Jump to content

आमची संस्कृती/कॉलेजातील शिक्षण व परीक्षा-पद्धती

विकिस्रोत कडून


आमची संस्कृती / १५७









 १३. कॉलेजातील शिक्षण व परीक्षा-पद्धती



 जुन्या समाजव्यवस्थेतील शिक्षण व परीक्षा
 परीक्षापद्धती ही सर्वस्वी नसली तरी बरीचशी अभ्यासक्रम व शिक्षणपद्धतीवर अवलंबून असते. काही एका कालखंडात मुलाला शिकवायचे व नंतर तो काय शिकला ह्याची चाचणी करायची अशी आपल्याकडील सध्याची पद्धत आहे. विद्यार्थी शिकत असतानाच सारखी त्याची चाचणी करावयाची व पहिले शिकवलेले तो जसजसे आत्मसात करील तसेतसे पुढे शिकवीत जायचे अशी दुसरी पद्धत आहे. जुन्या काळी आपल्याकडे जे शिक्षण गुरुगृही दिले जाई ते ह्या दुस-या प्रकारचे असे. एका गुरुकडे मोजकी मुले असत. ती गुरुजींकडे जेवीत, व गुरुजींच्या घरचे पडेल ते काम करीत. अशा मुलांना शिकवायचे म्हणजे ग्रंथ बहतेक नसतंच. एखादी पोथी असलीच तर ती फक्त गुरुजींजवळ असे व गुरुजी मुलांना तोंडी शिकवीत व त्यांच्याकडून पाठ करून घेत. शिकवलेले पाठ झाले की पुढे शिकवीत. ज्यांचे होत नसे ती मागे राहत. एकाच गुरुजींकडे शिक्षणाच्या निरनिराळ्या पायरीवर असलेले विद्यार्थी असत. कदाचित पढे गेलेले विद्यार्थी नवशिक्यांचे किंवा मागे राहिलेल्यांचे अभ्यास करून घेत असतील. अशा पद्धतीत शिकवणे व परीक्षा ह्या क्रिया जोडीने चाललेल्या असत. पुढे पाठ व मागे सपाट होऊ नये म्हणून मागच्यांची परत परत १५८ / आमची संस्कृती

उजळणी होई. सर्व अभ्यास झाला म्हणजे शिकवलेले सर्व विषय उत्तम विद्याथ्र्याला तोंडपाठ असत व इतरांना फारच थोडे तोंडपाठ असे.
 ह्या शिक्षणपद्धतीच्या गुणदोषांचे सविस्तर वर्णन करण्याचे आपल्याला कारण नाही. पण ही पद्धत शक्य होण्यासाठी मोजका अभ्यास, मोजके विद्यार्थी, शिकवण्याला व शिकण्याला भरपूर वेळ अशा तीन गोष्टी आवश्यक होत्या. वयाच्या आठव्या वर्षी अभ्यास सुरू करून बारा वर्षे कमीत कमी व चोवीस ते छत्तीस वर्षे जास्तीत जास्त त्यांत घालवण्याची तयारी पूर्वी असे.
 हे शिक्षण जरी तोंडी असे तरी त्याला पुस्तकी म्हणण्यास हरकत नाही. इतिहास (पुराणरूपाने), व्याकरण, न्याय, मीमांसा, तत्त्वज्ञान ह्या स्वरूपाचे हे शिक्षण असे. भारतीयांच्या वैचारिक संस्कृतीबद्दल ते होते. प्रत्यक्ष जीवनोपयोगी कला जो तो आपापल्या कुटुंबातील किंवा जमातींतील वृद्धांकडून शिकत असे. त्यासाठी इतकी वर्षे खर्च करावी लागत नसत. पण तेथेही कसबाच्या परीक्षा त्या त्या कारागीर संघाकडून घेतल्या जात.
 पूर्वी जातीवर आधारलेली समाजव्यवस्था असे. काही विशिष्ट जातींनाच सांस्कृतिक शिक्षण घेण्याचा अधिकार असे. त्या जातींतही बहुसंख्य लोक थोडेसे म्हणणे' व गृहस्थाश्रमाची नित्य व नैमित्तिक कार्ये पार पाडण्याइतपत शिकत व अगदी थोडे गुरुगृही राहून कष्टाने विद्या साध्य करीत. समाजातील बहुसंख्य लोकांना सांस्कृतिक शिक्षण तर नव्हतेच पण अक्षरांचीसुद्धा ओळख नव्हती.

 ह्या जुन्या समाजव्यवस्थेतून निघून मानवी समतेच्या तत्त्वावर आधारलेल्या एका नव्या समाजरचनेकडे आपण जात आहोत. कोणीही मनुष्य पोटासाठी कसलाही उद्योग करीत असला तरी त्याला लेखन, वाचन व थोडे सांस्कृतिक शिक्षण मिळाले पाहिजे असा हल्ली कटाक्ष आहे व त्यामुळे शिक्षण घेण्याला योग्य अशा सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण तर मिळाले पाहिजेच पण दुय्यम व उच्च शिक्षणही शक्य तितक्या जास्त लोकांनी घ्यावे अशी व्यवस्था करण्यास आपण झटत आहोत. पूर्वी कधीही नाही इतक्या संख्येने आज शिक्षणाच्या सर्व शाखांतून विद्याथी शिक्षण घेत आहेत व संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार. ह्या विद्यार्थ्यांना 

आमची संस्कृती / १५९

योग्य त-हेने शिकवणे कसे शक्य होईल हा आपल्यापुढील प्रश्न आहे.

