Jump to content

आमची संस्कृती/आम्ही बायका

विकिस्रोत कडून


आमची संस्कृती / १४१









१२. आम्ही बायका




 आम्ही बायका हजारो वर्षे मुक्या होतो. आम्ही काय आहोत, आम्हांला काय पाहिजे हे दुसरे बोलून दाखवीत. आम्हांला त्याची पर्वाच नव्हती. कोणी आम्हांला सर्व पापाचे मूळ समजत, तर कोणी आमची पूजा बांधीत; कोणी फुलासारखे वागवावे म्हणत, तर कोणी ‘‘दिसाआड बैल व तासाआड बायको मारावी अशा मताचे होते. ऐन तारुण्यात स्त्रीला जगातील सर्वात विलोभनीय गोष्ट मानून कोणी शृंगारशतके रचीत व शृंगाराचे अजीर्ण झाले म्हणजे शिसारी येऊन तीच माणसे वैराग्यशतके खरडून काढीत. सारांश, काय, आमच्या धन्याच्या मन:स्थितीवर आमचे जगातील स्थान अवलंबून होते व आहेही. मग आताच बायकांना वाचा का फुटली?

 आक्रोशाचे युग
 दलित वर्गाच्या आक्रोशाचे हे युग आहे. शेतावरला शेतकरी किसान मोर्चे काढून आपली दु:खे वेशीवर टांगीत आहे. गिरणीतील मजूर मजूरसंघाच्या द्वारे आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडतात तसेच स्त्रियाही आपल्या सभांतून आपली खरी व काल्पनिक दु:खे जगापुढे मांडून दाद मागतात. स्त्रियांची चळवळ ही काही स्वतंत्र चळवळ नाही. १४२ / आमची संस्कृती

सामाजिक अन्यायाखाली दडपलेल्या बहुसंख्य मानवांची सुटकेसाठी जी प्रचंड चळवळ चालली आहे, त्यातीलच एक भाग म्हणजे आमची चळवळ आहे. ज्या प्रमाणावर सामाजिक अन्यायाचा सबंध प्रश्न सुटेल त्या प्रमाणावर व तेव्हाच आपलाही प्रश्न सुटेल. हे जर खरे, तर मग स्त्रियांच्या प्रश्नाचा सवता सुभा कशाला? सामाजिक अन्याय हे नाव जरी एक असले तरी व त्याविरुद्ध करण्यात येणा-या चळवळी तत्त्वत: एकच असल्या, तरी वास्तविक प्रत्येक वर्गाचा समाजाशी येणारा संबंध निरनिराळा असतो; त्यावर होणारी समाजाची क्रिया व प्रतिक्रिया ह्या इतर वर्गापेक्षा निराळ्या असतात. अर्थातच संघटनेचे स्वरूप व लढाईचे मार्गही निरनिराळे आखावे लागतात. गिरणीकामगारांची संघटना व शेतक-यांची संघटना ही जरी तात्त्विकष्ट्या एका त-हेची असते तरी दोन्ही वर्गाना आपापल्या सामाजिक स्थानानुरूप संघटनेची व कार्याची दिशा आखावी लागते. तसेच स्त्रियांच्या बाबतीत. त्यांचेही प्रश्न त्यांच्या वर्गाचे विशेष असे असतात व म्हणून स्त्रियांची अशी निराळी संघटना सर्वत्र दिसून येत आहे.
 आम्हा स्त्रियांना आज वाचा का फुटली हे प्रथम सांगितले. आता आम्हाला हवे आहे तरी काय हा पुढचा प्रश्न. त्याचे थोडक्यात उत्तर देण्याच्या आधी मी पाहिलेल्या व अनुभवलेल्या अनेक प्रसंगांतील काही निवडक प्रसंग सांगते. यावरून आमच्या मनात काय शल्य बोचते ते तुमच्या ध्यानात येईल.
 माझ्या ओळखीच्या सुखवस्तू सुशिक्षित कुटुंबातील गोष्ट. आजी वाढीत आहे. भाकरी वाढली; लोणी वाढताना नातवाच्या पानावर पोफळाएवढा लोण्याचा गोळा घातला; नातीच्या पानावर वालाएवढे लोणी टेकवले. थोरल्या नाती मुकाट जेवल्या, धाकटीला काही राहवेना.
“आजी, आम्हांला ग का एवढं लोणी?
 “अग तो मुलगा आहे; तो पुढे घर चालवणार आहे- तुम्ही काय? लग्न होऊन दुस-याच्या होणार!

 आम्हांला वागवण्याची ही झाली एक तऱ्हा. 

आमची संस्कृती / १४३



 काही विचारप्रवर्तक प्रसंग
 दुसरा प्रसंग माझ्या लहानपणाचा आठवतो. आम्ही भावंडे जेवायला बसलो होतो. सर्व मुलग्यांना बाजाराचे तूप वाढले; मला मात्र घरचे साजूक तूप मिळाले. “आई, तीच का ग तुझी लाडकी? एका भावाने नित्याचा प्रश्न केला. “अरे, ती आपल्या घरची दोन दिवसांची पाहुणी. उद्या लग्न झालं की कशाला धरते आहे, साजूक तुपाचा हट्ट सासरी? खाऊ दे तिला. आईने नित्याचेच ठरलेले उत्तर दिले. हा झाला दुसरा प्रकार.
 बाप मुलाला आर्टस कोर्स न घेता इंजिनियर नाहीतर डॉक्टर होण्यासाठी सांगत होता. मुलीने विचारले, “बाबा, मी आर्टसकडे गेले तेव्हा मला नाही हो सांगितलंत, आर्टस कोर्स कुचकामाचा म्हणून?
 बाप म्हणाला, “अगं; तू काहीही शीक. तुझं शिक्षण आहे दिखाऊ; त्याचं शिकणं आहे पोटासाठी! बापाने मुलांतील व मुलीतील भेद विशद करून सांगितला.
 ह्या झाल्या माहेरच्या गोष्टी. आता लग्नानंतरचे स्त्रियांचे काही अनुभव सांगते.

