिक्षण वर्ग केल्यानंतर सुतारकामाचं कसब बांबू या माध्यमात वापरावं असं त्याला वाटू लागलं. कौशल्य आणि तंत्र यांचा संगम झाला आणि त्यातून बांबूपासून तयार झालेलं स्वस्त, सुंदर घर आकाराला आलं. ३० फूट लांब बांबूचे वासे, तट्ट्या यातूनही मजबूत, सुंदर घर होऊ शकतं याची निवृत्तीला खात्री होती आणि त्या विश्वासाचं प्रत्यक्षात रूपांतर त्यानं करून दाखवलं.

 सुतारकामातून हा मुलगा बांबूच्या नादी लागला म्हणजे बुरुडाची कामं करायला लागला असंही काहींना वाटलं. पण हे काही कमी दर्जाचं काम नाही, तर कौशल्य आणि नवनिर्मितीचा आनंद हे या धंद्याचं वैशिष्ट्य आहे हे समजून निवृत्ती या व्यवसायात आला. सतत नवीन काहीतरी करण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. घरातूनही या कामाला पाठिंबा मिळाला.

 बांबूच्या या उद्योगाला भांडवल फार लागत नाही. कमी भांडवल, जास्त कसब, कौशल्य, सतत नावीन्य, खपाची आणि कामाची खात्री असं या धंद्याचं स्वरूप आहे. सुरुवातीला प्रबोधिनीकडून १०००/- रुपये कर्ज घेऊन या उद्योगाला सुरुवात झाली. पहिले काही वर्ष प्रबोधिनीकडूनच मालाची मागणी होत राहिली. कामाचं प्रशिक्षण, भांडवलाची सोय आणि बाजारपेठेशी संपर्क या तीनही गोष्टी वाढल्या आणि अप्रत्यक्षपणे उद्योगालाही त्याचा उपयोग झाला.

 इतरांना प्रशिक्षण दिलं -

 एकदा धंदा वाढायला लागल्यावर मदतीची गरज वाढली. पण हे कसब सहज कसे मिळणार? या भागातला हा नव्या प्रकाराचा व्यवसाय. त्यामुळे बांबूचं काम माहीत असणारे मदतनीस मिळेनात. मग निवृत्तीनं स्वत:च हाताखाली काम करण्यासाठी स्वत:च्या भावासह चार मुलांना प्रशिक्षण दिलं. आता निवृत्तीच्या शिकवण्यातूनच तयार झालेली चार मुलं आणि चार स्त्रिया काम करतात. ह्या धंद्याची वाढती गरज लक्षात आल्यावर निवृत्ती स्वत:हून इतरांना अशा प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देतो. आणखी लोकांनी शिक्षण घेऊन, माहिती जमवून उद्योगात पडावं असं त्याला वाटतं.

 नवीन शिकण्याची, करण्याची तयारी -

 बांबूच्या उद्योगात जास्त मागणी शो पिसेस सारख्या वस्तूंना असते. त्यामुळे त्यात सतत नवेनवे प्रयोग करून पहावेच लागतात. वेगवेगळ्या वस्तू बांबूपासून कशा करायच्या यासाठी काम करून पहावं लागतं, गरजेप्रमाणे बांबूवर प्रक्रिया करावी लागते. नवीन वस्तूंबरोबर नवीन डिझाइन्सही करावी लागतात. निवृत्ती सतत ३ वर्ष या नावीन्याच्या शोधात आहेत. लँपशेड, ग्रिटींग, पेनस्टँड, ट्रे अशा अनेकविध वस्तू त्यांनी स्वत: डिझाइन करून बाजारात आणल्या आहेत. त्यातही त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे बांबूचे वॉलबोर्ड, जे वर्षभराचं काम असत. गेल्या वर्षी त्यांनी अगदी नवी कल्पना प्रत्यक्षात आणली. बांबूच्या राख्या तयार केल्या. या वेगळ्या कल्पनेला पुष्कळ मागणीही मिळाली.

 निवृत्तीसारखा कलाकार सतत नवीनतेचा शोध घेतो आणि त्यातच त्याला आनंद मिळतो. कलाकारी आणि कलेबरोबर व्यवसाय अशी जोड इथे लाभली आहे.

 बाजारपेठेचा शोधही स्वत:च -

 तयार मालाची पहिली मागणी असते योग्य बाजारपेठेची. बाजारपेठेशी संपर्कात असणं आणि मालाला मागणी मिळवत रहाणं यावर उद्योगाची यशस्विता अवलंबून असते. हे मर्म जाणून निवृत्ती संस्थेच्या मदतीनंतर
आता स्वत:च बाजारपेठेपर्यंत जातात. त्यांनी स्वत: पुण्याला स्टॉल लावला. ठाण्यामध्ये स्वत:च मार्केटिंग केलं आणि त्यामुळे मार्केटिंगच्या मधल्या माणसाला मिळणारे पैसेही त्यालाच मिळाले. कच्च्या मालाच्या खरेदीपासून वस्तू बनविणे आणि बाजारपेठेपर्यंत नेणे या उद्योगाच्या सगळ्याच बाबी निवृत्तीसारखा पंचविशीतला युवक एकट्याच्या हिमतीवर करतो. आज ७-८ जणांना रोजगार उपलब्ध करून देतो. हे एक यशस्वी उद्योजकाचं उदाहरण नक्कीच म्हणता येईल.

***

 चिकाटीने करत राहायचं   

 नाव - विजयकुमार राजाराम शिळीमकर

 राहणार - कुरंगवाडी

 वय - २८

 शिक्षण - एस. एस. सी.

 उद्योग - शेळीपालन

 शेळीपालन -

 शिळीमकरांनी एक वेगळाच व्यवसाय निवडला आहे. शेळी पालनाचा. पूर्वी त्यांचा कुक्कुटपालनाचा उद्योग होता. त्यामध्ये तोटा आला आणि नवीन उद्योग निवडला शेळी पाळण्याचा. मनात सारं होतं पण पैशाच्या पाठबळाशिवाय काय होणार? कुणीच या व्यवसायासाठी पैसे देईना. मग त्यांनी १०,०००/- रु. संस्थेकडून कर्ज घेतले. अर्थातच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन ३ वर्षांपूर्वी त्यांनी या कामाची सुरुवात केली.

  प्रशिक्षणाने सुरुवात -

 कापूरहोळ इथे त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ ५ कोर्स केले. या प्रशिक्षण शिबिरात शेळीची निवड, त्यांच्या जाती, शेळीची निगा, विशिष्ट काळजी, त्यांचं खाद्य, ते खाद्य मिळवायचं कुठून, कसं, विविध आजार, त्यावरची औषधे अशी सर्वांगीण माहिती दिली जाते. असं प्रशिक्षण घेऊन आज एकाच गावात ४ जण शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत. या सर्वांची मिळून एक सोसायटी तयार करण्याचा विचार चालू आहे.

 घरी शेतीचा व्यवसाय -

 शिळीमकरांची १० एकर शेती आहे. सैन्यातून निवृत्त झालेले वडील, भाऊ सगळे शेती करतात. भात, ज्वारी, गहू, घेवडाही पीकं घेतली जातात. शेतीला पूरक असा व्यवसाय निवडायच्या दृष्टीनी त्यांनी कुक्कुटपालन सुरु केलं आणि त्याचबरोबर शेळीपालन करत आहेत. या सगळ्या कुटुंबाचा या उद्योगाला पाठिंबा आहेच.

 निराशेचे प्रसंग -

 २० शेळ्या, घेऊन ३ वर्षांपूर्वी या उद्योगाला सुरुवात झाली. २० च्या ५० आणि ५० च्या ८० शेळ्या झाल्या. उद्योग उभा राहणार असं दिसू लागलं आणि कुठल्यातरी साथीच्या रोगात अचानक एका दिवसात ४७ करडं दगावली. ३०-३२ शेळ्या वाचल्या आणि जणू पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करण्याची वेळ आली. पण शिळीमकर खचले नाहीत किंवा ह्या उद्योगाच्या नादी न लागता सरळ नवीन उद्योग सुरू करावा असंही त्यांना वाटलं नाही. उलट अशा प्रसंगातूनही निभावून जाणं त्यांना जास्त गरजेचं वाटतं.

 डोळ्यात तेल घालून निगराणी -

 सतत वाढत रहाणाऱ्या शेळ्यांसाठी शेतामध्ये जागा बांधली आहे. शेत घरापासून लांब आहे. रात्री-अपरात्री कोल्ह्यासारख्या जनावरांपासून भीती असते.म्हणून रात्री शिळीमकर शेतावरच राहतात. दिवसाही जनावरांकडे लक्ष ठेवावंच लागतं.

 याशिवाय शेळींचे आजार, औषधं अशी देखभाल करावी लागते. स्वच्छता राखावी लागते. एवढी निगा राखूनही एखाद्या नवीन, माहीत नसलेल्या रोगाला शेळ्या बळी पडतात.

 उद्योगाचं फलित अजून नाही -

 ३ वर्ष नेटानं, निगुतीनं हा उद्योग करूनही त्याचं फळ अजून मिळालं नाही व प्रत्यक्ष विक्री करून फायदा मिळाला असं फार घडलं नाही. पण या उद्योगाच्या क्षमतेची जाणीव शिळीमकरांना आहे. हा उद्योग यशस्वी होतो अशी खात्री आहे. म्हणूनच नवीन लोक या उद्योगात येत आहेत. आपण उद्योग सुरू केला आणि जमत नाही म्हणून बंद केला तर लोकांचा आपल्यावर विश्वास राहणार नाही. म्हणून ते म्हणतात. 'उद्योगात अपयश येतंच पण त्यातूनच जिद्दीनी वर जायचं म्हणून मी हा उद्योग करतो.

***


 अनुभवातून उद्योजकतेकडे   

 नाव :- पोपटराव पांडुरंग मोहिते

 राहणार :- शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे

 शिक्षण :- इंटरसायन्स

 व्यवसाय :- फॅब्रिकेशन

 व्यवसायाचे नाव:- रुपाली वर्कशॉप

 घरच्या आत्यंतिक गरिबीमुळे पोपटराव कऱ्हाडहून शिवापूरला नोकरीच्या शोधार्थ स्थायिक झाले. शिवापूरच्या कारखान्यात शिफ्ट सुपरवायझर म्हणून सुरुवातीला त्यांनी काम केले. नोकरीच्या निमित्तानेच ज्ञान प्रबोधिनीशी आणि प्रबोधिनीचे संस्थापक आप्पा यांच्याशी त्यांचे नाते जुळले.

 उद्योगांची सुरुवात :-

 मुळातच इंजिनिअरींग विषयाची आवड असल्याने नोकरी करतानाच उद्योगाची कल्पना पोपटरावांना सुचली. आपल्या नोकरीतील अनुभव आणि आप्पांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच कुटुंबाने वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन यामुळेच उद्योगाची सुरुवात तर उत्साहाने झाली. सुरुवातीला व्यक्तिगत असे ७० हजार रु. भांडवल गुंतविले.