 शाळकरी विद्यार्थी व कॉलेजातील विद्यार्थी
 शाळांतील अभ्यासक्रम व शिकवण्याची पद्धत ह्यांचा सांगोपांग विचार केला नाही तरी एका गोष्टीकडे लक्ष वेधणे जरूर आहे. शाळांतील अभ्यास मोजका असतो. पुस्तके नेमलेली असतात व प्रत्येक धडा शिक्षक वर्गात करून घेतो, त्याचे प्रश्न विचारतो, त्यावर घरी अभ्यास देतो व मुलांनी लिहून आणलेला अभ्यास तपासतो. त्याशिवाय प्रत्येक शाळेत आठवड्याच्या, महिन्याच्या, सहामाहीच्या व सरतेशेवटी वार्षिक अशा परीक्षा असतात. म्हणजे मुलांना शिकवणे, त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे व चाचणी ह्या क्रिया सारख्या चाललेल्या असतात.
 शालान्त परीक्षेनंतर दिसायला विषय जरी मोजके असले तरी ते विस्तारपूर्वक शिकावे लागतात. एकेका तासांत शिक्षक दहा पाने, पंधरा पाने ते एम.एम.ला दोनशे पानांचा ऐवज शिकवीत असतो. शाळेत विद्याथ्र्यांचा अभ्यास वर्गात व घरी दिलेल्या अभ्यासाने करून घेता येतो. कॉलेजात जसजसे पुढे जावे तसतशी मुलांनी स्वत: करावयाच्या अभ्यासाची जबाबदारी वाढते. शिक्षक विषय समाजावून देतो पण अभ्यास करून घेत नाही. सायन्सच्या बाजूला धड्याबरोबर प्रयोग चालवल्यामुळे शिकलेल्याची उजळणी होत असते, पण वाङ्मयेतिहास शाखेच्या बाजूला ते होत नाही. विद्यार्थ्यांचे वय वाढत असते व त्याने आपली जबाबदारी ओळखून न चुकता वर्गास हजर राहणे, लक्ष लावून शिक्षकांचे व्याख्यान ऐकून, ऐकता ऐकता टाचण करणे व घरी आल्यावर पुस्तक पाहून टाचण पूर्ण करणे एवढे केले तरीदेखील कोणीही नापास होईल असे वाटत नाही.
 शाळकरी मुलांप्रमाणे प्रत्यक्ष धडे करून न घेण्यामुळे प्रत्यक्ष धरे देण्याचा वेळ कॉलेजात थोडा असतो. बराच वेळ विद्याथ्र्यांना शेर मोकळा असतो व ग्रंथालयात किंवा घरी त्यांनी ह्या वेळांत अभ्यास अशी अपेक्षा असते. हे फारच थोडे विद्यार्थी करतात. काही विद्या पुस्तके विकत घेण्यास पैसे नाहीत असे ते म्हणतात. पण पुस्तकांची अडचण परीक्षा जवळ आली की त्यांना कळते. पहिल्या दिवसापासन अभ्यास करावयाचा ठरवल्यास ग्रंथालयात जाऊन पुस्तक पाहता येईल. १६० / आमची संस्कृती
आपल्या सहकाऱ्याकडून जरा वेळ मागून घेता येईल. पण खरा प्रकार असा असतो की, पुस्तकाच्या उणीवेची जाणीव फार उशीरा होते.

 सुट्या आणि अभ्यासेतर कार्यक्रम!

 कॉलेजातील अभ्यासक्रमांत एक मोठा अडथळा म्हणजे सुट्टयांचा असतो. विलायतेत रविवार ही सार्वत्रिक सुट्टी असते ती फक्त मिळते. एरवी अभ्यासाच्या कालखंडात (टर्ममध्ये) जवळजवळ सुट्टी नाहीच म्हटले तरी चालेल. त्यामुळे एक टर्ममध्ये किती व्याख्याने द्यावी व विषय कधी संपवावा त्याचा नीट अंदाज शिक्षकाला बांधता येतो. आपल्याकडे रविवारची विलायती सुटी सार्वत्रिक झालीच आहे, पण त्याशिवाय नित्यनैमित्तिक सुट्या इतक्या असतात की, अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नाही. जसजसा अभ्यास वरच्या वर्गाचा, तसतसा सुट्यांमुळे अभ्यास जास्त बुडतो. रविवारची सुट्टी घेतली तर सणावाराच्या सुट्या काढून टाकल्या पाहिजेत. ह्या नित्य सुट्टया कधी आहेत त्याचा निदान अंदाज तरी असतो. पण नैमित्तिक सुट्यांना तर ताळच नाही! नैमित्तिक सुट्टयांत गॅदरिंग (कॉलेजचे, बी.ए.च्या मुलांचे, एम.ए.च्या मुलांचे अशी निरनिराळी) बॅचचा शेवटचा पदवीदान समारंभाचा दिवस, व नंतरचा दिवस, आंतर्विद्यालय सामन्यांचे दिवस, बक्षीससमारंभाचा दिवस, खेळात अजिंक्यपद मिळेल त्या कॉलेजाला आणखी एक दिवस- व कोणी मेल तर- अशा अनेक सुट्या केव्हा येतील ह्याचा नेमच नसतो. एम.ए.ला सर्व व्याख्याने सकाळी असतात. आठवड्यातून दर विद्यार्थ्याला बहुतेक फक्त चारच व्याख्याने असतात. काही प्रोफेसर चार दिवस फुकट जाणे नको (- गणेशखिंडीला जाण्या-येण्यात फार वेळ खर्च होतो-) म्हणून दोन दोन तास लागोपाठ घेतात. अशा वेळी सुट्टीमध्ये फार अभ्यास बुडतो. खरोखर एम.ए.ला एकही सुट्टी देण्याचे कारण नाही. कॉलेज २० जूनला सुरू होऊन समारे १५ ऑक्टोबरपर्यंत चालते व परत १० नोव्हेंबरपासून १५ मार्चपर्यत दुसरी सहामाही असते. ह्या हिशेबाने पहिल्या टर्मचे एकुण दिवस ११७ व नाताळची १४ दिवसांची सुट्टी काढून टाकली म्हणजे दुस-या टर्मर्च ११५ दिवस- असे शैक्षणिक वर्षांत एकंदर २२८ दिवस असतात. ह्यांतील सुमार मारे ३२ रविवार व २० ते २२ पुणे विद्यापीठाच्या सुट्टया 