 सासूबाई खुशीत होत्या. “सूनबाई, आज दहा वर्षे माझ्या मुलाचा संसार करते आहेस; त्याचं घर राखते आहेस. अशीच पुढं राख हो. मुलाचा संसार, त्याचं घर! मला वेडीला वाटत होते- मी माझाच संसार करीत होते म्हणून!
 “अमक्या-तमक्याच्या नातवाची मुंज आहे म्हणून ऐकतो. असे म्हणून एका गृहस्थाने मुंजा मुलाच्या आईच्या बापाचे नाव घेतले. ताबडतोब मुलाच्या बापाची आई उसळून म्हणते, "अहो, आमचा नात सूनबाईच्या माहेरच्या नावावर विकला जाण्याची नाही वेळ आली अजून!...
 -एक नावाजलेले डॉक्टर आपल्या पत्नीला बजावीत होते. हे पाहा, बाहेर जाताना साधंसुधं लुगडे नेसून जाऊ नकोस. तुझ्या पोषाखावरून माझ्या दांडग्या प्रैक्टिसची लोकांना कल्पना आली पाहिजे. समजलीस? १४४ / आमची संस्कृती

 हे सारे पुरुषांचे हक्क!
 पूर्वी सर्व त-हेची भूषणे-शिरोभूषणे, कर्णभूषणे, गळ्यातील व हातांतील अलंकार, शरीरावर गोंदणे व निरनिराळे रंग फासणे हा पुरुषांचा हक्क समजत. समाजात जे काही महत्त्वाचा हक्क बजावीत त्यांनाच हा अधिकार असे. राजा, उपाध्याय, शूर लढवय्या ह्यांनाच शिरोभूषणे लेण्याचा किंवा शरीर गोंदण्याचा अधिकार असे. अलंकार हे पुरुषार्थाचे द्योतक समजत. पण हल्ली पुरुष स्वत:चे शरीर अलंकृत न करता आपल्या पुरुषार्थाची जाहिरात आपल्या बायकोकरवी लावतात! बायकोचे रूप, अलंकार व वस्त्रे ही तिच्या नव-याच्या सामाजिक दर्जाची द्योतक असतात.
 मोलकरीण रडत होती, “बाई आठ मुलं झाली. त्यांतली ही एक मुलगी तेवढी जगली. ह्या खेपेला मुलगा होऊन जगला-वाचला तर धडगत आहे. नाही तर ते दुसरं लग्न करतील!
 शेजारच्या एका बाईने अफू खाऊन जीव दिला! दीड महिन्यांची बाळंतीण, चवथी खेप, मूल उपजताच मेलेले. सगळी माणसे अपेशी म्हणतात; सासरची घरात घेणार नाहीत म्हणून जीव दिला!

 तुम्ही म्हणाल, “नव-यानं अलंकार दिले तरी त्या बाईची कुरकुर, घरांतून हाकून लावलं तरी कुरकुर, लोणी मिळत नाही म्हणून तक्रार व साजूक तूप मिळतं म्हणूनही तक्रार. ह्या बायकांना हवं तरी काय? लोणी मिळो वा न मिळो, आम्ही माहेरच्या पाव्हण्याच. काही घरात आम्ही दुस-याच्या होणार म्हणून आमची हिडिसफिडिस, तर काही घरात त्याच कारणामुळे आमच्याबद्दल अनुकंपा. माहेरच्या कशावर आमचा हक्क नाही आणि कशाबद्दल जबाबदारी नाही. सासरी खायला-प्यायला पुरेसे मिळत नाही, अशा स्थितीत माहेरचे आणून हक्काने खाता येणार नाही, काही मिळालेच तर ती धर्माची भाकर. तसेच माहेरचे माणूस उघडे पडले, तर इच्छा असूनही त्यावर मायेचे पांघरूण घालता येत नाही. सासरी काय, आम्ही बोलूनचालून उपन्या आलेल्या! आपल्या मुलाच्याच पोटी मूल होऊन नातवंड पाहावयास मिळते, तर कोठची सासू सुनमुख पाहण्यास उतावीळ झाली असती? नव्या घरी पाऊल टाकल्यापासून नव-याचे जीवन तेच आमचे जीवन अशी स्थिती होते. नुसते आडनावच बदलून राहत 

आमची संस्कृती / १४५

नाही, तर पहिले नावसुद्धा बदलते. आपल्या स्वत:च्या आवडीनावडी विसरून नव-याच्या आवडी त्या आपल्या करावयाच्या असतात. तो हसला की आम्ही हसतो, तो रागावला की आम्ही कोमेजतो. त्याने कामाच्या चिंतेत आमची विचारपूस केली नाही तर त्यांचे प्रेमच नाही म्हणून आम्ही आयुष्याचे रान करतो. दुस-या बाईशी दोन शब्द बोलला तर आमचा मत्सर जागृत होतो. ह्या अनन्यभक्तीचे फळ म्हणजे शेवटी आमच्या धन्यालाच आम्ही साखळीने जखडून गुलाम बनवितो. मुले झाली म्हणजे आमचा जीव त्यांच्याभोवती घोटाळतो. त्यांनी दृष्टीआड जाऊ नये म्हणून आमची खटपट सुरू असते व त्यांचे पंख कापून त्यांना आमच्या आकुंचित जिण्यात कोंडून ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो.