 उद्योगातील आव्हाने :-

 उद्योगाच्या सुरुवातीला जाणवलेली मुख्य अडचण म्हणजे जागा आणि वीज.संस्थेच्या सहाय्याने या अडचणीवरही पोपटरावांनी मात केली. आपल्या उद्योगाचे सर्व आर्थिक व्यवहार ते स्वत: हाताळतात, मुलेही कामांमध्ये मदत करतात. आज त्यांच्याकडे बजाज टेम्पोचे स्पेअर पार्टस्, किर्लोस्कर, व इतर उद्योगाचे काम जोमाने चालू आहे. उत्पादित माल ते स्वतः कंपनीला पोहोचवतात.

 बाजारपेठेतील मंदीमुळे आज़ ऑर्डर अपेक्षेएवढ्या मिळत नाहीत. वेळ,पैसा आणि श्रमाचा अपव्यय यामुळे सरकारी योजनांमध्ये त्यांना रस नाही. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आज सुधारली आहे. दोन्ही मुलांनी चांगले शिक्षण घेतले आहे. वार्षिक ८०,०००/- च्या आसपास निव्वळ नफा होतो.

 उद्याची दिशा :-

 पोपटरावांना सतत काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते. त्यांच्या समकालीन अनेक उद्योग आज बंद पडले आहेत परंतु त्यांचा आपल्या कामावर पूर्ण विश्वास आहे. कष्ट, तन्मयता, सातत्य, वचनबद्धता, लोकसंपर्क,
नाविन्यता आणि स्वीकाराची वृत्ती ही यशस्वी उद्योगाची सूत्रे मोहिते यांना महत्त्वाची वाटतात. मुलांनी पुढे हा व्यवसाय चालू ठेवावा अशीही पोपटरावांची इच्छा आहे. नोकरीपेक्षा व्यवसाय बरा या उद्देशाने आज त्यांनी आणखीही एक वर्कशॉप उघडले आहे. त्यामध्ये ५ कामगार काम करीत आहेत.

***

 स्वावलंबनासाठी सततची धडपड   

 नाव : गुलाब सावळा कांबळे

 राहणार : कोंढणपूर, ता. हवेली, जि. पुणे.

 शिक्षण : ९वी पास

 वय : ४५

 कुटुंब : पत्नी आणि २ मुले

 व्यवसाय : शितल उद्योग

 संस्थेशी ऋणानुबंध :-

 गुलाबराव यांच्या घरची परिस्थिती बेताचीच.वाजंत्री वादन हा पारंपारिक व्यवसाय. शेती हेच त्यांच्या उपजिविकेचे मुख्य साधन, अशाच परिस्थितीमध्ये त्यांनी ९वी पर्यंतचे शिक्षण घेतले. गुलाबरावांचे मित्र डिंबळे यांच्या संपर्कातून आला. या मुलाखतीमधूनच त्यांना शिवापूरच्या यंत्रशाळेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि अशाप्रकारे त्यांचा प्रबोधिनीशी स्नेह जुळला.

 व्यवसायाच्या सुरुवातीला :-

 यंत्रशाळेमध्ये काम करतानाच यंत्रशाळेच्या व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून फॅब्रिकेशनचा उद्योग करण्याचे ठरविले. सुरुवातीला कुटुंबाकडून त्यांच्या या प्रयत्नांना फारसे प्रोत्साहन मिळाले नाही. प्रबोधिनीमध्ये काम करतानाच एक स्वतंत्र शिफ्ट चालू केली. त्यामध्ये २ कामगार ठेवले आणि उद्योग सुरू केला. उद्योग सुरू करताना त्यांना जागा, वीज, कामगार तसेच वाहतूक इ. प्रश्न भेडसावत होते. त्यावर त्यांनी धैर्याने मात केली आणि आज त्यांच्या उद्योगामध्ये त्यांच्याशिवाय ३ कामगार काम करतात. त्याचबरोबर दोन्ही मुलेही या कामामध्ये संपूर्ण सहकार्य करतात. उद्योगाचे सर्व आर्थिक व्यवहार गुलाबराव स्वत: बघतात. सरकारी योजना आपल्यासारख्या सामान्य माणसापर्यंत पोहचत नाही याची त्यांना खंत वाटते.
 सध्या काम कमी असते. त्यामुळे अनेकदा नोकरीच परवडली असती असेही त्यांना वाटते परंतु त्यांनी उद्योगाची जिद्द मात्र सोडलेली नाही. दरमहा ३००० रु.निव्वळ नफा होतो.

 उद्योगातून उद्योगाकडे :-

 गुलाबरावांना या उद्योगामध्ये आज महत्त्वाची समस्या जाणवते ती म्हणजे ऑर्डर कमी येतात आणि तयार मालाला भावही कमी मिळतो. या व्यवसायाबरोबर उत्पन्न वाढीसाठी त्यांनी एक सायकलचे दुकानही सुरू केले आहे. व्यवसायाबरोबर सुधारित पद्धतीने शेती करण्याची गुलाबरावांची इच्छा आहे. खूप शिकलं पाहिजे आणि सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं गुलाबरावांना वाटते. जेव्हा भरपूर काम मिळते तेव्हा उद्योगांमध्ये समाधान लाभते असेही त्यांना वाटते.मुलगा हाताशी आला.आता तोही उद्योगात लक्ष घालतो.

***

 भक्कम पाया महत्त्वाचा   8

 नाव :- राजकुमार प्रभाकर खुणे

 रहाणार :- शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे

 वय :- ३५

 शिक्षण :- १० वी.

 व्यवसाय:- बांधकाम

 व्यवसायचे नाव :- कुणाल कन्स्ट्रक्शनस्

 १९७२ च्या दुष्काळात खुणे यांचे कुटुंब सोलापूरहून उपजिविकेसाठी शिवापूरला स्थायिक झाले. शेतावर मजुरी करून संपूर्ण कुटुंबाचे उदरभरण होत होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये राजूभाऊंनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबर मजुरी करावी लागत होती त्यामुळे अर्थातच अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. त्याचाच परिणाम म्हणजे ते दहावीला नापास झाले. त्यामुळे त्यांचा शिक्षणातील उत्साह मावळला परंतु त्याच दरम्यान शिवापूरमध्ये शाळा निघाली. राजूभाऊंनी या शाळेमधूनच पुन: दहावीची तयारी केली आणि पास झाले. अशाप्रकारे शिक्षणामुळे त्यांचा ज्ञानप्रबोधिनींशी संपर्क आला. मजुरी करता करताच त्यांनी ६ वर्षे कात्रजला फॅब्रिकेशनचे काम केले. मजुरी करून आयुष्य घालविण्यापेक्षा कृषी तांत्रिक शाळेतील ज्ञानाच्या आधारे त्यांनी बांधकाम व्यवसाय करण्याचे
ठरविले.

 राजूभाऊंच्या धाडसी प्रयत्नांना ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिले. किरकोळ बांधकाम साहित्यासह उद्योग सुरू केला. सुरुवातीच्या काळात प्रबोधिनीनेच कामे मिळवून दिली. कामातील व्यवस्थितपणा..!दिलेला शब्द यामुळे फार थोड्या काळातच राजूभाऊंचे नाव शिवापूर खोऱ्यात पसरले. त्यांच्या या उद्योगाला कुटुंबाने प्रोत्साहन तर दिलेच याशिवाय कुटुंबातील सर्वजण सुरुवातीपासूनच या उद्योगामध्ये काम करतात त्यामुळे मजूर देण्याची वेळ सहसा येत नाही.

 राजूभाऊंच्या उद्योगाचे नाव कुणाल कन्स्ट्रक्शन आहे परंतु उद्योगाची नोंद अद्याप केलेली नाही. बांधकामातील सर्व आर्थिक व्यवहार ते स्वत: हाताळतात. आपल्या या व्यवसायातील प्रशिक्षण त्यांनी आपला धाकटा भाऊ, मेव्हणे आणि नात्यातील इतर ४-५ लोकांना दिले आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपातील बांधकामासाठी कुटुंबातील सर्वजण तत्पर असतात.

 सुरुवातीच्या काळात बांधकामाचे तंत्र नव्हते तसेच शारीरिक दुखापतीची भीती वाटायची परंतु अनुभवाने सरावाने सर्व गोष्टी जमत गेल्या. आपल्या या उद्योगामध्ये राजूभाऊ पूर्णत: समाधानी आहेत. त्यांच्या संपर्कामुळे सुदैवाने त्यांना कामेही पुष्कळ मिळतात आणि नाहीच काम मिळाले तर वेळप्रसंगी रस्ते, बंधारे खोदाईच्या कामावरही ते जातात.ज्ञानप्रबोधिनीच्या शिवापूर येथील महिला ग्राम उद्योग वास्तूचे संपूर्ण बांधकाम राजूभाऊंनीच केले आहे. तसेच कनक उद्योगाचे बांधकामही त्यांनीच केले आहे. पुण्यामध्येही ते सध्या बांधकामामध्ये गुंतलेले आहेत.

 आपल्या मुलांनी या व्यवसायाला उपयुक्त असे म्हणजेच इंजिनिअरींग, आर्किटेक्चरचे शिक्षण घेऊन ह्या उद्योगामध्ये नवीन तंत्रे आणून विस्तार करावा अशी त्यांची इच्छा आहे. बांधकाम उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर कोणतेही व्यसन नसावे नाहीतर शारीरिक दुखापत होऊ शकते तसेच दिलेली वेळ पाळली तर लोक आदराने कामे देतात हा त्यांचा स्वत:चा अनुभव आहे. बांधकाम व्यवसायाबरोबरच गावाकडे (सोलापूरला) शेती विकत घेऊन त्यामध्ये फळबाग करण्याचा त्यांचा विचार आहे. आपल्या या व्यवसायामध्ये राजूभाऊ पूर्णत: समाधानी आहेत.

***


 योग्य उद्योगांची सांगड   

 नाव :- तुकाराम नामदेव मुजुमले

 राहणार :- कोंढणपूर, ता. हवेली, जि. पुणे.

 शिक्षण :- ८वी

 वय :- ३८

 व्यवसाय :- अजय फॅब्रिकेटर्स

 संस्थेचे सहकार्य :-

 कोंढणपूरच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातील तुकाराम यांनी आपले ८वी पर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपल्या काकांकडे कामाची चौकशी केली. त्यांचे काका हे ज्ञान प्रबोधिनीच्या यंत्रशाळेमध्ये कामाला होते. त्यांच्या ओळखीनेच तुकाराम यांचा ज्ञान प्रबोधिनीशी संपर्क आला आणि तेही ट्रेनी ऑपरेटर म्हणून यंत्रशाळेमध्ये काम करू लागले. मासिक बचतीमधून स्वत: स्वतंत्र्यरित्या कामे घ्यायला सुरुवात केली.