आमची संस्कृती / १६१

(विद्यापीठस्थापना दिन, शिवजयंती, टिळक जयंती आणि नेहमीचे धार्मिक सण, तसेच आंतरमहाविद्यालयीन सामन्यांकरिता तीन दिवस इत्यादी) आणि प्रत्येक महाविद्यालयाच्या विशिष्ट सुट्या (नियामक मंडळातील अगर शिक्षकांपैकी कोणी मृत झाल्यास, तसेच प्रत्येक महाविद्यालयाचे संमेलन, स्थापनादिन इत्यादी) सुमारे ५ ते ६ असे एकूण सुमारे ६० दिवस वगळले म्हणजे १६८ दिवस केवळ शिक्षणाकरिता उरतात. त्यांतलेही दर टर्ममध्ये ७-८ दिवस परीक्षेकरिता द्यावे लागतात. म्हणजे दोन्ही टर्ममध्ये १२-१५ दिवस वाढले; म्हणजे सुमारे १५० दिवस अभ्यासाकरिता उरतात. बी.ए. किंवा बी.एस्सी. ह्यांची फी वर्षास २५० ते ३०० रुपये असते हे लक्षात घेतले म्हणजे एक दिवस फुकट घालवणे म्हणजे पालकांचे किती पैसे फुकट घालवण्यासारखे आहे हे सहज समजेल. आणि तरीही विद्यार्थी अगदी क्षुल्लक कारणाकरिताही काडीमात्र विचार न करता सुट्टी मागण्यास तयार असतात! बरे, वर्षात जो अभ्यास करावयाचा असतो तो कायमचा असतो. तेव्हा सुट्टीमुळे अभ्यास बुडाला म्हणजे एक तर नेमलेला सर्व भाग वर्गात होऊ शकत नाही, किंवा सुट्टीच्या दिवशी जादा तास घेऊन सर्व भाग करावा लागतो. म्हणजे कसेही पाहिले तरी सुट्टीमुळे विद्यार्थ्याचा कोणत्याच प्रकारचा फायदा होत नाही. केवळ तात्कालिक ‘सुटका' ह्यापलीकडे त्याला किंमत नाही. पण हा विचार कोणी करीत नाही.
 सुट्टयांखेरीज किंवा सुट्यांच्याच जोडीला अभ्यासाखेरीज इतर कार्यक्रमांमध्येही विद्याथ्र्यांचा बराच वेळ जातो. खेळ, नाटके बसवणे, वादविवादसभा, एन.सी.सी. वगैरे कार्यक्रम चालू असतात. प्रत्यक्ष व्याख्यानाखेरीज विद्यार्थ्यांना कॉलेजात मोकळा वेळ पुष्कळच असतो व अभ्यास करूनही ह्या कार्यक्रमांना भरपूर वेळ मिळणे शक्य असते. पण ह्या कार्यावर कित्येकदा एवढा भर दिला जातो की अभ्यासाकडे मुलांचे लक्ष लागत नाही. इंग्लंडात खेळांना महत्त्व बरेच आहे. शाळांतून व कॉलेजांतून सामने चालू असतात. युरोपातील इतर देश इंग्लंडच्या मानाने गरीब असल्यामुळे तेथे खेळांचे बंड नाही. युनिव्हर्सिटीतर्फे कोण खेळाडू आहेत हे बहसंख्य विद्याथ्र्यांना माहीतही नसते. खेळणारे खेळत असले तरी त्याची दखल युनिव्हर्सिटी कधीही घेत नाही. युनिव्हर्सिटीचा मुख्य व १६२ / आमची संस्कृती

एकमेव कार्यक्रम शिक्षण अशी भूमिका असते. इंग्रजांच्या राज्यामुळे आपणही खेळांना अभ्यासक्रमात घुसडून दिले आहे. इंग्रजांचे खेळ थोडेच आहेत व त्यामुळे असल्या सामन्यात त्यांचा फार वेळ जात नाही. शिवाय इंग्लंडमधील सर्व शाळा व कॉलेजे ह्यांचे सामने चालत नाहीत. पण आपण मात्र क्रिकेट, टेनीस, बॅडमिंटन, पिंगपाँग ह्यांशिवाय हुतूतू, खोखो, आट्यापाट्या, कुस्ती व इतर वैयक्तिक खेळ ह्या सर्वांचेच सामने करतो व ते एका विद्यापीठाच्या सर्व कॉलेजांचे; ह्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि कॉलेज व विद्यार्थी ह्यांचा पैसा फार खर्च होतो.
 विद्याथ्र्यांनी शाळेत अगर कॉलेजात असताना खेळ, वक्तृत्वाच्या चढाओढी, बॉय-स्काउट, नॅशनल कॅडेट कोअर इत्यादी प्रकारच्या निरनिराळ्या अभ्यासेतर चळवळीत किती वेळ घालवावा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यातूनही पहिल्या टर्ममध्ये काही ठिकाणी पावसाळा व काही ठिकाणी उन्हाळा असल्यामुळे खेळांचे सामने बहुतेक दुस-या टर्ममध्येच होतात. जर्मनी, फ्रान्स वगैरे देशांत निदान विद्यापीठात तरी हे। खेळांचे बंड नाही. शनिवार-रविवारी विद्यार्थी पायपिटीला, होडीतून सहल करण्यास किंवा काही खेळ खेळण्यास जातात. पण अभ्यासाच्या दिवसांत विद्यार्थी सामने खेळण्यास गेले आहेत ही गोष्ट तेथे प्रत्येकाला चमत्कारिक वाटेल. जर्मन विद्यापीठातील प्रत्येक प्राध्यापक-मुख्यापासून दुय्यमापर्यत आपले संशोधन, अध्यापन, लेखन, वाचन ह्यांत गुंतलेला