 सावलीतील वनस्पती
 एका बाजूला धडधडीत अन्याय व दुस-या बाजूला अनुकंपेमुळे मिळालेल्या जादा सवलती हे दोन्हीही आम्हांला नको. ना खत ना पाणी, शेळीने खावे, सर्पणासाठी कापावे-- अशा माळारानावर जगणाच्या खुरटलेल्या बाभळीचेही आयुष्य आम्हांस नको व उन्हाची झळ लागू नये म्हणून सावलीत परिश्रमाने वाढवलेल्या चित्रविचित्र रंगांच्या फोफावलेल्या वनस्पतींची मिजास पण आम्हांला नको आहे. ह्या परावलंबी, परप्रकाशी जिण्याचा आम्हांला अगदी वीट आला आहे. आम्हांला सामाजिक हक्क पाहिजेत व सामाजिक जबाबदा-या आमच्यावर पडाव्या ही पण आमची इच्छा आहे. आमच्या शारीरिक व मानसिक शक्तीचा पूर्णाशाने उपयोग करता येईल असे आम्हांला पाहिजे. माझा नवरा, माझी मुले, माझे स्वयंपाकघर ह्या विवंचनेत सबंध आयुष्य घालवायचे एवढी तुटपुंजी माझी शारीरिक व बौद्धिक संपत्ती खास नाही. हजारो वर्षे जगाच्या निरनिराळ्या भागांत खपून मनुष्यांनी एक प्रचंड संस्कृती निर्माण केली आहे. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने?' इतकी विशाल संपत्ती आहे व मी त्याची वारस आहे. त्या संस्कृतीच्याबरोबर अनंत दु:खे व अनंत अन्याय मनुष्याने निर्माण केले आहेत. त्यांचीही मी वारस आहे. एकाचा उपभोग व दुस-याचे निवारण करण्याची धडपड मी जन्मभर केली पाहिजे. समाजाचे घेणे घेतले पाहिजे व देणे दिले पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी १४६ / आमची संस्कृती

करण्याची संधी मिळाली म्हणजे आम्हांला हवे ते मिळाले असे मी समजेन.

 समाजातील बायकांचे स्थान
 बायकांचे समाजातील स्थान नेहमीच असे नीच होते का? निरनिराळ्या काळांतील निरनिराळ्या समाजाचे निरीक्षण केलेल्या खालील गोष्टी नजरेस येतात. ज्या समाजातून नांगरटीला जनावरांचा उपयोग माहीत नाही किंवा कुंभाराच्या चाकाचा शोध लागला नाही, त्या समाजात स्त्रिया व पुरुष ह्यांच्यामध्ये समाजातील कामाची वाटणी अगदी चोख असते. एकाच्या कामात दुसल्याने ढवळाढवळ करावयाची नाही असा दंडक सगळीकडे असतो. शिकार करणे, लाकूड तोडणे, नावा व घरे बांधणे व क्वचित विणणे ही कामे पुरुष करतात. बागाईत करणे म्हणजे कंदमुळे व फळझाडे लावणे, निकृष्ट दर्जाची हातशेती करणे, मळ्याची मशागत करणे, पीक काढणे, मडकी घडवणे, वल्कले करणे, वस्त्रे विणणे ही कामे बहुधा स्त्रिया करतात. मळ्यावर पिकणारा माल बाजारात नेऊन संसारोपयोगी इतर वस्तू खरेदी करण्यात त्या मोठ्या हुशार असतात. आफ्रिका खंडात व आशिया खंडात स्त्रियांचा दर्जा फारच नीच आहे तरीसुद्धा काही प्रकारच्या संपत्तीवर स्त्रियांचाच हक्क दिसून येतो. घरातील सर्व चीजवस्तू- भांडीकुंडी, वस्त्राप्रमाणे, दोरदोरखंडे ही नेहमी स्त्रियांच्या मालकीची असतात व नवन्याने हाकून दिले तरी ह्या जिनसा त्याला हिरावून नेता येत नाहीत. तसेच आईच्या पश्चात त्या मुलीला मिळतात. ह्याच्या उलट, शिकारीची हत्यारे, जनावरांची कातडी वगैरे पुरुषांची असतात व ती मुलांकडे जातात. विशेषत: एकापेक्षा अधिक बायका केल्यास प्रत्येकीला स्वतंत्र झोपडी बांधून देण्याची जी आफ्रिकेतील लोकांची पद्धती आहे तिचे कारण हेच असावे. ह्या सर्वांचा अर्थ असा दिसतो की, ज्याने जे उत्पादन केले त्यावर त्याचा हक्क असतो.

 पितृप्रधान समाजव्यवस्थेत मुलीला बापाकडून काही वाटा मिळत नाही, त्याचे ऐतिहासिक कारण वरील जुनी पद्धती असावी, असे काही प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञांचे मत आहेसंस्कृतीच्या कनिष्ठ पायरीवर समाजातील उत्पादनकार्यात श्रमविभाग होता व स्त्रिया उत्पादनाचा मोठा

आमची संस्कृती / १४७

वाटा उचलीतइतके असूनही त्यांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीचा नाही. धार्मिक समारंभात त्यांना मुळीच भाग घेण्याची परवानगी नाही. बहुतेक सर्व समाजांतून पुरुषाला वाटेल तेव्हा बायकोला काडीमोड देता येते- पण मुले व भांडीकुंडी ह्यांवर तिचा हक्क राहतो. धार्मिक गोष्टींत स्त्रियांना भाग घेण्यास मिळत नाही, ते त्यांच्या विशिष्ट शरीरधर्मामुळे असावे असा कयास आहे. काही समाजातून बायका म्हाताच्या झाल्या म्हणजे त्याना धार्मिक कृत्ये करण्याची मोकळीक असते.

