आमची संस्कृती/दोन पिढ्या
आमची संस्कृती / १२
११. दोन पिढ्या
तरुण पिढीला वळण का नाही?
रत्नागिरीचे श्री. आप्पासाहेब पटवर्धन ह्यांनी आपल्या आयुष्याच्या आठवणी देताना एका व्यक्तीचे एक लहानसेच, पण हृद्य चित्र रंगविले आहे. ती व्यक्ती म्हणजे आप्पासाहेबांची आत्याबाई. ह्या आपल्या भावाशेजारी बि-हाड करून, अति दारिद्यात, पण मानाने राहत असत. वयाने मोठ्या असूनही आपल्या लहान भाचरांच्या खेळण्या-बागडण्यात त्या भाग घेत, वेळप्रसंगी आपल्या उदाहरणाने, शिकवणुकीने आयुष्यातील मूल्यांचे ज्ञान देत व त्याबरहुकूम थोडीबहुत कृती करवीत. त्या लवकर वारल्यामुळे लहान भावंडांना त्यांचे दर्शन व मार्गदर्शन दोन्हीही झाली नाहीत, म्हणून लेखकाला फार हळहळ वाटते. अशा व्यक्ती हल्ली समाजात नाहीत म्हणून तरुण मुलामुलींना नीट मार्गदर्शन होत नाही असे काहींचे म्हणणे आहे. अशा बायकांसारख्या व्यक्ती आज दिसत नाहीत व पूर्वी घरोघर होत्या असे स्पष्टपणे व मोठेपणे कोणी कदाचित म्हणणार नाही, पण बहुतेकांच्या मनातून तसे असते. खरोखरच अशा त्यागी व्यक्ती कुटुंबात हल्ली सापडत नाहीत का? त्या नसल्यामुळे हल्लीच्या तरुण पिढीला लागावे तसे वळण लागत नाही, असे म्हणता येईल का? हल्लीच्या मुली, मुलगे पूर्वीच्या पिढीपेक्षा वागुणकीने हीन आहेत का? असे १३० / आमची संस्कृती
नाना प्रश्न उद्भवतात. ह्या प्रश्नाचे उत्तर 'हो' किंवा 'नाही' असे नुसते देऊन भागणार नाही. मागच्या पिढीत घरांतले वातावरण काय होते हे पण पाहिले पाहिजे.
पूर्वीच्या स्त्रीचे जीवन चार भिंतीत
मागच्या पिढीतील स्त्रियांचे जीवन सर्वस्वी घराच्या चार भिंतीत होते.
जरी अशा काही स्त्रिया होऊन गेल्या, की त्यांनी नव-याच्यामागे शेतीवाडी व मोठ्या संसाराची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली, तरी त्यामुळे वरील विधानाला बाधा येत नाही. आजच्या चर्चेत हे लक्षात ठेवले पाहिजे की, कुठचाही नियम सांगितला की, त्याला अपवाद असणारच. चर्चा जिवंत समाज व त्यातील जिवंत व्यक्तीविषयी असल्यामुळे कोणत्याही गोष्टीबद्दल ठाम निरपवाद असे विधान करणेच शक्य नाही. काही स्त्रिया काही विशिष्ट परिस्थितीत मोठमोठ्या जबाबदा-या पार पाडीत, पण एकंदरीने त्यांचे आयुष्य चार भिंतीत, मोठ्या कुटुंबात असे.
{{अशा ब-याच कुटुंबात एखाददोन विधवा बाया असत. त्या कधी गादीवर निजत नसत, रात्रीचे जेवत नसत, त्यांचे उपासतापास बरेच असत, बहुधा घरातील मुख्य स्वैपाक (दुपारचा) त्याच करीत व संध्याकाळचा स्वैपाक दुस-या कोणी केला तर त्या अंगणात मुलांना सांभाळीत बसत, त्यांचा पोषाख नेहमी तांबड्या कावेच्या रंगाचे लुगडे असा एक वस्त्राचा असे. चोळी असलीच तर बिनकाठाची पांढरी असे. कधी त्या एवढे तेवढे फराळाचे, उपवासाचे घेऊन खात बसल्या तर भोवती मुले गोळा होऊन त्यांतील काही भाग फस्त करीत. अशा बायका त्याग व सेवा ह्यांच्या मूर्तीच होत्या असे कित्येकांचे म्हणणे आहे.