असतो. अर्थात तोही रविवारी अगर उन्हाळ्या-हिवाळ्याच्या सुट्टयांत पायी प्रवास, पोहणे, खेळणे, बर्फाचे खेळ खेळणे ह्या गोष्टी करतो. पण एकदा टर्म सुरू झाली की, मग ह्या सर्व गोष्टी बंद. विद्यार्थ्यांच्या अभ्यासेतर जीवनाशी अध्यापकांचा फारच थोडा संबंध येतो. एकंदरीतच इंग्लंडच्या वरवर पाहून केलेल्या नकलीमुळे आपण विद्यापीठात खेळांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिले आहे आणि खेळ किंवा व्यायाम ही साधने शरीरस्वास्थ्य, तरतरी, उत्साह यांची साधने आहेत; साध्ये नव्हेत है विसरलो आहो. विद्यापीठातील जीवनाचे मुख्य साध्य ज्ञान मिळवणे, शील बनवणे हे आहे व त्याकरिता सपाटून अभ्यास करणे जरूर आहे हे सर्वांनी ओळखले पाहिजे. परिस्थिती मात्र अशी आहे की, जर एका कोणत्या गोष्टीचा विद्याथ्र्यांना कंटाळा असेल तर तो अभ्यासाचा. अभ्यास करावा 

आमची संस्कृती / १६३

लागू नये म्हणून हरप्रयत्न चालू असतात. अभ्यासाला एकसारखा प्रतिकार होत असतो. वाटेल तितक्या नोटिसा लावल्या तरी सर्व विद्यार्थी 'ट्युटोरियल' लिहून आणून देत नाहीत. शंभर विद्याथ्र्यांच्या वर्गात आठ दिवस मुदत देऊन घरून काही अभ्यास लिहून आणावयास सांगितला तर कधीही सर्व शंभर मुले तो आणणार नाहीत! जी आणतील त्यापैकी समाधानकारक कितींचा हा प्रश्न वेगळाच!

 शिक्षण कुचकामाचे ही वृथा ओरड!
 ह्या झाल्या विद्यापीठातील अडचणी. ह्यांशिवाय मोठी अडचण म्हणजे अभ्यास करावयास जी सामाजिक परिस्थिती लागते ती नाही. आपल्या बहुसंख्य देशबांधवांना शिक्षण घ्यावयाची जी संधी मिळत नाही ती आपल्याला मिळाली आहे, आपण त्याचा शक्य तितका जास्त उपयोग करून घेतला पाहिजे अशी भावना असेल तर विद्यार्थी अभ्यास करतीलच करतील. पण विद्याथ्र्यांना तसे वाटावे असे वातावरण समाजात नाही. सर्व लोकांनी हल्लीचे शिक्षण कुचकामाचे म्हणून ओरड केली तर शिक्षणाबद्दल प्रेम व आदर नष्ट होतात व शिकवणारा बोलला किंवा त्याने शिक्षा केली तर ते योग्यच आहे असे वाटेनासे होते.
 हल्लीचे शिक्षण कुचकामाचे आहे अशी ओरड सायन्स, एजिनिअरिंग, वैद्यक, शेती वगैरे शिक्षणाबद्दल नसते. ती बी.ए. व एम.ए.बद्दल असते. सध्याच्या शिक्षणक्रमाबद्दल विस्ताराने लिहिण्याचे हे स्थान नव्हे. पण ते शिक्षण व त्याचे कार्य हे थोडक्यात काय आहे ते पाहणे परीक्षांबद्दल बोलताना अस्थानी होणार नाही. कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून एम.ए.पर्यंत प्रत्येक विद्यार्थी जगाचा सांस्कृतिक इतिहास, जगाचा भूगोल, नागरिकत्व म्हणजे काय, हिंदुस्थानचे राज्यतंत्र, काही उत्तम इंग्रजी वाङ्मय, तर्कशास्त्र किंवा गणित, मातृभाषा हे विषय शिकतो व तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, राजनीती, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, संस्कृत, पाली, अर्धमागधी, जर्मन, फ्रेंच, इंग्रजी, मराठी वगैरे भाषा इत्यादी विषयांपैकी एक किंवा दोन ऐच्छिक विषय म्हणून शिकतो. ह्यांत कुचकामाचे असे काय आहे हेच कळत नाही. एखाद्या खंडप्राय देशात लक्षावधी कारकून, अधिकारी वर्ग, शिक्षक हे लागणार आणि ते बहुसंख्य १६४ / आमची संस्कृती

बी.ए. किंवा एम.ए. झालेल्यांमधून येतात. ज्यांच्या हातात लहानापासून मोठी कामे असतात अशा लोकांना बरील त-हेचे शिक्षण मिळाले तर ते देशाच्या दृष्टीने निरुपयोगी आहे असे वाटत नाही. ह्या शिक्षणात इतिहास शिकताना प्राचीन व अर्वाचीन भारतावर जास्त वेळ खर्चावा, सांस्कृतिक इतिहास केवळ पाश्चिमात्यांच्या चष्म्यांतून शिकवला जातो तो भारतीय दृष्टीने शिकवावा असे व इतर तपशीलाबद्दल मतभेद होण्याचा संभव आहे. पण एकंदर जे शिक्षण मिळते ते व्यर्थ आहे ही ओरड योग्य वाटत नाही.