 तीन अडचणी
 जोपर्यंत शेती हाताने करावयाची असे तोवर शेतीपासून होणारे उत्पन्न कुटुंबाला पुरेसे पडत नसे. पुरुषाला अधूनमधून का होईना, शिकार व मच्छीमार करावी लागत असे. अस्वल, हरण, वनमायरानरेडे ह्यांची शिकार करणे म्हणजे अत्यंत परिश्रमाचे काम असते. दहा हातांवरून मारावयाचा भाला किंवा पन्नास हातावरून मारावयाचे धनुष्यबाण एवढीच सामग्री शिकाच्याजवळ असते. जनावरामागे वीसवीसपंचवीसपंचवीस मैल पळत जावे लागते व जनावर थकले म्हणजे पाच दहा जणांनी हल्ला करून ते मारावे लागते. अशा शिकारीनंतर घरी आल्यावर काही काम केले नाही तर पुरुषाला दोष देण्यात अर्थ नाही.
 उत्पादनाची साधने सुधारल्यावर शिकार टाकून पुरुषांनी शेतीचे काम उचलले. जनावरे हाकणे, त्यांची जोपासना करणे वगैरे कामे बहुधा पुरुषच करीत. हळूहळू उत्पादनाचे सर्वच प्रकार पुरुषांनी काबीज केले व आज तर मुले होण्याखेरीज बायकाच करू शकतील असे एकही काम जगात उरलेले नाही. गर्भारपण व बाळंतपण ह्या काळात थोडा वेळ का होईना शारीरिक दुर्बलतेमुळे रक्षण व पोषण ह्यांसाठी स्त्रियांना दुसर्यांवर अवलंबून राहावे लागतेतान्ह्या मुलाच्या जोपासनेच्या जबाबदारीमुळे घर टाकून फार वेळ दूर जाता येत नाही, हे बांझ गेली तिथे संध्याकाळ झाली’ ह्या म्हणीत सांगितले आहेस्त्रिया व मुले ह्यांचा एक स्थानिक गट बनतो. मासिक स्रावाबद्दल वाटणाच्या शिसारीमुळे व भीतीमुळे स्त्रियांना धर्मकृत्यांत भाग घेण्याची बंदी झाली आणि उत्पादनाचे कार्य कमी कमी होत गेल्यामुळे संपत्तीवरील हकही नाहीसे झाले. ह्या व इतर कारणांमुळे स्त्रियांना सध्याचा १४८ / आमची संस्कृती

सामाजिक दर्जा प्राप्त झाला. पहिली अडचण नैसर्गिक आहे. दुसरी अडचण लोकभ्रमावर उभारलेली व लवकर नष्ट होणारी आहे. तिसरी समाजाच्या उत्क्रांतीबरोबर काही ऐतिहासिक घटनेमुळे निर्माण झालेली आहे व ह्या अडचणींविरुद्ध संबंध जगभर झगडा चाललेला आहे. ह्या तिन्ही अडचणी ज्या प्रमाणात दूर होतील त्या प्रमाणात स्त्रियांचे जीवन स्वावलंबी व स्वतंत्र होईल.

 मुलांची गरज
 स्वावलंबी होण्यासाठी गर्भारपण, बाळंतपण अजिबात टाळणे हल्लीच्या शास्त्रीय शोधामुळे शक्य झाले आहे; पण ते इष्ट आहे का? सबंध मानव संस्कृती ह्या दोन क्रियांवर अवलंबून आहे.
  ‘भूत निघाला तव उदरांतुन,
  वर्तमान घे अंकी लोळण,
  भविष्य पाही मुली! रात्रंदिन
  तव हाकेची वाट मनी'

 असे स्त्रीला उद्देशून एका कवीने म्हटले आहे. आता जगाच्या भवितव्याची मला काय पर्वा आहे! मला एक एवढे आयुष्य मिळाले आहे त्यांत ह्या शृंखला कशाला?' असे कोणी बाई म्हणेल; पण ती हजारात एखादीच सापडेल. अगदी स्वार्थी दृष्टीने, अगदी ह्याच आयुष्याचा विचार करावयाचा तरीदेखील आम्हा बायकांना मुलांची आत्यंतिक गरज आहे. आहार, निद्रा व मैथुन ह्या तीन मनुष्याच्या प्राथमिक गरजा आहेत असे एक कवी म्हणतो. तो जर स्त्री असता, तर चवथी गरज किंवा भूक अपत्य आहे हे तो विसरता ना! कोणत्याही प्राण्याचा शरीरविकास व मनोविकास दोन्ही बरोबर होत असतात. पुरुषांना बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था अशा तीनच अवस्थांतून जावे लागते. बाल्यांतून तारुण्यात प्रवेश होताना शरीररचनेत व मनोव्यापारात मोठ्या घडामोडी होतात व वृद्धावस्थेपर्यंत मनाचा व शरीराचा विकास होतो. स्त्रियांना बाल्यानंतर तारुण्यांतील दोन अवस्थांतुन जावे लागते. एक पत्नी म्हणून व दुसरी माता म्हणून; व दोन्ही केलेला शरीरांत व मनात प्रचंड चालना मिळते. मैथुन ही पुरुषाच्या 