 अनुभवातून उद्योगाकडे :-

 यंत्रशाळेतील वेगवेगळ्या विभागात काम करताना त्यांनी अनेक नव-नवीन गोष्टी शिकून घेतल्या. या सर्व अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वत: भांडवल जमा केले आणि छोटासा उद्योग सुरू केला. आज त्यांच्या अजय फॅब्रीकेटर्स मध्ये २४ तास २-३ कामगार काम करतात, वार्षिक १ लाख रुपयांची ते उलाढाल करतात.

 या उद्योगातील स्वत:चे शिक्षण आणि आवड यामुळे सरकारी मदतीशिवाय त्यांनी हा फॅब्रिकेटिंगचा उद्योग उभारला. सुरुवातीच्या काळात जागा, वीज, भांडवल अशा अडचणी आल्या. त्या त्यांनी कुटुंबाच्या मदतीने सोडविल्या. कुटुंबाचे मानसिक पाठबळ असल्याने आज उद्योगातील मंदीमध्येही ते आपल्या निर्णयावर ठाम राहून काम करतात.

 उद्योगाच्या यशाचे रहस्य :-

 तुकाराम यांची आर्थिक परिस्थिती या उद्योगामुळे सुधारली आहे. आज ते लहान-मोठ्या ऑर्डर घेऊन वेळेमध्ये पूर्ण करून देतात. उद्योगाबरोबरच सुधारित पद्धतीने शेती करण्याचा त्यांचा विचार आहे. शेतीला पूरक ठरविले.
 राजूभाऊंच्या धाडसी प्रयत्नांना ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिले. किरकोळ बांधकाम. साहित्यासह उद्योग सुरू केला. सुरुवातीच्या काळात प्रबोधिनीनेच कामे मिळवून दिली. कामातील व्यवस्थितपणा,दिलेला शब्द यामुळे फार थोड्या काळातच राजूभाऊंचे नाव शिवापूर खोऱ्यात पसरले. त्यांच्या या उद्योगाला. कुटुंबाने प्रोत्साहन तर दिलेच याशिवाय कुटुंबातील सर्वजण सुरुवातीपासूनचं या उद्योगामध्ये काम करतात. त्यामुळे मजूर देण्याची वेळ सहसा येत नाही.
 राजूभाऊंच्या उद्योगाचे नाव कुणाल कन्स्ट्रक्शन आहे परंतु उद्योगाची नोंद अद्याप केलेली नाही. बांधकामातील सर्व आर्थिक व्यवहार ते स्वत: हाताळतात. आपल्या या व्यवसायातील प्रशिक्षण त्यांनी आपला धाकटा भाऊ, मेव्हणे आणि नात्यातील इतर ४-५ लोकांना दिले आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपातील बांधकामासाठी कुटुंबातील सर्वजण तत्पर असतात.
 सुरुवातीच्या काळात बांधकामाचे तंत्र नव्हते तसेच शारीरिक दुखापतीची भीती वाटायची परंतु अनुभवाने सरावाने सर्व गोष्टी जमत गेल्या. आपल्या या उद्योगामध्ये राजूभाऊ पूर्णत: समाधानी आहेत. त्यांच्या संपर्कामुळे सुदैवाने त्यांना कामेही पुष्कळ मिळतात आणि नाहीच काम मिळाले तर वेळप्रसंगी रस्ते, बंधारे खोदाईच्या कामावरही ते जातात. ज्ञानप्रबोधिनीच्या शिवापूर येथील महिला ग्राम उद्योग वास्तूचे संपूर्ण बांधकाम राजूभाऊंनीच केले आहे. तसेच कनक उद्योगाचे बांधकामही त्यांनीच केले आहे. पुण्यामध्येही ते सध्या बांधकामामध्ये गुंतलेले आहेत.
 आपल्या मुलांनी या व्यवसायाला उपयुक्त असे म्हणजेच इंजिनिअरींग, आर्किटेक्चरचे शिक्षण घेऊन ह्या उद्योगामध्ये नवीन तंत्रे आणून विस्तार करावा अशी त्यांची इच्छा आहे. बांधकाम उद्योगामध्ये यशस्वी. व्हायचे असेल तर कोणतेही व्यसन नसावे नाहीतर शारीरिक दुखापत होऊ शकते तसेच दिलेली वेळ पाळली तरलोक आदराने कामे देतात हा त्यांचा स्वत:चा अनुभव आहे. बांधकाम व्यवसायाबरोबरच गावाकडे (सोलापूरला) शेती विकत घेऊन त्यामध्ये फळबाग करण्याचा त्यांचा विचार आहे. आपल्या या व्यवसायामध्ये राजूभाऊ पूर्णत: समाधानी आहेत.

नुसतचं वेगात काम केलं तर चुका होऊ शकतात    २०
योग्य उद्योगांची सांगड     

नाव :- तुकाराम नामदेव मुजुमले
राहणार :- कोंढणपूर, ता. हवेली, जि. पुणे.
शिक्षण :- ८वी
वय :-३८
व्यवसाय :- अजय फॅब्रिकेटर्स
 संस्थेचे सहकार्य :-
 कोंढणपूरच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातील तुकाराम यांनी आपले ८वी पर्यंतचे शिक्षण गावातच. पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपल्या काकांकडे कामाची चौकशी केली. त्यांचे काका हेज्ञान प्रबोधिनीच्या यंत्रशाळेमध्ये कामाला होते. त्यांच्या ओळखीनेच तुकाराम यांचा ज्ञान प्रबोधिनीशी संपर्क आला आणि तेही ट्रेनी ऑपरेटर म्हणून यंत्रशाळेमध्ये काम करू लागले. मासिक बचतीमधून स्वत: स्वंतंत्र्यरित्या कामे घ्यायला सुरुवात केली.
 अनुभवातून उद्योगाकडे :-
 यंत्रशाळेतील वेगवेगळ्या विभागात काम करताना त्यांनी अनेक नव-नवीन गोष्टी शिकून घेतल्या. या सर्व अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वत: भांडवल जमा केले आणि छोटासा उद्योग सुरू केला. आज त्यांच्या अजय फॅब्रीकेटर्स मध्ये २४ तास २-३ कामगार काम करतात, वार्षिक १ लाख रुपयांची ते उलाढाल करतात.  या उद्योगातील स्वत:चे शिक्षण आणि आवड यामुळे सरकारी मदतीशिवाय त्यांनी हा फॅब्रिकेटिंगचा उद्योग उभारला. सुरुवातीच्या काळात जागा, वीज, भांडवल अशा अडचणी आल्या. त्या त्यांनी कुटुंबाच्या मदतीने सोडविल्या. कुटुंबाचे मानसिक पाठबळ असल्याने आज उद्योगातील मंदीमध्येही ते आपल्या निर्णयावर ठाम राहून काम करतात.
 उद्योगाच्या यशाचे रहस्य :-
 तुकाराम यांची आर्थिक परिस्थिती या उद्योगामुळे सुधारली आहे. आज ते लहान-मोठ्या ऑर्डर घेऊन वेळेमध्ये पूर्ण करून देतात. उद्योगाबरोबरच सुधारित पद्धतीने शेती करण्याचा त्यांचा विचार आहे. शेतीला पूरक

स्वप्न पाहा, सुरुवात करा, यश तुमचेच आहे.    २१

 म्हणून त्यांनी कुक्कुटपालनही सुरू केले आहे. तसेच गावातील समाज मंदिराचे बांधकाम कंत्राटही घेतले आहे.

 उद्योगाच्या वाटचालीमध्ये तुकाराम यांना जाणवले की सतत नवीन काहीतरी केले पाहिजे. अर्थात समाजाबरोबर बदलले पाहिजे. आपले ज्ञान इतरांना दिले पाहिजे आणि सतत कष्ट करून वेळेमध्ये काम पूर्ण केले पाहिजे. शेती पाहून हा उद्योग आपल्या वेळेनुसार करता यता त्यामुळे दोन पैसे कमी मिळाले तरी वाईट वाटत नाही. त्यामुळे बांधील नोकरीपेक्षा आपला उद्योग बरा असेही त्यांना वाटते.

***

 अथक परिश्रमांचे फळ   १०

 नाव :- सुनील गेनबा घारे

 राहणार :- कात्रज, पुणे.

 शिक्षण :- १०वी

 वय :- ३०

 व्यवसाय :- प्रभात इंजिनिअरिंग

 घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे सुनीलचे शिक्षण मामांनीच केले. शिवापूर येथील प्रबोधिनीच्या शाळेतील पहिल्या बॅचचा विद्यार्थी सुनील. त्याने कृषीतांत्रिक शाळेमध्ये शिक्षण घेतले. शाळेतच टर्नर म्हणून त्यांनी सुरुवातीला काम केले. तेव्हापासूनच आपण एखादा उद्योग करावा अशी त्याची इच्छा होती.

 कष्टाला पर्याय नाही:-

 उद्योग करण्याचे तर ठरले परंतू भांडवलाचा प्रश्न उभा राहिला. त्यासाठी मित्रांनी मदत केली. याशिवाय नोकरीच्या बचतीमधून भांडवल उभारले. त्यातूनच एक मशीन खरेदी केले. सध्या बँकेकडून कर्ज घेऊन नवीन मशीन्स खरेदी केल्या आहेत. घरातून या व्यवसायासाठी विरोधच होता. चार भिंतींमध्ये राहन नोकरीमध्ये तेच ते काम करण्यापेक्षा उद्योगामध्ये नाविन्यता आणण्याचे सुनीलचे स्वप्न प्रभात इंजिनिअरींगच्या रूपाने अथक परिश्रमाने त्यांनी साकारले. सुनील यांचा उद्योग आज चांगलाच बहरला आहे. ३ कामगार आज या उद्योगामध्ये काम करत आहेत. अशाप्रकारे सुनील यांना स्वत:बरोबरच इतरांनाही रोजगार पुरवून समूह विकासाचा आदर्श
घालून दिला आहे.

 उद्योगाचे गणित असे :-

 आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानामुळे जुने तंत्रज्ञान मागे पडत आहे. त्यामुळे स्पर्धेमध्ये टिकाव धरण्यासाठी. उद्योगामध्ये नाविन्यता असायला हवी याचीही सुनीलला जाण आहे. त्यादृष्टीने त्याचे प्रयत्नही चालू आहेत. वर्कशॉपबरोबरच त्याने हार्डवेअरचे छोटे दुकानही सुरू केले आहे. दरमहा १०,००० ते १२,००० निव्वळ नफा होतो. सरकारी योजना गावपातळीवर पोहचायला हव्यात असे सुनिलना वाटते. आपल्या या उद्योगामध्ये त्यांना अनेक बरे-वाईट अनुभव आले. कामाची आवड, कष्टाची प्रवृत्ती आणि निर्णयक्षमता या गोष्टी उद्योगाच्या यशासाठी सुनीलना महत्त्वपूर्ण वाटतात. या उद्योगाबरोबरच ट्रेडिंगचा उद्योग करण्याचाही त्याचा विचार आहे.