 राजकीय पक्षांचे प्रचारसाधन!

 शिक्षणाच्या विरुद्ध ओरड हेच एक विद्यार्थ्यांचे मन चाळवण्याचे कारण नसते. राजकीय पक्षांना थोड्या पैशांत मोठा प्रचार करायला विद्यार्थी हे एक अतिप्रभावी साधन असते. गेल्या वर्षी लखनौ विद्यापीठात स्टुडंटस- युनियनवरून जे मोठे भांडण झाले त्याची दखल दुर्दैवाने आपल्याकडील पुढा-यांनी घेतली नाही. पण त्याचे मूळ फारच उदबोधक आहे. तिकडे विद्याथ्र्यांचा एक संघ आहे. व त्यावर विद्यापीठाच्या अधिका-यांचे नियंत्रण व ढवळाढवळ नसावी हे विद्याथ्र्यांचे म्हणणे सकृतदर्शनी रास्त वाटते. पण विद्यार्थ्यांचे म्हणजे संघचालकांचे म्हणणे असे की, ह्या संघात प्रत्येक विद्यार्थ्याने आले पाहिजे, इतकेच नव्हे तर संघाची वार्षिक फी कॉलेजे व युनिव्हर्सिट्यांनी मुलांकडून शिक्षणाची फी गोळा करताना सक्तीने गोळा करून संघाच्या हवाली केली पाहिजे! अशा त-हेने हजारो रुपये फी गोळा होते व ती सेक्रेटरी व त्यांचे सूत्रचालक राजकीय पक्ष यांच्या ताब्यात जाऊन गुंडगिरी राजरोसपणे चालते. उत्तरेकडच्या ब-याच विद्यापीठांतून हे संघ अस्तित्वात आहेत व ते इतके बलवान आहेत की, कित्येक विद्याथ्र्यांना ह्या गोष्टीचा वीट आला असूनही मोठ्याने बोलण्याची सोय नाही. कारण लागलीच मारपीट होते. शिस्त, शिक्षण व परीक्षा- कशाच्याच बाबतीत नियंत्रण राहत नाही. मुले अभ्यास करीत नाहीत. चार उनाड मुलांना प्रश्नपत्रिका जड गेल्या की, भर मंडपातच मारामारी व आरडाओरडा सुरू होतो. मुलाला नापास केल्यावरून शिक्षकाला चोप व प्रसंगी शिक्षकाचा खूनही झाला आहे.अशी परिस्थिती सर्वस्वी येथे आली नाही. पण गेल्या वर्षी काही

आमची संस्कृती / १६५

विद्यार्थ्यांनी पुण्याच्या रस्त्यात एका वयस्कर प्रोफेसरांना मारले तरी विद्यापीठाने त्याची काहीच दखल घेतली नाही. ह्यावरून लवकरच उत्तरेकडील परिस्थिती इकडे येईल अशी भीती वाटते.

 विद्यार्थ्यांची व पालकांची बेपर्वाई
 मुलाना शिक्षण उत्तम मिळावे, मुलांनी परिश्रमपूर्वक शिकावे व ते काय शिकले ह्याची नीट चाचणी व्हावी अशी इच्छा असेल तर शिक्षणाबद्दल व शिक्षकांबद्दल समाजाची भावना आदराची व प्रेमाची पाहिजे, इतकेच नव्हे तर शिक्षकांशी सहकार्य झाले पाहिजे. चांगली परीक्षा म्हणजे कठीण परीक्षा व जितकी जास्त मुले नापास तितका शिक्षणाचा दर्जा उच्च हे समीकरण आम्हा शिक्षकांना कबूल नाही. पण विद्यायच्या व पालकांच्या म्हणजे पर्यायाने समाजाच्या बेपवईने तसे होते खरे.
 पुण्यातील फग्र्युसन कॉलेजातील इंटर सायन्सचा वर्ग उदाहरणा- दाखल घेऊ. त्या वर्गात एकंदर चारशे साडेचारशे विद्यार्थी असतात. त्या विद्यार्थ्यांना वर्षभर वर्गात हजेरी द्यावयाची असते, प्रयोग करावयाचे असतातनिबंध लिहावयाचे असतात व तिमाही, सहामाही व नऊमाहीची परीक्षा झाली की वार्षिकला बसावयाचे फॉर्म दिले जातात. फॉर्म देताना हजेरी, प्रयोग, निबंधलेखन किती प्रमाणात आहे हे पाहून, त्या शिवाय झालेल्या तीन परीक्षांत मिळून एकेका विषयात निदान एकदा तरी पास झाले पाहिजे असा नियम आहे. हा नियम मोठा कठीण आहेअसे कोणीही म्हणणार नाही. जी मुले तिमाही व सहामाहीत नापास होतात त्यांच्या पालकांना मुलाचे मार्क पाठवून, तो अभ्यास करीत नाही, त्याला समज द्यावी' अशी विनंती करण्यात येते. फॉर्म मिळण्यासाठी काय नियम आहे हे विद्यार्थ्यांना वर्षारंभी व अधूनमधून सांगण्यात येते. चारशेपन्नासपैकी २५८ सर्व परीक्षांत सर्व विषयांत पास होते. १४९ सर्व परीक्षा मिळून एकएका विषयांत एकएकदा किंवा दोनदोनदा पास असे होते व ४३ असे निघाले की, ते कुठच्याही विषयात पास नाहीत. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की, ह्या ४३ त एकही मुलगी नाही. वर्गात मुलींची संख्या ४० वर आहेह्या ४३ तूनही ज्यांनी निबंध लिहिले होते, १६६ / आमची संस्कृती