आमची संस्कृती / १४९

बाबतींत एक क्षणाची गोष्ट आहे; स्त्रियांच्या बाबतीत त्याचे पर्यवसान गर्भधारणा व मातृत्व ह्यांत होऊन त्यामुळे शरीरावर व मनावर चिरकालीन परिणाम होतो. मातृपद प्राप्त झालेली स्त्रीच शारीरिकष्ट्या व म्हणून मानसिकष्ट्याही संपूर्ण स्त्री म्हणता येईल. अशा स्त्रीच्या कर्तृत्वशक्तीला पूर्ण वाव मिळण्यासाठी काय करावे?
 शहरांतील मुली सोडल्यास बाकी मुलींचे लग्न चौदा वर्षेपर्यंत व्हावयाचे राहत नाही. ह्या मुली चौदा वर्षांत सर्व गृहकृत्ये, शेतावरील कामे, गुरावासरांची जोपासना, गायीम्हशींच्या धारा काढणे वगैरे शिकतात. घरी अत्यंत गरिबी नसेल तर भरपूर काम व पोटभर भाकरी मिळून शरीर जोमदार व कणखर होते. ह्या मुलींची स्थिती पांढरपेशा मुलींच्यापेक्षा पुष्कळच निराळी असते. लग्न झाले की माहेराला मेली' अशी त्यांची स्थिती नसते. माहेरची माणसे मुलीची चांगली वास्तपुस्त करतात. दोन-तीन मुले होईपर्यंत सासरी असे कायमचे राहणे नसते. काहीतरी निमित्ताने माहेरी जावयाचे व परत सासरी जायला खळखळ करावयाची असे नेहमी चाललेले असते. सासरच्या माणसांनी भेट आणायची, बोलावणी करावयाची, शेवटी दुसरे लग्न करीन म्हणून धाक घालावयाचा, तेव्हा कोठे गृहलक्ष्मी घरात यावयाची! बहुतेक बायकांना शिवणे-टिपणे फारसे माहीत नसते; काही घरांतून नव-यालाच कारभारणीची चोळी शिवताना मी पाहिले आहे. नवरा-बायको बरेचदा आते-मामे भावंडे असल्यामुळे मुलगी अगदीच परक्या घरी जात नाही. त्याचप्रमाणे हुंडा मुलाला द्यावा लागत असल्यामुळे वधूपक्षाचे नाक नेहमी वर असते. पांढरपेशांतल्यासारखा लाचार व दुबळा वधूपक्ष मराठ्यांत दिसून येत नाही. घरांतली कामे संभाळून ह्या बायका शेतावर किंवा मळ्यावर काम करतात. त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रात बाजारहाटही बायकाच करतात. नव-याने टाकून दिले तर त्यांना दुस-या लग्नाची पंचाईत पडत नाही किंवा नव-याने सवत आणली तरी त्यांना मोठीशी खंत नसते. त्या बायका पांढरपेशांच्या बायकाइतक्या दीनवाण्या नसतात, पण त्यांचे आयुष्य फार कष्टाचे असते. वारंवार होणारी बाळंतपणे व रोजचे कष्ट यामुळे त्या लौकर म्हाताच्या दिसू लागतात. कामाचा बोजा पुरुषांच्या बरोबरीने उचलूनसुद्धा त्या आपल्या गावच्या सार्वजनिक आयुष्यात भाग १५० / आमची संस्कृती
घेऊ शकत नाहीत. पांढरपेशा मुलींना मिळते तितके शिक्षण ह्या बायकांना मिळाले तर त्या स्त्रियांचे समाजातील स्थान खास बदलतील.

 शहरातील मुली
 शहरातल्या मुली साधारणपणे मुलांच्याबरोबर शिकू लागतात. हल्ली बच्याच मुली मुलांच्या शाळेत जातात; पण तेथे त्यांना वागवण्याची पद्धत पाहिली म्हणजे अगदी चीड येते. काही एकदोन शाळा वगळल्यास कोठल्याही शाळेत अगदी लहान मुला-मुलींनासुद्धा सरमिसळ एकत्र बसू देत नाहीत. पुण्याच्या एका शाळेत तर एकाच वर्गातील मुला-मुलींना हजेरीपट निरनिराळा ठेवून त्यांचे नंबरही निरनिराळे लावतात! जी मुले मुली घरी एकत्र खेळतात आणि आणि मिळून शाळेत जातात त्यांचे शाळेचे दारांतून आत गेल्यावर भाषण नाही. आमच्या शेजारच्या एका दहा वर्षांच्या मुलाने आपल्या ओळखीच्या मुलीकडून एकदा पेन्सिल मागितली, तर अमक्या-तमक्याच्या मुलीचा मित्र म्हणून वर्गातील मुलांनी संध्याकाळपर्यंत त्याला रडकुंडीस आणले!
 माझा पुतण्या न पुतणी एकाच शाळेत जात असत. शाळेजवळ येईपर्यंत दोन्ही भावंडे मजेत हसतखेळत जात; पण शाळा जवळ आली की भावाने बहिणीला बजावून सांगायचे, की ‘अक्का, शाळेत माझ्याशी बोलता कामा नयेस हं! आणि दादा, दादा म्हणून हाक मारू नकोस. शाळा सुटली की इथे रस्त्यावर मी तुझी वाट पहात उभा राहीन.

 हायस्कुलातील तऱ्हा हि ह्यापेक्षा अजब असते. मुलींची बसावयाची बाके अर्थातच निराळी असतात. मुले तर त्यांच्याशी बोलत नाहीतच, पण मास्तरही जणू काही मुली वर्गात नाहीत असे वागतात. प्रश्न विचारायचे ते फक्त मुलांना, अभ्यास पाहावयाचा तो फक्त मुलांचा! ‘आम्हाला तेवढ भारतात! आणि ह्या मुली फिदीफिदी हसत असतात!' अशी तक्रार एक लहान मुलगा आपल्या आईशी करीत होता. वरच्या वर्गातून मुलींना हे शिक्षेचे प्रसंग पाहून चोरट्यासारखे होते. अकराबारा वषपयत मुलामुलींची वाढ सारखीच होत असते. मुली मुलांच्या मानाने लवकर वयात येतात. चवदा पंधरा वर्षांच्या मुली त्याच वयाच्या मुलांच्या मानान जास्त समजूतदार असतात. त्याचप्रमाणे त्या वयात त्या जास्त