***

 नित्य नवे शिकेल. तोच स्पर्धेत टिकेल   ११

 नाव :- रामचंद्र हरीभाऊ घोगरे

 राहणार :- रांझे, ता. भोर, जि. पुणे.

 शिक्षण :- डी. एम्. ई.

 वय :- ३०

 व्यवसाय :- युनिटेक इंजिनिअर्स अँँड सर्विसेस

 शिक्षणाची ओढ :-

 शेतीवर उपजिविका करून जगणारं रामचंद्र यांचं कुटुंब. घरामध्ये एकही व्यक्ती शिकलेली नसताना मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुढे कोल्हापूरला जाऊन त्यांनी डी.एम.ई. ची पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर त्यांनी ज्ञान प्रबोधिनीच्या यंत्रशाळेतील सर्व विभागांमध्ये काम केले. विविध ठिकाणची माहिती आणि अनुभव त्यांनी घेतला. त्या अनुभवातून प्रबोधिनीच्या सहकार्याने त्यांनी उद्योग सुरू केला.

 उद्योगाची सुरुवात :-

 स्वत:च्या अनुभवातून त्यांनी कुटुंबाच्या सहकार्याने छोटासा उद्योग सुरू केला. भांडवल आणि वीज या मुख्य अडचणींबरोबरच मालाची वाहतूक हा प्रश्नही उभा राहिला. त्यांनी हा प्रश्नही सोडविला. सुरुवातीला छोट्या ऑर्डर घेऊन काम सुरू केले आणि आज ते जीग फिक्चर्स, स्पेशल परपज मशीन्स, डेअरीमधील रेफ्रीजरेशन, मिल्क चिलिंग युनिट, स्टोअर्स स्टॅक्स इ. पार्टस् चे काम करतात.

 स्पर्धेचे युग :-

 सरकारी मदतीवर अवलंबून राहिल्यामुळे आळशीपणा वाढतो. त्यामुळे रामचंद्र यांनी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही. बाजारपेठेतील मंदीमुळे मालाला योग्य किंमत मिळत नाही. अशावेळी तडजोडीशिवाय पर्याय नसतो असे त्यांचे मत आहे.

 उद्योगाबरोबरच शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून सुधारित पद्धतीने शेती करावी असाही रामचंद्र यांचा विचार आहे. पुढे जाऊन त्यांना ग्रीन हाऊस आणि नर्सरीही सुरू करायची आहे. आज खर्च वजा जाता दरमहा जवळपास १४,००० ते १५,००० रु. निव्वळ नफा या उद्योगातून त्यांना मिळतो. उद्योग करायचा असेल तर कष्टाची तयारी, आशावाद, अनुभव आणि लोकांशी चांगले संबंध जोडता आले पाहिजेत असे रामचंद्र घोगरे यांना वाटते.

***





 थेंबे थेंबे तळे साचे 

 थेंबे थेंबे तळे साचे त्याचप्रमाणे पै पै जमवून पैसा वाढे हेही खरं आहे. आपल्या मिळकतीतला शक्य तेवढा वाटा बाजूला टाकून बचत करण्याचं तंत्र आपल्याला आता नवीन नाही. बँका-बँकातून ते गावोगावी पोहोचलंय. पण अर्धशिक्षित, फक्त अक्षर ओळख असणाऱ्या काहींना आणि घरच्या कामाचा मोठा बारदाना असणान्या आम्हा बायकांना तर बँक सोयीची वाटत नाही. एकूण उद्योजकतेचा किंवा स्वयंरोजगाराचा विचार ग्रामीण महिलांच्या बाबतीत करायचा झाला तर ग्रामीण युवकांपेक्षा काही वेगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. ज्ञान प्रबोधिनी संस्थेने ग्रामविकसन विभागातर्फे १९९५ साली बचत गटांना सुरुवात केली. गावातल्या बायांनी आपल्याला जमेल अशी थोडीशी रक्कम म्हणजे महिना १०रु. एकत्र करायचे. आणि महिन्यामहिन्यांनी वाढत जाणारी ही रक्कम आपल्यातल्याच बाईच्या अडीअडचणींसाठी तिला व्याजाने वापरायला द्यायची अशी सुरुवात झाली. यातून आर्थिक व्यवहाराची सवय व्हायला लागली.

 हळूहळू गटातल्याच बायका पैसे जमवणे, वाटणे, त्याची वसूली, व्याजाची रक्कम जमा करणे आणि पुन्हा वाटप करणे असे व्यवहार स्वत: करू लागल्या. एकाचे शंभर गट झाले. पैशाच्या व्यवहाराची सवय अंगवळणी पडल्यावर फक्त अडीअडचणीला पैसे मागण्याऐवजी ह्या पैश्यांच्या आधारावर पैसे मिळवण्याचा विचार सुरू केला. आणि हाच तर या गटांचा मुख्य उद्देश होता. पैशातून पैसा निर्माण करण्यासाठी म्हणजेच उद्योग करण्यासाठी भांडवल म्हणून बचत गटातली रक्कम उचलली जावू लागली. बी रुजवल्यापासून रोप तयार होऊन पीक हाती यायला काही महिन्यांचा काळ द्यावा लागतो. त्या रोपासाठी मेहनत घ्यावी लागते. बचत गटाचं हे रोप रुजायला मात्र काही वर्ष लागली आणि आता ५ वर्षांनंतर त्याला फळं धरू लागली आहेत आणि या रोपाला ही फळं धरण्यासाठी अनेकांनी अनेक प्रकारची मेहनत घेतली आहे. एरवी, घराबाहेर पडणं मुश्किल होतं. परंतु गटभावनेमुळे सर्वजणी महिला असल्यानं घराबाहेर पडून, चार माणसांत मिसळणं शक्य झालं. त्यातून आत्मविश्वास वाढून काहीतरी करण्याची उर्मी वाटू लागली. ह्या उर्मीचं बऱ्याच जणींनी उद्योग करण्यात रुपांतर केलं. याला उद्योग म्हणण्यापेक्षा स्वयंरोजगार म्हणणं अधिक उचित वांटतं. ग्रामीण भागाचा विचार केला तर युवकांपेक्षा महिलांसाठी स्वयंरोजगाराचं काम करणं जास्त अवघड आहे. त्यांच्यासाठी काही प्रक्रिया जाणीवपूर्वक वेगळ्या पध्दतीने हाताळायला लागतात.

 एखादीकडे कौशल्य असते, पणं भांडवल नसते, एखादीकड़े कष्ट करण्याची तयारी असते पण लोकांशी आत्मविश्वासाने बोलण्यासाठी धिटाई नसते. एखादीकडे उद्योग करण्याची मनापासून तयारी असते पण घरून
 पाठिंबा नसतो, व्यवहारात कुठं कमी पडू की काय अशी भीती असते. या सगळ्या गोष्टी बचत गटामुळे जमतात. कुठलीच व्यक्ती एकदम बदलत नाही हळूहळू बदलते. दरमहा होणाऱ्या बचत गट बैठकांमधून स्वत:मधलं उणेपण दूर करण्याची संधी मिळत,विश्वास वाढतो, धिटाई येते, परवडणारी गणितं कळू लागतात आणि त्यातून एखादी उद्योगाची कल्पना प्रत्यक्षात येते. अशा कल्पना साकारण्यासाठी १० प्रयत्न झाले तर त्यातला एखादा उद्योग यशस्वी होतो. अशा धडपडणाऱ्या महिलांच्या छोट्या मोठ्या कथा.

***

 उद्योजिकेच्या घरी लक्ष्मी वास करी   १२

 नाव - सौ. सावित्रा दिनकर वाडकर

 राहणार - ससेवाडी

 शिक्षण - ४थी

 वय -४५ वर्ष

 व्यवसाय - दूध व्यवसाय, शेती, गिरणी, शिवणकाम

 उद्योगी कुटुंब आणि कुटुंबांचे उद्योग -

 वाडकरांचं घर हे एक उद्योगशील घर आहे. स्वत: दिनकर वाडकर आणि सौ. सावित्राबाई वाडकर दोघेही उत्साही आणि कामसू. घर, कुटुंब आणि उद्योग या तिन्ही गोष्टी तिथे इतक्या एकजीव झाल्यात की त्या वेगवेगळ्या करून पहाताच येणार नाहीत.

 उद्योगांची सुरुवात -

 प्रबोधिनीने आयोजित केलेल्या १९९० च्या प्रशिक्षण शिबिरात सावित्राबाईंनी शिवणाचं प्रशिक्षण घेतलं. कोर्समधे शिवणाचे नवनवीन प्रकार शिकवले गेले. ते पाहून आणि यजमानांनाही आवड असल्यामुळे शिवणाचा व्यवसाय करावा असं त्यांनी ठरवलं. तर गावातल्या गिरणीत पीठ नीट दळून मिळायचं नाही. जाड दळलं जायचं. पीठ कमी यायचं असा त्रास व्हायला लागला. म्हणून मग घरीच गिरणी घ्यावी असा विचार पक्का केला.
घरच्यासाठी घेतलेल्या या छोट्या यंत्रावर मग गावातल्या इतरांचीही दळणं व्हायला लागली अर्थात उद्योग म्हणून. घरची शेती आणि म्हशी होत्याच. मग त्यातही काही वाढ करावी, सुधारणा करावी असं वाटायला लागलं. त्याचंही थोडं प्रशिक्षण घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू केला, भांडवल उभं करून आणखी म्हशी घेतल्या आणि आज दिवसाला ४० लिटर दूध विकलं जातं.

 या शिवाय गावात रोजंदारीवर मोठे काम सुरू असताना तिथल्या लोकांना सावित्राबाईंनी जेवायलाही घातलं आहे. त्यांना जागा भाड्याने देणे आणि खानावळ असेही उद्योग थोड्या काळासाठी त्यांनी केले आहेत.

 प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य -

 गिरणीची चक्की विकत घेताना १०,००० रुपये कमी पडत होते. ती रक्कम बचत गटामार्फत सावित्राबाईंना मिळाली. आणि भर घालून त्या चक्की घेऊ शकल्या.वेगवेगळ्या उद्योगांना आत्तापर्यंत त्यांनी गटातून ६०,००० रुपये अर्थसहाय्य घेतले तर इतर व्यवसायासाठी प्रशिक्षण वर्गांचा उपयोग त्यांना झाला.