ज्यांना शेकडा २५ वर तरी मार्क मिळाले आहेत असे काहून, शेवटी १७ असे राहिले की, त्यांनी मुळीच अभ्यास केला नसल्यामुळे त्यांना फॉर्म मिळाला नाही. मुलगा तिमाही-सहामाहीत नापास झाला असे कळवूनही ज्यांनी दखल घेतली नाही असे बरेच पालक मुख्याध्यापकास भेटावयास येऊन ‘उरलेल्या दोन महिन्यांत मुलगा अभ्यास करीलफॉर्म द्या' म्हणून विनंती करून गेले. पुरेसा पैसा नसल्यामुळे लोकाश्रयावर चालणाच्या संस्थांच्या चालकांना हे दिवस किती मनस्तापाचे गेले असतील त्याची कल्पना इतरांना येणे कठीण!
 इंटर सायन्सचा रिझल्ट, पाठवलेल्या मुलांच्या शेकडा ६५ टक्क्यांच्या जरा वर फग्युसनमध्ये साधारणपणे लागतो तसाच यंदाही लागेल, असे धरून चालले तर असे दिसून येईल की, ४५०-१७८४३३ पैकी २८६ विद्यार्थी पास होतीलत्यांतील २५८ सर्वच्या सर्व (आजारी पडले नसल्यास) व इतर २८ ते ३० असणार. आणखी दहाची भर घातली तरी मूळच्या ४५० तले १५४ खाली राहणार. ह्याची जबाबदारी शिक्षक, पालक, विद्यार्थी व परीक्षापद्धती ह्या चारांवर आहे असे धरून चालले, तर शिक्षक अभ्यासक्रम संपवतो का, मुलांच्या वह्या तपासतो का व प्रयोग नीट होतात का- ह्या प्रश्नांचे उत्तर वर दिलेल्या पद्धतीत थोडेबहुत मिळते. विद्यार्थ्यांकडून योग्य प्रमाणात अभ्यास करून घेण्याची काळजी घेतात असे म्हणण्यास हरकत नाही. शेकडळ ३३ टक्के ह्या सर्व पद्धतीचा फायदा घेतात. उरलेले तितकासा घेत नाहीत व शेकडा १० टक्के मुळीच घेत नाहीत. फॉर्म दिला नाही तर पालक विनंती करावयास येतात. विद्यार्थी दहादा खेपा घालतात. वर्ष फुकट गेले म्हणून त्यांना वाईट वाटते. पण आपल्या कर्तव्यात कसूर झाली असे विद्यार्थी व पालक दोघांनाही वाटत नाही. ‘आम्ही फी देतो, नापास झालो तर आमचे पैसे जातील, तुमचे काय बेचते?' अशी त्यांची विचारसरणी असते. ‘तुमचा मुलगा नाही. जरा त्याला काही सांगा' अशी विनंती काही पालकांना केली तर तासाला येत त्यांनी मुलाचे नाव एका कॉलेजातून काढून दुसरीकडे घातले, असेही

प्रकार घडलेले आहेत.

आमची संस्कृती / १६७

 कष्टाशिवाय फळाची अपेक्षा!
 कर्मविपाक व कर्मफळाची कल्पना हा हिंदु संस्कृतीचा गाभा म्हटला तरी चालेल. आज सर्वांनाच त्याचा विसर पडलेला आहे. पण सरसकट कर्माप्रमाणे फळ ही साधी गोष्ट समजेनाशी झाली आहेकष्ट न करता पैसे कसे मिळतीलशक्य तितके कमी काम करून बढती कशी मिळेल, अभ्यास न करता पास कसे होऊ- ह्याच विवंचनेत जो तो असतो. बरे, अभ्यास केला नाही, कॉपी केली, तर नापास होणे, किंवा त्याच वर्गात राहणे ही शिक्षा भोगावयाची मनाची तयारी नसते. ‘मी अभ्यास केला होता, पण आकसाने मला नापास केले, किंवा यंदा पेपरच जड होते. अशी भाषा मग सुरू होते. कॉपी केलेले विद्यार्थी दरवर्षी येतात. यंदा चुकले, आम्हांला पास करा, पुन्हा असे वर्तन करणार नाही,’ असे सर्वांचे म्हणणे असते. कॉपी करणाराचे खरोखर दोन अपराध असतात. एक अभ्यास न केल्याचा व दुसरा चोरी केल्याचा. पण त्याला वाटते, जरी अपराध केला तरी लोटांगण घातले की शिक्षा मिळू नये. विद्यार्थीदशेत खरोखरच कामाचा वेळ थोडा असतो. बराच वेळ सुट्टीचा व खेळण्याचा असतो. कामाच्या वेळी मन लावून, झटून अभ्यास करणे हे कर्तव्य आहे असे बहुसंख्य मुलांना वाटत नाही. पास व्हावयाची इच्छा प्रत्येकाला असते, पण ते साध्य होण्यास कष्ट हेच एक साधन आहे हे कळत नाही. परीक्षेला दोन महिने राहिले की, दिवे जाळण्यास सुरुवात होते. लायब्ररीतल्या चूकांवर सर्वांची धाड पडते. मग पाळ्या सुरू होतात व कोणाचेच वाचन नीट मननपूर्वक होत नाही. वर्गात जसजसा अभ्यास होतो, तसतसे वाचन व टाचणे करीत गेल्यास शरीराला व मनाला अभ्यासाची व व्यवस्थितपणाची सवय लागेल व ह्याच सवयी पुढच्या आयुष्यात स्वत:च्या व राष्ट्राच्या उन्नतीला उपयोगी ठरतील.
 परीक्षापद्धतीचा दोष म्हणावा तर ह्या एका उदाहरणावरून निदान एवढे तरी सिद्ध होते की, विद्यार्थ्यांची अभ्यासाची चाचणी ह्या दृष्टीनेच नुसता विचार केला तर परीक्षेचा निकाल जवळजवळ आधीच ठरल्यासारखा दिसतो. म्हणजे चाचणी बहुतेक बाबतीत योग्य होते असे म्हणण्यास हरकत नाही. प्रथम श्रेणीचा विद्याथ क्वचित द्वितीय श्रेणीत येईल; अभ्यास न केलेला एखादा विद्यार्थी दोन महिने रात्रीचे दिवस करून १६८ / आमची संस्कृती