आमची संस्कृती /१५१


भावनाशीलही होतात. विशेष कारण नसता त्यांचे हसणे, रडणे सुरू असते. बाल्यातून तारुण्यात येताना शरीरात जी स्थित्यंतरे होत असताना त्याचा हा परिणाम असतो. ह्या वेळी शाळेत त्यांना विशेष काळजीपूर्वक वागवले पाहिजे. तशी वागणूक त्यांना मुलांच्या शाळेत तर मुळीच मिळत नाही. मुलामुलींच्या शाळेत काही सृष्ट वस्तूचे व ऐतिहासक घडामोडींचे ज्ञान मिळवण्याखेरीज मुलींचा काडीइतकाही फायदा होत नाही. बरोबरीच्या मुलींशी मैत्री, खेळांत व अभ्यासात चढाओढी, शाळेतल्या सार्वजनिक आयुष्यात भाग घेण्याची संधी ह्या सर्वांना त्या मुकतात मुलींना स्थळ बघताना त्यांचे प्रदर्शन करण्याची चाल आहे; पण आमच्या इकडच्या सहशिक्षण संस्थांतून हे मुक्या मेणबाहुल्यांचे प्रदर्शन प्रत्यही चाललेले असते. ह्या प्रदर्शनात बिचाच्या काळ्यासावळ्या मुलींचे जे हाल होतात ते विचारूच नये.
 फर्ग्युसन कॉलेजात आमच्याबरोबरीच्या एका मुलीला वर्गात पाऊल टाकल्याबरोबर, ‘अरे, ढग आले ढग! अंधार पडला अंधार! ह्या शब्दांची पहिली सलामी मिळत असे. ह्याउलट, एखादी सुंदर मुलगी वर्गात आली की, मुले अक्षरश: मिटक्या मारण्यास सुरुवात करतात. ह्या शिक्षणापासून मुलींचा काय फायदा होत असेल ते परमेश्वराला ठाऊक!
.
 मुलींचे शिक्षण
 मुलींचे शिक्षण त्यांच्या पोटासाठी आहे ही भावना नसल्यामुळे ते कसे काय आहे ह्याची चौकशीच होत नाही. प्रत्येकीला शिक्षण आवश्यक आहेत्यापुढील शिक्षणात एक तरी विषय त्यांना काही घोटाचा व्यवसाय करता येईल असा शिकवावा. प्रत्येकीने मॅट्रिक होऊन कॉलेजात जावयाचे त्यापेक्षा श्रीमंत किंवा पुस्तकी शिक्षणात हुशार मुलींनीच ह्या शिक्षणक्रमात पडावे. बाकीच्यांनी सर्वसाधारण मॅट्रिकइतके शिक्षण घेऊन एखादा धंदा शिकावा. पुरुष करतात त्यांपैकी कोणताही धंदा स्त्रियांना करण्यास हरकत नसावी. बर्याच धंद्यांत पडण्यास स्त्रियांना जरा अवकाश लागेल: पण अगदी आजसुद्धा ज्यांचे शिक्षण घेता येईल असे धंदे पुष्कळ आहेत. मुंबई, सुरत, अहमदाबाद ह्या शहरांतून रेशमाचे व जिगाचे भरतकाम स्त्रियाच करतात. १५२ / आमची संस्कृती

शिष्याचा धंदा सर्वस्वी पुरुषांच्या हाती आहे; तो बायकांना करण्यास काहीच प्रत्यवाय नाही. चित्रकलेच्या शिक्षकिणींची कितीतरी शाळांतून गरज आहेपण पुरेशा शिकलेल्या स्त्रिया हा विषय शिकवण्यास मिळत नाहीत. लघुलेखन, हिशेबतपासनीस व टंकलेखन हे विषयही स्त्रियांनी आत्मसात करण्यासारखे आहेत. देशी व विदेशी मेवामिठाई, पेढे, बफी, चॉकलेट, टॉफी वगैरे जिनसा थोड्या प्रमाणावर धंदेवाईकपणे करणे फायद्याचे आहे. लाकडाची व विशेषत: चिंध्यांची खेळणी बाजारात चांगली खपतील. शाळांतून गाणी शिकवण्यास . गायनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतल्यास गायनशिक्षक म्हणून स्त्रियांना चांगली बहुधा मास्तर असतात नोकरी मिळण्यासारखी आहे. जास्त शिकलेल्या बायकांना लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून काम करता येईलमाझ्या माहितीच्या शास्त्रीय उपकरणे करणाच्या कारखानदारांना आज कित्येक वर्षे स्त्रिया कारखान्यात शिकून तयार व्हाव्यात अशी इच्छा असूनही काम करण्यास शिकलेल्या स्त्रिया मिळत नाहीत. मुंबई येथील पारशी स्त्रियांच्या औद्योगिक शाळेत वर सांगितलेले बरेच व्यवसाय करून स्त्रिया पोटाला मिळवतातस्वत:चे पोट भरण्याची कला साध्य झाली म्हणजे स्त्रिया आपोआप स्वतंत्र होतील. बापाच्या संपत्तीत वाटा मिळण्यापेक्षा असले शिक्षण मिळणे आवश्यक आहे. सध्याच्या काळी मिळवते मुलगे लग्न करून स्वतंत्र संसार थाटतात. अशा संसारात मुलगा जितका स्वतःच्या आईबापांना पारखा होतो तितक्याच मुली पण होतात. मुली दुसच्या घरी स्वत न जाता :चे घर करतात. ह्या घरी मुलाचे आईबाप व मुलींचे आईबाप दोन्हीही पाहुणच तेव्हा मुली दुसर्या घरी जाणाच्या म्हणून माहेरी त्यांना मुलांपेक्षा निराळ वागविण्याची वास्तविक काही जरूरी नाही. जे शिक्षण मुलांना तेच त्याना जी वागणूक मुलांशी तीच त्यांच्याशी, अशी वृत्ती आईबापांनी ठेबला पाहिजे.