 नफ्याशिवाय उद्योग होतो का?' हा सवाल सावित्राबाईंना करताच त्या म्हणतात, नफा मिळत असल्याशिवाय कोणी माणूस उद्योग करेल का? अर्थात उद्योगातून दर वेळी नफा मिळतोच, कमी किंवा जास्त एवढंच.' वाडकर कुटुंबाचा सगळ्याच उद्योगांचा अनुभव चांगला आहे. सावित्राबाईंच्या सर्वच उद्योगांना वर्षभर भरपूर खप आहे. खर्च आणि नफा यांच्या ताळमेळाचा विचार करून त्या मालाची किंमत ठरवतात आणि डोळसपणे उद्योग करतात. घरातले सगळेजण लागेल, पडेल आणि असेल ते काम करतात. त्याला योग्य ते प्रशिक्षण, मार्गदर्शन घेतात. उद्योगातल्या शंका विचारतात, सल्ला घेतात आणि स्वत: त्याचा ताळमेळ घालतात. उत्साह, चिकाटी, कामसूपणा, निरीक्षण, सल्लामसलत, प्रशिक्षण, हिशोब, ताळमेळ या खांबांवर वाडकरांचे उद्योग यशस्वीपणे चालू आहेत.

 उद्योग यशस्वितेचं घरामधे प्रतिबिंब -

 यशस्वी उद्योग म्हणजेच आर्थिक स्थैर्य, सुबत्ता. या यशस्वितेचं प्रतिबिंब वाडकरांच्या घरामध्ये सहजपणे दिसतं. त्यांचा शिवणाचा जम व्यवस्थित बसला पण गावात पुरुषांचे कपडे शिवणारा शिंपी नाही म्हणून त्यांनी मुलाला आय. टी. आय.ला शिवण शिकायला पाठवले. आता त्यांच्या घरी मोटारीवर चालणारी दोन शिलाई यंत्रे, गिरणीची चक्की, ५ म्हशींचा मोठा गोठा हे त्यांच्या उद्योगाचं चित्र. तर त्याचबरोबर, रंगीत टि.व्ही. मिक्सर, मोटारसायकल, इमर्जन्सी लॅम्प, नऊ खोल्यांचं मोठं घर अशा अनेक सुविधा सहजपणे बघायला मिळतात.

***

 बाई मोठी जिद्दीची   १३

 नाव- द्वरकाबाई निवृत्ती वालगुडे

 राहणार - वेल्हे, ता. वेल्हे, जि. पुणे.

 शिक्षण - अजिबात नाही. फक्त सहीकरता येते

 अपत्य - ४ मुली

 आर्थिक स्थिती - सुरुवातीला अतिशय हालाखीची

 व्यवसाय - खानावळ

 माहेरी चांगली शेती. राबणारे भाऊ आणि खातं-पितं घर अशा पार्श्वभूमीवर द्वारकाबाईंचं निवृत्ती वालगुडे यांच्याशी लग्न झालं. सासरची आर्थिक परिस्थितीही चांगली. नवरा राहायला पुण्याला. रिक्षाचा धंदा. सारं नेटकं चालू होतं. पण दारूनं घात केला. होत्याचं अगदी नव्हतं झालं. चार मुलींसकट घरातून बाहेर पडावं लागलं. माहेरी छप्पर मिळालं पण पोटाचं काय? पदरी चार लहान मुली.

 अशा कसोटीच्या वेळेला द्वारकाबाई खचल्या नाहीत. घर सावरायचंच या जिद्दीनी कामाला भिडल्या. स्वत: शेतात मजुरी करायला लागल्या. पण घर मानानं उभं करायचं, ताठ मानेनं जगायचं तर याहून वेगळं काही करायला हवं. द्वारकाताईंनी धाडस केलं. बचत गटामुळे नेमानं घराबाहेर पडणं व्हायला लागलं. गटाच्या बळावर वेल्ह्यात उद्योग उभा करण्याचं त्यांनी ठरवलं. ९८ साली मे महिन्यात १५० शिक्षकांचा प्रशिक्षण वर्ग होता. त्यांना जेवू-खाऊ घालण्याचं कंत्राट यांनी गटाच्या जिवावर घेतलं. त्यासाठी साहेबांना भेटणं, त्यांच्याशी तपशील ठरवणं हे सगळं त्यांनी स्वत: पुढाकारानं केलं.

 अर्थात कामाची तयारी असली तरी भांडवल हवं होतं. आगाऊ रक्कम मिळणार नव्हती. मग द्वारकाताईंना ज्ञान प्रबोधिनीतून तात्पुरते पैसे मिळण्याची सोय झाली. ताईच्या मदतीने सगळी खरेदी पुण्यातून केली. मुली आणि इतर काही बायकांच्या मदतीनं १५० माणसांचा नाष्टा, जेवण, चहा सगळं केलं आणि त्या श्रमाचा मोबदला फायद्याच्या रूपानं दिसला. वर्षभर मोलमजुरी करून मिळणारी रक्कम १० दिवसांच्या उद्योगात मिळाली. त्यामुळे उद्योग केला तर पैसा मिळतो हा विश्वास वाढला.

 उद्योग यशस्वी झाला. घरी बरकत आली आणि नवराही परत आला. त्यानं दारू सोडली. या अनुभवाच्या शिदोरीकर नवरा-बायको दोघांनी मिळून पुढचा व्यवसाय चालू केला. चापेटच्या धरणावर खानावळ चालू केली. मग त्यात नवऱ्यालाही बरोबर घेतलं. रोज ३० माणसांचे जेवण, चहा, खाणं याला सुरुवात झाली. उद्योगातून
उद्योग वाढला. पैसा आला आणि मुख्य म्हणजे संसार सुरळीत चालू झाला. मुलींची शिक्षणं नीट मार्गी लागली. सोनं घरात आलं. चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. आता सिझनला तीन लाखाच्या वर त्यांची उलाढाल असते.

 द्वारकाबाईंना जेव्हा विचारलं, 'तुम्हाला हे सगळं केल्यामुळे काय मिळालं?' - यावर त्यांचं उत्तर फार बोलकं आहे. त्या म्हणतात - 'माझा संसार सुखाचा झालाच पण मला हे दाखवून द्यायचं होतं की बाई कशातही कमी नसते. शिक्षण नसलं पर जिद्द असली तर बाई सगळं करू शकते.

***

 उद्योगाचं रोपटं मोठं केलं   १४

 नाव - कल्पना बाबू बुचडे.

 राहणार - बोरमाळ, शिवरे, ता. भोर, जि. पुणे.

 शिक्षण - निरक्षर

 वय - ४० वर्ष

 व्यवसाय - केरसुण्या, दोरखंड वळणे

 भारतीय संस्कृतीनं स्वच्छतेला, टापटिपीला फार महत्त्व दिलंय. त्यातूनच 'हात फिरे तिथे लक्ष्मी वसे' अशी म्हण रूढ झाली. याचंच एक रूप म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणारी केरसुणीची पूजा.

 कल्पनाताई आणि त्यांचे यजमान बाबू बुचडे हे पति-पत्नी मिळून प्रत्यक्ष लक्ष्मी वळण्याचं म्हणजेच केरसुण्या वळण्याचं काम करतात. कल्पनाताई बचतगटाच्या सदस्या आहेत. काम चालू करताना त्यांनी गटातून भांडवल म्हणून उचल घेतली. गटामुळे धंदा मोठा केला.

 सरकारी योजनेचा लाभ -

 थोडं भांडवल स्वत:चं उभं केलं आणि जोड म्हणून सरकारी योजनेचाही लाभ करून घेतला. त्याअंतर्गत बाबू बुचडे यांनी घायपाताची भोरहून खरेदी केली.

 आता ही दोघं घायपातापासून दोर काढून दोरखंड वळतात, केरसुण्या वळतात. वाख काढतात. हा काढलेला वाख शोभवंत वस्तू करण्याच्या उद्योगाला विकतात. घायपात पाण्यात भिजवून, प्रक्रिया करून धागा
 काढावा लागतो. हे काम कल्पनाताईंना पूर्वीपासून येत होतेच. त्याचाच उपयोग करून घेऊन त्यापासून पुढचा म्हणजेच केरसुण्या तयार करण्याचा उद्योग त्यांनी चालू केला. केरसुणी तयार करण्याच्या प्रक्रियेला ४-५ दिवस लागतात. हे कष्टाचं काम हे दोघे गेली ३ ते ४ वर्ष करत आहेत.

 विक्रीसाठी स्वत: बाजारपेठेकडे -

 आपण तयार केलेला माल विकण्याची जबाबदारीही त्यांनी स्वत:च उचलली आहे. एस्. टी. तून डोक्यावर भारे वहात हे दोघे गोगलवाडी, नसरापूर अशा आसपासच्या गावांतून बाजाराला जातात. लक्ष्मीपूजनाच्या वेळी सगळ्यात जास्त आणि चांगल्या भावानी विक्री होते. अशावेळी ते पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी विक्रीसाठी जातात.

 मुलाला शिकवायचं -

 हे काम करून उरलेल्या वेळात कल्पनाताई आणि बाबू बुचडे बिगारीचही काम करतात. ही सगळी धडपड आहे आपल्या मुलाला शिकवून मोठं करण्यासाठी. त्याला असा कमी मानाचा धंदा करायला लागू नये म्हणून. पण शाळेत शिकणारा त्यांचा मुलगा त्यांना या उद्योगात मदत करतो. हिशोब तोच ठेवतो म्हणजे जणू घरातच उद्योगाचं प्रशिक्षण आणि अनुभव.

***

 योग्यव्यवसायाची निवड   ११

 नाव - सौ. शालन दत्तात्रय तळेकर

 राहाणार - आंबवणे, ता. वेल्हे, जि. पुणे.

 वय - ३५

 शिक्षण - ७वी पास

 व्यवसाय - भाजीपाला दुकान, शिवण मशीन

 आंबवणे गावात अगदी हमरस्त्यावर शालनताईंचं छोटसं घर आहे. या वर्दळीच्या रस्त्यावर शालनताईंनी घराच्या समोरच आपल्या उद्योगाला सुरुवात केली.
 शिवण कलेतून उद्योगाचा पाया -

 साधारण ८५ साली स्टेट बँकेकडून कर्ज घेऊन शालनताईंनी व्यवसाय सुरू केला. शिवण येत होतंच. तेच उद्योग म्हणून त्या करू लागल्या. बायकांसाठी त्या मशिनवर कपडे शिवायला लागल्या. दररोज साधारण ६-७ तास म्हणजेच जवळ जवळ नोकरीच्या वेळा इतकंकाम त्या करतात. हमरस्त्यावर दुकान असल्यामुळे गावातल्याप्रमाणेच परगावचीही गिऱ्हाईक येतात. सणासुदीच्या वेळेला, परगावाच्या गिऱ्हाईकांकडून चांगला फायदा मिळतो.

 आपल्या अंगच्या या कलेचा उपयोग त्या इतरांसाठीही करतात. ज्ञान प्रबोधिनी संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिवणवर्गात त्या शिकवतात. फक्त आपल्या गावातच नाही तर कातवडीला किंवा दुसऱ्या गावातही त्यांनी शिवणवर्गात मुलींना शिकवलं आहे. यातून त्या आपल्याप्रमाणेच गावातल्या इतर मुलींनाही उद्योगाची वाट दाखवून देत आहेत.