कदाचित कसाबसा पास होईल! पण साधारणपणे परीक्षेचा निकाल वर्षाच्या कामाच्या अनुरूप असतो असे दिसते. म्हणजे सध्याच्या परीक्षापद्धतीने विद्यार्थ्यांवर अन्याय होतो हे म्हणणे बरोबर नाही. त्यांतील दोष दुसरे आहेत. परीक्षा कशा असाव्यात ह्याबद्दल विद्यार्थी, पालक व शिक्षक ह्यांची प्रत्येकाची कल्पना निरनिराळी असते. विद्याथ्र्याला वाटते की, अभ्यासाची पुस्तके शक्य तितकी कमी असावीत, व त्यांतलाही जो कमीत कमी भाग वाचून पास होणे शक्य आहे तो शिक्षकांनी दाखवून द्यावा. पालकाने बहुधा विचार केलेलाच नसतो. एकदा मुलगा-मुलगी पास होऊ दे, म्हणजे झाले असे त्याला वाटते. आम्हांला म्हणजे शिक्षकांना वाटते, शिकविलेल्या विषयाचे जास्तीत जास्त ग्रहण केले अशी खात्री पटावी.
 सध्याच्या परीक्षा बहुधा वर्षाच्या किंवा दोन वर्षांच्या शेवटी असतात. व त्या वेळी सर्व विषयांची एकदम परीक्षा होते. परीक्षेचे पासाचे मार्क साधारणपणे शेकडा ३३ असतात. दुस-या शब्दांत सांगावयाचे म्हणजे शिकवल्यापैकी २/३ कळले नाही तरी मुलगा पास होतो. हे योग्य वाटत नाही.

 सध्याच्या परीक्षापद्धतीतील दोष
 सध्याच्या परीक्षापद्धतीचा दोष म्हणजे तीवरून नीट चाचणी होत नाही, हा मुख्यत्वे नसून तीमुळे मुलांना अभ्यासाची सवय लागत नाही व सर्व विषय एका वेळी तयार ठेवण्याचा ताण पडतो असे दोन आहेत. 6 दोन्ही दोष परस्परसापेक्ष व परस्परपूरक आहेत. मुख्य परीक्षा वर्षाशिवटा किंवा दोन वर्षांशेवटी आहे, ह्या भावनेने विद्यार्थी प्रथम अभ्यास करात नाही. अगदी गळ्याशी आले म्हणजे दुस-याने चावून मऊ करून दिली अन्न खावे त्याप्रमाणे नोटस्, प्रश्न व त्यांची उत्तरे एवढेच बघून कसाब पास होतो. सारखा थोडाथोडा पण अखंड अभ्यास, वाचन, मनन व लेखन ह्याची सवय लागत नाही. शिकलेले विषय उत्तम व उपयोगी असूनही त्यांची गोडी लागत नाही. जिथे नोटसूवरच भागवून नेतात तेथे पाठ्यपुस्तकांचे वाचन होत नाही हे सांगणे नलगे. मग बाहेरच्या

आनुषंगिक वाचनाबद्दल तर विचारावयास नकोच. 