 स्त्रियांचे सौंदर्य
 शिक्षणाचे वय हेच शरीरसंवर्धनाचे वय आहेकेवळ शारीरिकदृष्टया पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त ताण सहन करावा लागतो. त्या दृष्टीने त्यांचा

तयारीही तशीच पाहिजे. विशेषतः स्वत:चा संसार करून सार्वजनिक

आमची संस्कृती / १५३


आयुष्यात भाग घेणे असेल तर प्रकृती उत्तम असणे अत्यावश्यक आहे. स्त्री-सौंदर्याची सध्याची कल्पना ह्या नव्या ध्येयाच्या चौकटीत बसण्यासारखी नाही. पुरुषांनी उपभोग्य वस्तू ह्या दृष्टीने स्त्रीसौंदर्याची कल्पना रेखाटलेली आहे. नाजूकपणा, असहायपणा हे गुण त्यांत मुख्यत्वेकरून येतात. दुर्दैवाने हल्लीच्या मुलींना पण हेच गुण विलोभनीय वाटतात. कारण त्यामुळे त्या मुलांना आकर्षण्यास समर्थ ठरतात. लठ्ठ होण्याच्या भीतीमुळे कमी खाऊन काटकुळे बनण्याची धडपड ब-याच मुलींची चाललेली असते. भरपूर खाऊन, व्यायाम करून अंगाबरोबर राहावे- कमी खाऊन नव्हे, हे काही त्यांच्या ध्यानात येत नाही. नाजूक गोरेपान दिसण्यापेक्षा काटकपणा, दमदारपणा व व्यायामामुळे आलेला सावळेपणा ह्या गोष्टींना जास्त महत्त्व दिले पाहिजे. शरीरसंपत्ती ही एक आनुवंशिक गोष्ट म्हणजे देणगी आहे; पण ती कमावणे व वाढवणे प्रत्येकीचे कर्तव्य आहे.

 लग्नाचा प्रश्न
 ह्यानंतरचा पुढचा प्रश्न लग्नाचा. पुष्कळदा स्त्रियांपुढे लग्न की स्वतंत्र व्यवसाय असा प्रश्न असतो. हा नाही तर तो अशा दोन मार्गापैकी एकाचीच निवड करणे शक्य आहे, दोन्ही गोष्टी साधावयाच्या नाहीत, अशी सर्वसाधारण कल्पना आहे. लग्न करून संसार तरी कर, नाहीतर कुमारी राहून स्वतंत्र व्यवसाय तरी कर, अशा त-हेचा उपदेश नेहमी ऐकण्यात येतो. मास्तरणी, डॉक्टरणी वगैरे व्यवसायात पडलेल्या स्त्रियांमध्ये कुमारिकांना व विधवांना वर येण्यास जास्ती वाव मिळतो लग्न झालेल्या बायकांना पुष्कळदा लग्न झाले म्हणून नोकरी मिळण्याची पंचाईत पडते. मला वाटते, स्त्रियांच्या बाबतीत तर हा मोठा अन्या आहेच; पण सबंध समाजाचेही त्यामुळे नुकसान होते. विधवा । कुमारी स्त्रिया यांना संसाराचे बंधन नसते व त्यामुळे त्या संस्थेचे काम मन लावून करतात असे सांगण्यात येते, पण त्यात काडीइतकेही न शाळातून काम करणाच्या प्रौढ कुमारिका व विधवा ह्या बहुधा स्वतंत्र राहत नाहीत. त्या बापाच्या किंवा भावाच्या किंवा आसन्याने असतात व त्यांना बापाचा किंवा भावाचा संसार सावरावा १५४ / आमची संस्कृती

लागतो. बाप किंवा भाऊ किंवा कुटुंबातील इतर कोणी जर आजारी असेल, तर रजा काढून कुटुंबाची अडचण आधी पाहावी लागते, अडीअडचणीला स्वयंपाकपाणीही करावे लागते. स्वत:च्या साराश काय संसाराचे सुख न मिळता संसाराचे ओझे मात्र त्यांना भरपूर वाहावे लागते! ज्या कोणी सुरुवातीला स्वतंत्रपणे राहतात त्यांना लवकरच एकाकी जीवनाचा कंटाळा येऊन त्या कोणीतरी मित्र जोडतात व त्याच्याशी लग्न करणे अशक्य असल्यास त्याचा संसार तोच आपला संसारह्या भावनेने त्याच्या कुटुंबात मिसळण्याचा प्रयत्न करीत असतात. हे सर्व सदा भुकावलेले अतृप्त जीव असतातलग्न झाल्यावर प्रेमाचा उन्माद ओसरून जीवनाचा ओघ परत संथपणे व सुखाच्या संसारात पूर्वापेक्षा खोलपणे वाहतो. तशी स्थिती प्रौढ कुमारिकांच्या व काही विधवांच्या आयुष्यात येत नाही. त्यांना मानसिक स्थैर्य नसते व त्याचा परिणाम संस्थेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना- सर्वांनाच भोगावा लागतो.
 जी स्थिती शिक्षकिणींची तीच डॉक्टरणी व नसावी. समाजात ह्या बायका पुढारी म्हणून गणल्या जातात व त्यांच्या अशांत अतृप्त जीवनाचे परिणाम सर्वच समाजावर होतातलग्न झालेल्या स्त्रियांना गर्भारपण व बाळंतपण ह्यासाठी जी रजा द्यावी लागेल ती टाळण्यासाठी संस्थांचे चालक मुख्यत्वेकरून कुमारांच्या व विधवांच्या अर्जाला आधी मान्यता देतात. पण वरील गोष्टी लक्षात घेऊन सर्वांना सारखी संधी द्यावी. लग्न झालेल्या स्त्रियांची सेवा परिणामी समाजास हितकारक ठरेल. संसार करूनही स्वतंत्र व्यवसाय करण्याची स्त्रियांना संधी द्यावी म्हणजे आपल्या आयुष्याच्या भरून चाललेल्या मधुघटांतून त्यांना इतरांचा अंतरात्मा तृप्त करता येईल. केवळ भुकेलेल्या हृदयाने काम करणान्यांच्या रिकाम्या भांड्याचे निनाद ऐकून समाजाला काय लाभ होणार? काहा स्त्रियांना लग्न करण्याची आवश्यकता वाटत नाही, इतरांच्या संसाराकडे त्या कधीच आसावलेल्या दृष्टीने पाहात नाहीत; त्यांनी संसाराच्या फंदात पडावे असे माझे मुळीच म्हणणे नाही. पण मी सामान्य बहसंख्य बायकांची गोष्ट सांगते आहे. त्यांनी नोकरी करावयाची तर अनैसर्गिकरीत्या आयुष्य घालवले पाहिजे, असा निर्बाध जुलुमाचा नव्हे काय? <बर>