 एकातून दुसऱ्या उद्योगाकडे -

 वाढत्या घराबरोबर गरजाही वाढायला लागतात. एखादा उद्योग असला तरी त्यातून मिळणारं उत्पन्न अपुरं वाटायला लागतं. म्हणून शालनताईंनी २ वर्षांपूर्वी बचत गटातून ५००० रुपये कर्ज उचललं आणि घरातंच आणखी एक व्यवसाय चालू केला. त्यांनी भाजीपाल्याचं दुकान चालू केलं. त्यांच्या बरोबरीनं मग चहाही चालू केला. घर रस्त्यावर असल्याच्या दृष्टीनं ह्या उद्योगांची निवड बरोबर ठरली.

 पतीचं सक्रीय सहकार्य-

 शालनताईंचे पती गावाचे कोतवाल आहेत. घरची पाऊण एकर शेती आहे. त्यात थोडा गहू, भात ते घेतात. या कामांव्यतिरिक्त ते स्वतः दुकानासाठीही मदत करतात. भाजीपाल्याची पुण्याहून दर २ ते ३ दिवसांनी खरेदी करतात. नसरापूरहून इतर सामानाची खरेदी करतात. ते स्वत:ही दुकानावर उभे राहतात. चहा तयार करून देतात. अशाप्रकारे 'एकमेकां साह्य करू' या तत्त्वावर दांपत्य आपले छोटेखानी २/३ उद्योग, शेती आणि घर सांभाळत आहेत.

***

 केलंकी सारं जमत जातं   १६

 नाव - नीराताई सुरेश सुतार

 राहणार - खोपी, ता. भोर, जि. पुणे

 वय - ४५ वर्ष

 शिक्षण - ५वी

 व्यवसाय - कांडप यंत्र

 नीराताई म्हणजे एकदम स्पष्ट वक्त्या आणि मोकळ्या स्वभावाच्या. त्यांनी दीड वर्षापूर्वी कांडपाचं यंत्र घेतलं आणि हळद-मिरची वगैरे कांडून देण्याचा व्यवसाय चालू केला. घरची एक एकर जमीन पण कोरडवाहू त्यामुळे दुसऱ्या उत्पन्नाची सोय हवीच होती. विशेषत: उन्हाळ्यासाठी काम हवं होतं. शेतीतून उरलेल्या वेळामधे चालवता यावा असा व्यवसाय हवा होता.

 असा कोणता उद्योग सुरू करता येईल? तर लक्षात आलं आपल्या गावामध डंख म्हणजेच मसाला कांडप मशिन नाही. कांडून घ्यायला ४ किलोमीटर लांब असणाऱ्या शिवापूर किंवा नसरापूरला जावं लागायचं. मग जर गावातच त्याची सोय झाली तर गावातल्यांनाही लांब जायला नको काम इथे होण्याचा खात्री असली की आपल्याकडे लोक नक्की येणार. अशा दोन्ही फायद्यांचा विचार करून नीराताईंनी कांडप मशीन घ्यायचं ठरवलं

 या मशिनची किंमत होती १६,००० रुपये घरचे सहा हजार जमत होते. मग कमी पडणारे दहा हजार बचत गटातून मिळाले आणि कांडप यंत्र घेणं सोपं झालं. यंत्र खरेदी तर झाली पण ते यंत्र चालवायचं कसं? निराताईंनी कुठे प्रशिक्षण घेतलं नाही किंवा कुणी शिकवणारं माणूसही भेटलं नाही. मग यंत्राबरोबर मिळणारं माहितीचं पुस्तक आणि आपला अनुभव यातुनच त्या शिकत गेल्या. यंत्राबरोबर प्रयोग करून बघत बघतच काम समजायला, जमायला लागलं.

 हे प्रयोग करून बघतानाच काही अनुभव आले. यात बाजरी करता येईल का नाही? माहीत नव्हतं पण प्रयत्न केला आणि बाजरी छान झाली आणि हळकुंड पहिल्यांदा घातली तर ती बाहेरच जास्त उडाली पण अशा वापरण्यातून यंत्राची सवय होत गेली. आता खोपीतून आणि त्याच बरोबर आजूबाजूच्या गावातूनही
त्यांना काम येतं. या निमित्तानं गटातल्या, गावातल्या बायांची सोय झाली.

 हे काम नीराताई आपल्या घरातच करतात. त्यांना वाटतं की बाहेर जावून १० ते संध्याकाळी ६ पर्यंत काम करून दिवसाचा २५-३० रुपये रोज घेण्यापेक्षा घरातल्या घरात राहून जास्त पैसे या उद्योगात मिळू शकतात. पण अर्थातच घरातलं काम झाल्यामुळे त्याला वेळेचं बंधन रहात नाही तर लागेल तितक्या वेळेला काम करण्याची तयारी ठेवावीच लागते. मग दिवसाला २०० ते २५० रुपयांपर्यंतही काम मिळतं. शिमग्यापासून पावसाळ्याच्या आधीपर्यंत कांडपाचं काम चालू रहातं. म्हणजे वर्षातले ६ महिने हा व्यवसाय व्यवस्थित चालू रहातो. या कामात कॉलेजात शिकणारे संदीप आणि योगेश हे सुद्धा त्यांना मदत करतात.

 नफ्या-तोट्याचा हिशोब -

 कुठलाही उद्योग करायचा तर त्याचा हिशोब करून किंमत ठरवणं महत्त्वाचं आहे. नीराताईंनी असाही विचार केलाय. भाव असा पाहिजे की आपल्याला परवडायलाही हवं आणि इतर गावातल्या भावांशी त्याचा ताळमेळही हवा. त्यामुळे आपल्याला येणारा खर्च, लाईटबील, भांडवल या बरोबर पुणे, नसरापूर इथला भाव या सर्व बाबींचा विचार करूनच निराताईंनी किलो प्रमाणे आणि धान्याप्रमाणे भाव निश्चित केला आहे.

 उद्योग विस्तार -

 पैशाची ओढाताण होत असल्यामुळे नीराताईंनी हाताखाली कामाला कुणी घेतलं नाही. यंत्रावरचं काम, हिशोब, आवरणं सगळं त्याच करतात. आजूबाजूच्या गावात आणखीही कांडप यंत्रे आहेत. त्यामुळे उद्योग वाढवायचा कसा? असा प्रश्न आहे. एखाद्या कंपनीबरोबर हेच काम करता आलं तर या उद्योगाची व्याप्ती वाढेल म्हणून त्यांना कंपनीचं एकदम मोठं काम घ्यायची इच्छा आहे.

***

 उद्योजकतेचे इतर काही अनुभव

 आपण ज्यांच्या उद्योगाची तोंड ओळख आत्तापर्यंत करून घेतली अशासारखी अजूनही काही उदाहरणं नक्कीच देता येतील. त्यातल्या काहींची प्रातिनिधिक स्वरूपात आपण ओळख करून घेतली. पण प्रातिनिधिक म्हणताना हे सगळे आर्थिकदृष्ट्या यशस्वी उद्योग म्हणून याकडे पाहिलेलं नाही. हे प्रतिनिधी निवडताना इतरही काही मुद्दे डोळ्यासमोर होते. उदाहरण द्यायचं तर त्या व्यक्तीची शैक्षणिक, कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती? व्यवसायाची निवड कशा प्रकारे केली आहे, प्रबोधिनीकडून कोण-कोणत्या स्वरूपाची मदत यांना मिळाली, किती प्रकारचे प्रयत्न उद्योग चालविण्यासाठी केले - अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून हे प्रतिनिधी आपण निवडले.

 यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योजक आहेत ते शिवापूरच्या कृषितांत्रिकमध्ये प्रशिक्षित झालेले. तांत्रिक शिक्षण आणि स्वत:चा उद्योग सुरू केल्यावर जॉब अशा दोन्ही गोष्टी त्यांना प्रबोधिनीकडून सुरुवातीस मिळाल्या. ससेवाडीतल्या चंद्रकांत वाडकरांसारख्यांनी त्याचा फायदा घेऊन मग स्वत:च्या कौशल्याची भरही घातली. ऑफसेटच्या व्यवसायात दिवसाला जास्तीत जास्त प्लेट तयार करण्याचं कौशल्याचं काम त्यांनी केलं. लेथची ३ यंत्रे खरेदी केली. ४-५ कामगार तयार केले. महिन्याला ७ ते १५ हजारापर्यंत उलाढाल ते या उद्योगांतून करत होते. मंदीच्या काळात मात्र त्यांना हा उद्योग सावरता आला नाही. वेळूगावच्या संजय घाटे यांनीही याच प्रकारे उद्योग उभा केला पण मंदीमुळे तेही यशस्वी होऊ शकले नाहीत.

 कर्ज योजनेचा लाभ -

 काहींनी प्रबोधिनी संस्थेकडून कर्जयोजनेतून लाभ घेतला आणि ती रक्कम शेतीसाठी योग्य प्रकारे वापरली. सांगवी- ता. भोर इथले श्री. नरेंद्र लोळे हे त्यापैकी एक. त्यांची ११ एकर शेती आहे. त्यांनी ९६ साली नांगरटीसाठी कर्ज घेतलं आणि त्यांचं ज्वारी, भात इ. मालाचं उत्पन्न नेहमीपेक्षा दुप्पट झालं. त्यातून पुढचं भांडवल वाढलं. कुसगाव इथल्या राधिका कृष्णा वाशिवले यांनी बचत गटातून ९६-९७ मध्ये कर्ज उचललं. ते त्यांनी क्रेन आणण्यासाठी वापरले. विहीर खोदायची क्रेन त्यांचे मालक चालवतात. दोन वर्षांत त्यांनी कर्जफेडही केली. तर कुसगावच्याच गुणाबाई पर्वती मांढरे यांचे मालक रिक्षा ड्रायव्हर आहेत. त्यांनी गाडी खरेदी आणि गाडी दुरुस्तीसाठी कर्ज वापरलं.

 वरवे-खुर्द इथल्या रहिवासी लीलाबाई मुरलीधर बुरडे मोठ्या जिद्दीच्या. त्या गावाकडे एकट्या रहातात. शेतीची सगळी कामं स्वत: बघतात. त्यांचा नवरा, मुलगा, सून सगळं कुटुंब नडगावला राहतं. बचत गटातून कर्ज घेऊन त्यांनी मुलाला दुकान चालू करून दिलं. मांगदरी इथल्या सौ. वैशाली विनायक देशपांडे आणि सौ. रंजना बाळासाहेब मारणे यांनी बचतगटातून आपल्या असलेल्या व्यवसायासाठी कर्ज योजना वापरली. त्यांचं रेशनचं दुकान आहे.