आमची संस्कृती / १६९

 वर्षाच्या शेवटी शिकवलेल्या सर्व विषयांची आमूलाग्र परीक्षा घ्यावयाची म्हणजे एका वेळी हजार-दीडहजार पानांतील निरनिराळ्या विषयांवरील विवेचन ध्यानात ठेवावे लागते. विषयाची सर्वसाधारण कल्पना असूनही एखादाच प्रश्न अगदी तंतोतंत न आला तर बरेच मार्क जातात. त्याऐवजी अधूनमधून निबंधलेखन व तिमाही, सहामाही अशा परीक्षा घेतल्या तर शिकणे व परीक्षा घेणे ह्या दोन्ही क्रिया बरोबरीने चालू राहतील. वार्षिकला बसणारा विद्यार्थी सर्व विषयांतं सर्व परीक्षांत पास असला पाहिजे; म्हणजे वार्षिकला फक्त शेवटच्या तिमाहीत झालेल्या भागावर बहुसंख्य प्रश्न व एखाददोन पूर्वीच्या उजळणीचे प्रश्न असा पेपर काढता येईल.
 असे करण्याने प्रत्येक वेळचा पेपर दोनतीन प्रश्नांचाच राहील, विषय मोजका राहील व वर्षाशेवटी ३३ टक्के ज्ञानावर पास न होता विद्यार्थी ५५ ते ८० टक्के ज्ञानावर पास होईल. शिवाय वारंवार परीक्षा व निबंधलेखनामुळे विद्यार्थ्याना पहिल्यापासून अभ्यास करावा लागेल व अध्यापकाला पहिल्यापासून नीट व नियमित शिकवून दर तिमाहीला नेमलेला विषय संपवावा लागेल.
 असल्या परीक्षेला दोन गोष्टी अवघड आहेत. विद्यार्थी नापास झाला म्हणजे त्याला खालच्या विभागात राहावे लागेल. वरच्या विभागात परत मोजक्या भागाची परीक्षा असल्यामुळे नापास विद्याथ्र्याला वर ढकलून चालणार नाही. दुसरे, अशा नापास विद्यार्थ्यांच्या शिकवणीची व्यवस्था करावी लागेल.
 काही वर्षांत परीक्षा न घेता वर्षांच्या परीक्षा, हजेरी व निबंधलेखन ह्यांच्यावर विद्यार्थ्यांना वर चढवण्यास हरकत नसावी. उदाहरणार्थ, कॉलेजातले पहिले वर्ष व बी.ए.चे पहिले वर्ष. मात्र असे करताना शिकवणी नीट होते की नाही, हजेरी व निबंधलेखन ह्यांत कसूर झाली नाही ना व सर्व परीक्षांचा निकाल योग्य लागला नाही, ह्यांकडे लक्ष पुरविले पाहिजे.
 शिक्षण व परीक्षा हे दोन नसून एकाच कार्याचे विभाग आहेत हे समजले तर मुलांच्या परीक्षा घेणारे व निबंधलेखन करणारे व शिक्षक एकच असावेत याबद्दल दुमत होऊ नये. विद्यार्थी कॉलेजात आला की, हजेरीपटावर एक नाव व नंबर ह्यापलीकडे शिक्षकाला त्याची ओळख नसते. पण त्याचे तोंड १७० / आमची संस्कृती

वर्गात दिसले, त्याचे निबंध तपासले, त्याची परीक्षा घेतली म्हणजे तो एक अभ्यासी किंवा उनाड, हुशार किंवा मध्यम किंवा कमी डोक्याच्या हे। शिक्षकाला कळत जाते. त्याची संगत काय, तो वर्तनाने व शीलाने कसा आहे वगैरे कळत जाते. निरनिराळ्या शिक्षकांच्या एकत्र येण्याने व अनुभवाने मलांचे व्यक्तिमत्त्व काय असावे ह्याचा कयास शिक्षकांना येऊ लागतो व शिक्षक व मुख्याध्यापक ह्यांच्याशी विद्यार्थीही काहीशा आदराने, धाकाने, हक्काने व प्रेमानेही वागू लागतो. पुण्यातील सध्याच्या केंद्रीकरणाच्या विचित्र पद्धतीमुळे बी.ए.च्या वर्गात हे सर्व नाहीसे झाले आहे. हजेरी इतकी जुजबी असते की, दोन महिने हॉस्पिटलमध्ये पडलेल्या एका विद्यार्थ्याची पूर्ण हजेरी लागलेली आहे. निबंधलेखनाच्या पद्धतीचा फायदा नीटसा मिळतच नाही. कारण मुलांना आपल्या कॉलेजच्या वाचनालयात बसण्यास वेळच मिळत नाही. वर्गातील निम्मी मुले प्रोफेसरांनी आधी कधीही न पाहिलेली असतात. कॉलेजच्या कामावर म्हणजे पर्यायाने शिक्षकांच्या कामावर नियंत्रण असावे म्हणावे, तर कोण शिकवतो व कोण नाही त्याची बातमीही विद्यापीठाला लागत नाही. अशा परिस्थितीत मुलांच्या तिमाही अगर सहामाही परीक्षा नीटपणे घेऊन त्यांच्या अभ्यासाची प्रगती जोखणे कठीण आहे.
 परीक्षापद्धती अमकीच असावी असे नाही. पण शिक्षण व चाचणी बरोबर चालू राहावी म्हणजे विद्यार्थ्यांना वर्षाशेवटी भार पडत नाही व वर्षभर अभ्यास करावा लागतो. अशासाठी फक्त परीक्षांचीच पद्धत बदलून चालणार नाही तर कॉलेजातील शिक्षणपद्धती, कॉलेजे व विद्यापीठ ह्याच परस्परसंबंध, नेमलेले विषय व त्यांच्या स्पष्ट मर्यादा आखलला शिक्षणक्रम व परीक्षा अशा सर्वांचा एका वेळी विचार झाला पाहिजे.
 असा विचार नीट होऊन फलनिष्पत्ती व्हावयाची तर तो खेळीमेळीच्या, देवघेवीच्या व सहकार्याच्या भावनेने झाला पाहिजे. एका बाजूने अधिकारी व एका बाजूने नोकर ह्या भूमिकेतून संघर्ष व कडवटपणा मात्र येईल व परीक्षा सुधारणेच्या नावाखाली एखादे नवेच भूत विद्याथ्र्यांच्या व शिक्षकांच्या मानगुटीस बसावयाचे- ह्याची काळजी घेतली पाहिजे.