 लग्न करावयाचे असल्यास अभ्यास शेवटास नेण्याचा किंवा धंद्याचा

आमची संस्कृती / १५५

जम बसविण्याचा अट्टाहास करू नये. वीसबावीस वर्षांच्या आंत लग्न करावे. वैवाहिक आयुष्यांत दुसच्याबरोबर राहावयाचे असल्यामुळे दोन माणसांना एकमेकाशी जुळवून घ्यावे लागते. दोघांच्या सोईनुसार रोजचा कार्यक्रम असावा लागतो. पुष्कळशा जुन्या सवर्यात बदल करावा लागतो. सबंध आयुष्यालाच एक निराळे वळण लागते. हे सर्व स्थित्यंतर सुखाचे होण्यास लवचिक तरुण मनाची आवश्यकता असते. ह्या दृष्टीने लग्नाची पहिली दोन वर्षे महत्वाची असतात. एकमेकांचा स्वभाव कळून, प्रीतीची पहिली धंदी ओसरून जीवनाचा प्रवाह परत संथपणे वाहू लागण्यास एवढा तरी कालावधी लागतो. ह्या दोन वर्षातील हजार भांडणे व कुरापती ह्यांतून सहीसलामत निभावल्यास पुढचे आयुष्य विशेष भांडणाशिवाय जाईल असे म्हणण्यास हरकत नाही. मुले होण्याच्या आधी संसाराची घडी नीट बसलेली बरी. लग्न झाल्यापासून तो वयाच्या पंचेचाळीस वर्षांपर्यंत गर्भारपण व बाळंतपण ह्या चक्रातून वर डोके काढण्यास पूर्वी बायकांना सवड होत नसे. हल्ली संततिनियमनाच्या साधनांमुळे मुलांची संख्या व दोन मुलांमधील अंतर आपल्या मनाप्रमाणे ठेवता येते. एक चालतेबोलते मूल, एक पाळण्यातले मूल व एक पोटातले मूल असा त्रास हल्ली काढण्याची जरूरी राहिलेली नाही. स्त्रियांच्या स्वतंत्र जीवनाचे संततिनियमन हे पहिले साधन आहे असे मी म्हणते. त्यामुळे ऐन तारुण्यात, संसारात राहूनही स्वत:चा व्यवसाय सांभाळणे बायकांना शक्य झाले आहे.

 वैवाहिक जीवन
 लग्न झाल्यावर काही काळ तरी स्वत:ला विसरून जाण्याकडे बायकांची प्रवृत्ती असते. गतकाळच्या स्मृती आणि वर्तमान काळातील शून्यता एवढीच शिल्लक राहतात. हे टाळण्यासाठी आणि स्वतचे जीवन आणि आपल्या संसारातील इतरांचे जीवन परिपूर्ण करावयाचे असल्यास स्वत:चे स्वतंत्र असे आध्यात्मिक व व्यावसायिक जीवन असणे आवश्यक आहेसुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ कै. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ह्यांनी मरणापूर्वी थोडेच दिवस अगोदर वैवाहिक जीवनावर एक लेख लिहिला होता. त्यांत ते म्हणतात की, ‘ज्या प्रमाणात मवरा व बायको आपापल्या स्वतंत्र व्यवसायात गर्क राहतील त्या प्रमाणात कौटुंबिक जीवन सुखाचे १५६ / आमची संस्कृती

होईल. अशा त-हेच्या कौटुंबिक जीवनात सर्वांनाच फायदा होतो. न्याहीपुढे जाऊन मी म्हणेन की, स्वत:च्या चिमुकल्या संसाराबाहेर नमाजाचा जो संसार चालला आहे त्यांत प्रत्येक स्त्रीने मन घातले पाहिजे. समाजाचे देणे म्हणून जे मी म्हटले ते हेच. बाळपणी समाजाकडून घेणे घेतलेले असते. घेताना व्यक्तीचा जो विकास होतो त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक विकास समाजऋण प्रामाणिकपणे फेडण्याने होतो. ज्या दिवशी आम्ही आमचे घेणे व देणे कसोशीने, जागरूकपणे घेऊ आणि देऊ त्या दिवशी आम्हा बायकांचा प्रश्न आपोआपच सुटेल. आम्हांला आमच्या मानव्याची जाणीव होईल व बायकांच्या हक्कांची भाषा जाऊन प्रत्येक मनुष्याच्या हक्काची भाषा आम्ही बोलू लागू.

- १९५१