 प्रशिक्षण वर्गाचा लाभ -

 कातवडीच्या ताराबाई आबाजी आल्हाट यांचं आयुष्य मुंबईला गेलं. तिथे त्यांनी भाजीपाल्याचा उद्योग काही वर्ष केला. नोकरीही केली. ऐकून ऐकून गिऱ्हाईकाशी बोलून त्यांना हिंदी थोडीशी इंग्रजी भाषाही येते. आता त्या गावातच राहतात. पण पेन्शन पुरत नाही म्हणून त्यांना उद्योग करावा असं वाटतं. प्रबोधिनीच्या प्रशिक्षण वर्गात शिकून त्यांनी मेणबत्त्या करायला सुरुवात केली. ४-५ वेगवेगळे आकार, वेगवेगळे रंग वापरून त्यांनी स्वत: मेणबत्त्या तयार केल्या पण हा व्यवसाय अजून जम धरत नाही. तो स्वत:च्या पायावर उभा करण्यासाठी त्यांना मदत हवी आहे.

 उद्योजकता प्रशिक्षण वर्गातून उद्योग सुरू केल्याचं आणखी एक उदाहरण आहे वेल्हे इथल्या सौ. उषा गायकवाड आणि पद्मा गायकवाड यांचं. त्यांनी खडू तयार करण्याचा व्यवसाय निवडला. मागासवर्गीयांना मिळणाऱ्या व्यावसायिक कर्जातून त्यांनी भांडवल उभं केलं. गावातल्या इतर काहींना हे तंत्र शिकवलं. ११ जणींनी मिळून काम सुरू केलं. दिवसाला २ ते ३ हजार खडू त्या तयार करतात. माल विकण्याच्या दृष्टीने त्या स्वत: तालुक्याच्या गट विकास अधिकाऱ्यांना भेटल्या व त्यांच्या मदतीने तालुक्यातल्या शाळांमध्ये खडू पाठवले. मात्र बिलांची वसूली नीट होऊ न शकल्यामुळे त्यांना काम पुढे चालू ठेवण्यात अडचणी येत आहेत.

 प्रबोधिनीच्या कामामध्ये मदत -

 बचतगट, उद्योजकता प्रशिक्षण वर्ग यातून निर्माण झालेले काहींचे संबंध पुढे अधिक दृढ झाल्याचीही उदाहरणे यामधे आवर्जून सांगितली पाहिजेत.

 या विविध योजनांचा लाभ घेत असतानाच 'घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' - अशी गोष्ट घडली. प्रबोधिनीकडून घेता घेता काहींनी प्रबोधिनीचं इतरांना देण्याचं ब्रीदही घेतलं आहे. अनेकांनी प्रबोधिनीच्या उपक्रमांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली आहे. ज्याप्रमाणे शालनताई तळेकर प्रशिक्षण वर्गामधे शिकवतात. तर
नरेंद्र लोळे यांनी आपली जागा प्रबोधिनीच्या महाराष्ट्रभरातून आलेल्या मुलींच्या शिबिरासाठी उपलब्ध करून दिली.

 यामधे कुसगावच्या रामराव चौधरींचा उल्लेख नक्कीच केला पाहिजे. त्यांचा आणि प्रबोधिनीचा संबंध १९७९ सालापासून यंत्रशाळेमुळे आला. त्यांनी तिथे नोकरी केली. बाहेर पडून स्वत:चा उद्योग केला. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे गावासाठी अनेक प्रकारे मदत केली. त्यांनी ८५ साली गावात दारुबंदी कार्यक्रमात, गणेशोत्सव आयोजनात पुढाकार घेतला. गावात बचतगट सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न केले. गावच्या पाणलोट क्षेत्र समितीचे ते अध्यक्ष होते. गावासाठीच्या बालवाडीला चालना दिली. वर्षभर शिक्षिकेचा पगार त्यांनी दिला. एकीकडे त्यांचा दुधाचा, डंपरचा व्यवसाय करण्याचे प्रयत्न चालूच होते. त्यासाठी त्यांनी कर्ज उचललं. पण त्याहूनही त्यांनी इतर उपक्रमांमध्ये जो सहभाग घेतला तो जास्त मोलाचा आहे.

 समारोप

 काही निरीक्षणे :

 गावामध्ये या लोकांना भेटत असताना, त्यांचं काम बघत असताना पदोपदी अनेक गोष्टी जाणवत होत्या, समजत होत्या. त्यातून काही विचारही सुरू झाला. इतक्या वाटचालीनंतर जरा थांबून पुन: निरीक्षण करण्याची गरज वाटली. म्हणूनच या उद्योजकांच्या अनुभवाचा हा आढावा.

 आर्थिक हतबलता -

 ग्रामीण भागामध्ये फिरताना एक गोष्ट सतत जाणवत होती ती म्हणजे आर्थिक चणचण. हातात रोख पैसा सातत्याने येत रहाणं हे इथे तितकं सोपं नाही. पण त्याची गरज तर सर्वांना आहे. शहरामध्ये त्यामानाने पैसा मिळवण्यासाठी जास्त वाटा, जास्त संधी-सुविधा उपलब्ध असतात. त्या सर्व सोयी-सुविधा हव्या त्या प्रमाणात ग्रामीण भागांपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून इथे संधी निर्माण करणं जास्त गरजेचं ठरतं. अर्थातच ही गरज संस्थने लक्षात घेतली आणि त्यादृष्टीनी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले.
 आर्थिकप्रश्न हा कौटुंबिक समस्यांचे मूळ -

 अज्ञान, अंधश्रद्धा, जुन्या परंपरा आणि आर्थिक हतबलता या मिश्रणातून ग्रामीण कुटुंबांमध्ये विविध प्रश्न निर्माण होताना दिसतात. इथल्या पुरुषांइतकीच किंबहुना काकणभर अधिकच स्त्रियांना रोजगाराची गरज आहे. कमी शिकलेल्या, गरीब कुटुंबातल्या अनेक विवाहित महिला ज्यांना काही ना काही कारणांनी टाकून दिलं आहे, माहेरी परत आल्या आहेत, त्यांना स्वत:च्या पायावर उभं रहाणं फार महत्त्वाचं आहे. यातल्या काहींना माहेरचा आधारही नसतो. काहींच्या वाट्याला माहेरी उपेक्षित जिणं येतं. पदरी कच्ची-बच्ची असतात. त्यांना वाढवण्यासाठी, मुलांना शिकवण्यासाठी, समाजातल्या किमान सुरक्षिततेसाठी रोजगाराची संधी फार उपयोगी पडते. खरंतर अत्यावश्यक ठरते. त्याच्यामुळे मिळालेल्या आर्थिक उत्पन्नामुळे कुटुंबही लवकर स्थिर होते असे लक्षात येते.

 काम करण्याची तयारी व अपार जिद्द -

 शिक्षणाची संधी नाही. कच्चा माल, बाजारपेठ जवळ उपलब्ध नाही, हातात खेळतं भांडवल नाही. घरच्या शेतीत अनेक हिस्से, घरून पाठबळ नाही - एक ना दोन. अशी अनेक सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक कारणं इथल्या माणसाला बहुधा परिस्थितीशी झुंजायला आणखी कणखर बनवतात. अशा अनेकविध अडचणी असताना ही माणसं कष्ट करायला सतत तयार असतात. नवीन शिकण्याची, आत्मसात करण्याची, आव्हान स्वीकारण्याची अफाट ताकद यांच्यात असते. मैलोन् मैल चालत येणं, ओझं वहाणं, दिवस-रात्र काम करणं या सगळ्याची तयारी दिसते.

 हे फक्त शारीरिक कष्ट असतात असंही नाही तर त्याबरोबर कौशल्य आत्मसात करण्याचं तंत्रही असतं. तानाजी आरुडे आणि निवृत्ती सुतार या दोन तरुणांनी बांबूतलं कौशल्य दाखवलंच आहे. तर यंत्रशाळेतून तंत्रशिक्षण घेतलेल्या सगळ्यांनीच तांत्रिक कसब जाणून घेतलं आहे. हे करत असताना प्रशिक्षणाचाही त्यांना चांगलाच उपयोग झाला आहे.

 प्रशिक्षण वर्गांची मदत -

 प्रस्तावनेनंतर दिलेल्या यादीकडे नजर टाकली तर किती विविध प्रकारचे प्रशिक्षणवर्ग गेल्या काही वर्षांत आयोजित केले गेले हे सहज लक्षात येतं. हे वर्ग आयोजित करत असताना त्यामागे विशिष्ट भूमिका होती, डोळस प्रयत्न होता. त्यातली पहिली भूमिका होती वेगवेगळं तंत्रज्ञान, कौशल्य गावापर्यंत पोहोचवण्याची. या वर्गांमध्ये कच्चा माल कसा असतो. कुठे मिळतो, किंमत किती या बाबींचाही समावेश असतो. त्याशिवाय वस्तू
 प्रत्यक्ष करून दाखवल्या जातात. त्याच्या योग्य दर्जाविषयी माहिती दिली जाते. किंमतीची कल्पना दिली जाते. बाजारपेठेविषयी सांगितलं जातं.

 या व्यतिरिक्त काही उद्योजकतेचे प्रबोधन करणारे मेळावे घेतले. त्याशिवाय काही प्रशिक्षणवर्ग असेही घेतले ज्यामध्ये भांडवलाची तरतूद याविषयी प्रशिक्षण दिलं जातं. बँकांची माहिती, बँकांच्या योजना, बँक व्यवस्थापकांशी चर्चा, वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती, त्या योजना मिळवण्यासाठीची मदत अशा सर्वांगीण विचारांनी प्रशिक्षण वर्ग वेळोवेळी घेतले.

 बाजारपेठेची गरज मोठ्या प्रमाणावर -

 प्रशिक्षण, भांडवल, काम करण्याची तयारी या पाठबळावर माल तयार होण्यापर्यंतची साखळी व्यवस्थित पूर्ण होते. अनेकांना तर दर्जा राखणं, दर्जा तपासून पहाणं याचीही जाण असल्याचे दिसते, पण व्यवसायाची यशस्विता विक्री आणि नफा यावरच अवलंबून रहाते. तयार होणाऱ्या मालाला योग्य ती बाजारपेठ मिळणं या व्यवस्थेत काही कच्चा दुवा शिल्लक आहे. महिलांनी उत्पादन केलेल्या वस्तूंची प्रबोधिनीत व अन्यत्र स्टॉल मांडून गणपती, दिवाळी अशी प्रासंगिक विक्री केली जाते. तरी त्यापेक्षा अधिक प्रयत्न होण्याची, त्यात सातत्य असण्याची नितांत गरज आहे. त्यातूनच या छोट्या उद्योगांना स्थैर्य मिळेल.

 अनुभवातून उद्योगाच्या बारकाव्यांची जाणीव -

 गेल्या काही वर्षांच्या सातत्यानी झालेल्या या प्रयत्नातून लहान-मोठे पुष्कळ उद्योग उभे राहात आहे त्यातल्या काहींचा अनुभव घारे मामांसारखा दीर्घ आहे तर काहींचा नवा. या अनुभवांनी अनेक गोष्टी शिकवल्या आहेत.

 उद्योग करण्याची, त्यात टिकण्याची जिद्द तयार होते आहे. त्याबरोबर अनेक बारकावेही आत्मसात होत आहेत. उद्योगाची निवड कशी करावी, आपल्या भागात काय मिळत नाही, कुठला उद्योग चांगला चालेल याचा अंदाज घेणं, कच्चा माल विकत घेणं, त्यावर काही प्रक्रिया करणं याचे आडाखे आता बांधले जातात. याशिवाय वस्तू विकायची तर त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. सुबक, टिकाऊ पाहिजे याचं भान असल्याचं दिसतं. जास्तीत जास्त कुशलतेनी काम करण्याची गरज लोकांना जाणवते आहे.

 आवश्यक त्या ठिकाणी साहेबांना भेटणं, तहसीलदार, कार्यालय, बँक अशा ठिकाणी जाणं, योजना समजावून घेणं, त्याचे अर्ज भरणं ह्यात आता अतिशय अवघड, न जमणारं, आपल्या आवाक्याबाहेरचं असं काही वाटत नाही. वेल्ह्याच्या द्वारकाताई हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. तर उज्ज्वलाताईंनी 'अमुकतमुक फॉर्म
भरायला पैसे लागत नाहीत, बघू साहेब कसा पैसे घेतो?' असं म्हणून स्वत: कार्यालयात गेल्या आणि अनेक अडाणी लोकांना जिथे अनाठायी पैसे द्यावे लागत ते त्याच्या मुळे थांबलं.

 आर्थिक व्यवहाराचीही यातून सवय झाली आहे. पैसे बँकेत भरणे, काढणे, पैशांचा हिशोब करणे, त्याची नोंद ठेवणे हेही अनेकजण -जणी नियमितपणे करतात. गुरुप्रसाद इंजिनियरिंगच्या लक्ष्मणराव कोंडे यांनी पद्धतशीर हिशोब मांडणी केली आहे. ती खरोखर समजून घेण्यासारखी आहे. ही पद्धत त्यांनी स्वत:च अनुभवातून विकसित केली आहे. यातील अनेकजण विशेष शिकलेले नाहीत किंवा शाळा सोडलेल्याला अनेक वर्ष झाली आहेत. गणिताशी संपर्क तुटला होता असेही आहेत. पण तरीही उद्योगाची गरज म्हणून पुन्हा बेरीज, वजाबाकीकडे वळले आहेत. त्यातून कशाकशावर किती खर्च केला, जमा किती झाले, वस्तूचा भाव कसा ठरवायचा अशा सर्व आकडेमोडी करतात. तर काहींना त्यांची शाळेत जाणारी मुलं मदत करतात.

 कौटुंबिक समस्यांना उद्योगातून उत्तर मिळालं -

 संसार उभे राहण्याची, सावरण्याची संधी अनेक उद्योगांनी कुटुंबांना मिळवून दिली हे याचं एक वेगळं परिमाण, काही उदाहरणांमध्ये बायकोकडे नवरा परत आला. मुलांना परत वडील मिळाले आणि संसाराचं सुख पुन्हा एकदा परत आलं. काही ठिकाणी मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. काहींच्या म्हातारपणाला पेन्शनबरोबर आणखी जोड मिळाली. काहींना कर्ज फिटण्यासाठी मदत झाली. काही तंत्रज्ञांनी नवीन लोकांना शिकवून, काम देवून त्यांच्या रोजगाराची सोय केली.

 विशेषत: बायकांसाठी कौटुंबिक पातळीवरं बराच फरक पडला. 'कमवती स्त्री' झाल्यामुळे घरात तिच्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलला. तिच्या मताला किंमत आली. थोडंसं निर्णयस्वातंत्र्य, घरच्या निर्णयामध्ये तिला जागा मिळू लागली. तिला घराबाहेर जाण्याचं, इतर चार गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य मिळू लागलं. 'बाया-बाया जमल्या तर कुठे बिघडलं? त्यात काय वाईट आहे?' असं घरच्या पुरुषांनाही वाटायला लागलं. बचत गटाच्या माध्यमातून पुरुषांना, शेतीसाठी, घरच्या अडी-नडीला कर्ज सहजासहजी उपलब्ध झालं. घरातल्या आर्थिक उलाढालीत बाईला आपलं स्थान निर्माण झाल्यावर घरातही तिचं स्थान तयार होऊ लागलं. तिच्या कष्टाला मोल आलं. उद्योजकतेचा हा कौटुंबिक पैलू आर्थिकतेपेक्षाही अधिक महत्त्वाचा आणि मनोहर आहे.

 यातूनच स्त्रीचा, उद्योग करणाऱ्या तरुणांचा आत्मविश्वास वाढीला लागतो. जगण्याची नवी उमेद मिळते. पुढे पाऊल टाकण्याची हिंमत मिळते. माणूस म्हणून घडणीतला हा एक मोलाचा टप्पा म्हणावा लागेल.
 कुटुंबाचे उद्योग अधिक यशस्वी -

 अनेक ठिकाणी सुधारत्या आर्थिक घडीबरोबर कुटुंबात एकीची भावना अधिक प्रबळ झाली, घरचे सगळे उद्योगाला मदत करू लागले असंही चित्र आपल्याला दिसतं. बांबूची शुभेच्छा पत्र बनवणं, मुलांचा शालेय प्रकल्प बनविणे हा वेल्ह्यातील मुलांचा नित्याचा उद्योग बनला. मांगदरीच्या वैशालीताई किंवा रंजनाताई ह्यांच्याकडे रेशनचं दुकान नवरा-बायको दोघं मिळून चालवतात. जनाताई खवले आणि त्यांचे पती दोघेही शिवणाचं काम एकत्र करतात.

 ज्या ठिकाणी कुटुंब मिळून एकत्रितपणे उद्योग करतात ते उद्योग यशस्वी आहेत असं दिसून येतं. काहींची मुलं आता शिकत आहेत आणि हिशोबाला मदत करतात. तर काहींचे निवृत्त वडील मुलाला शेतीबरोबर व्यवसाय करायला उत्तेजन देतात. कुरंगवाडीच्या विजयकुमार शिळीमकरांचे शेळीपालन वडिलांच्या आणि घराच्या पाठिंब्यामुळेच अजून उभे आहे. ससेवाडीचे दिनकर वाडकर आणि त्यांच्या पत्नी सावित्राबाई यांच्या एकदिलानी होणाऱ्या कामानी एकाचवेळी ४-५ उद्योगही सुरळीतपणे चालू रहातात.

 काही अनुभव अपयशाचे -

 यातले काही अनुभव हे पूर्ण यशस्वी न झालेल्या उद्योगांचेही आहेत. अर्थात त्यामागे तशी कारणंही आहेतच. वेळूच्या संजय घाटे यांचं वर्कशॉप चांगल्यापैकी ४ वर्ष चालू होतं पण मंदीची लाट आणि काही घरगुती कारणं यामुळे ते बंद करावं लागलं. तर कुसगावच्या चौधरींनी दुधाचा धंदा सुरू केला पण त्यात तोटा झाला. कुरुंगवाडी इथल्या शिळीमकरांनी शेळीपालनाचा नवीन व्यवसाय मोठ्या उमेदीनं चालू केला पण काही कारणांनी ४५ करडं मरण पावली आणि पुन्हा धंदा उभा राहायला खूप अडचणी आल्या. अर्थात त्यांची उमेद संपली नाही. अशी काही अपयशाचीही उदाहरणं यात आहेतच.

 काहींना तोटा होण्यासारखं अपयश आलं नाही पण पुरेसा फायदा होवू शकत नाही. त्यातून व्यवसाय कमी होतो किंवा पुढे कसा चालू ठेवायचा हा प्रश्न पडतो. तर आंबवणे इथला रहिवासी सोनके यांनी १०वी नंतर स्वत:ची वाट शोधत सायकल दुरुस्ती, पेप्सीकोला विक्री आणि नंतर आईसक्रीमची हातगाडी चालवण्याचा यशस्वी उद्योग केल्यानंतरही, नोकरी मिळताच त्याला तीच बरी वाटली. अशाही घटना यामध्ये आहेत.

 या उदाहरणांमध्ये काही परिस्थितीजन्य तर काही वैयक्तिक कारणंही असतील. पण त्याबरोबरच
 आणखी एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ते म्हणजे ज्या प्रमाणात सर्वांगीण प्रशिक्षण, शेवटपर्यंत मदत, मार्गदर्शन आवश्यक आहे त्याप्रमाणात ते उपलब्ध होतंच असं नाही. या मुलाखतीमध्ये अनेकांनी आणखी मार्गदर्शनाची, प्रशिक्षणवर्गाची अपेक्षा व्यक्त केली. धंदा चालू केल्यानंतरही काही काळ मदतीची गरज बोलून दाखवली. त्या दृष्टीने प्रबोधिनीमार्फत प्रयत्न चालू असतात. पण बरोबरीने आणखी कुणी यात मदत करू शकलं तर हा प्रयोग, ही धडपड अधिक प्रमाणात यशस्वी होऊ शकेल.

 सामाजिक देवाण-घेवाणीत वाढ -

 या उद्योगांनी ज्याप्रमाणे आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना उत्तर दिलं त्याचप्रमाणे काही नवीन सामाजिक बदल, नव्या सामाजिक जाणिवा निर्माण केल्या. त्यातून पुन्हा उद्योगांना मदत झालीच. गावातल्या महिलांचा परस्पर संपर्क वाढला. बचतगटांमुळे एकमेकींची नड समजायला लागली. त्यानुसार कर्ज वाटप सुरू झालं आणि भांडवलही मिळालं. शिवाय याच माध्यमातून उत्पादित मालाला गावातच गिऱ्हाईकही सापडलं. नड आहे म्हणून गटानं कर्ज द्यायचं तर कर्जफेड करता यावी म्हणून तिच्याकडून शक्यतो माल खरेदी करायचा असं हे दुहेरी तंत्र.

 कोणाची तरी मदत मला स्वत:च्या पायावर उभं रहायला उपयोगी पडली तशीच मी सुद्धा इतरांना मदत केली पाहिजे. असं वाटणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कुठलंच काम एखाद्याच्या प्रयत्नानं साध्य होत नाही. भागाचं आर्थिक चित्र पालटायचं असेल तर प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचं मार्गदर्शनाचं काम, त्या कामाचं महत्त्व समजून अशाच गावातल्या साऱ्या स्थानिक लोकांनी केलं पाहिजे तरच झालेले बदल रुजतील. ग्रामीण जीवन अधिक समृद्ध होईल.

 इतक्या वर्षाच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांना आता यश येताना दिसू लागलंय. अनेकांनी गावातला रोजगार वाढवला. अनेकांना नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. अशी 'एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' ही उक्ती इथे सार्थ होताना दिसते.

***