त्याग केला की करवला गेला?
आमची संस्कृती / १३१
होईल ह्या भीतीने कोणच्याही वाहनाने न जाता पायी चालतात. वर्षाकाठी हजार मैल तरी त्यांचे चालणे होत असेल. किती थकले भागले किंवा आजारी पडले तरी गृहस्थाश्रमी लोकांकडून कसलीही सेवा करून घेत नाहीत. दिवसा निजत नाहीत. पायांत जोडा घालीत नाहीत. लेखन, चित्रकाम, स्वत:चा कमंडलु व खाण्याचे भांडे लाकूड तासून तयार करणे किंवा लाखवणे, दोरया, गोफ (ग्रंथ बांधण्यासाठी किंवा चवरी करण्यासाठी) विणणे, कापड शिवणे असा उद्योग हाताने चाललेला असतो. अखंड चिंतन, मनन व वाचन चालू असते. दरवर्षी गुरू आज्ञा देईल त्या भागात संचार असतो. हे सर्व स्वामी तरुण म्हणजे तिशीच्या आतील होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी, दहाव्या वर्षी, अकराव्या वर्षी दीक्षा घेतल्या होत्या व तेव्हापासून पहिल्याने अध्ययन व नंतर अव्याहत संचार चालू आहे. कोणीही मनुष्य (पुरुष किंवा बाई) तीस वर्षांचे व्हावयाच्या आत त्याला अशा त-हेची शिक्षा देणे हा गुन्हा होईल असा कायदा सध्या भारत सरकार करीत आहे, त्याविरुद्ध स्वामी प्रचार करीत होते. स्वामींचे वाचन, अभ्यास, तपस्या, ह्या सर्वांबद्दलच्या आदराने माझे मस्तक नम्र झाले. तरुण वयात जगातील सर्व सुखे टाकून अखंड संचार करण्याच्या व्रताने आम्ही सर्व थक्क झालो, पण स्वामींच्या प्रचाराला माझ्याकडून होकार मिळेना, दहाव्या अकराव्या वर्षी ब्रह्मचर्य, संन्यासदीक्षा ह्याचा अर्थ तरी मुलांना कळेल का? त्या वेळी सर्वांसमक्ष घोषणा करून दीक्षा घेऊन, नंतर गुरुगृही राहून सर्वांच्या मेळाव्यात शिक्षण घ्यावयाचे असे ह्या पंथांतील बरेच लोक करतात. दीक्षा घेतल्यावर काडीचेही स्वातंत्र्य नसते. बालपण खडतर अशा यमनियमांत जाते. दिवसाचे चोवीस तास दुस-याच्या सान्निध्यात असल्यामुळे यमनियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. पुढे संचारास निघाले तरी कधीही एकटे नसतात. एकमेकांचे एकमेकांवर लक्षही असते. अशा त-हेने सगळीकडून बंदिस्त असले म्हणजे हळूहळू वैराग्य अंगी बाणतही असेल. पण अशाही परिस्थितीत पळून जाऊन परत गृहस्थाश्रमी बनलेले जैन गृहस्थ मी पाहिले आहेत. ह्या साधूची तपस्या व त्याग असामान्य तर खराच, पण तो त्याग त्यांनी केला की त्यांच्याकडून करवला गेला, हा प्रश्न मनामध्ये येतोच. १३२ / आमची संस्कृती
विधवा त्यागमूर्ती की कारुण्यमूर्ती
पूर्वीच्या विधवा बायांची तपस्या तर ह्या साधुंहूनही खडतर वाटते. साधू व स्वामीजी नेहमी इतर साधू व शिष्य-परिवार ह्यांचे संगतीत असतात. अध्ययन व चिंतन ह्यांत वेळ घालवतातत्यांच्या तपस्येबद्दल समाज त्यांचा आदर करतो. वयाच्या अकराव्या की आठव्या वर्षी क्षणभरच्या उभाळ्याने का होईना, न समजता, वडील माणसांच्या भरीने का होईना, पण त्याने स्वत:हून संन्यासदीक्षा घेतलेली असते. बिचाच्या जुन्या काळच्या विधवेची तपस्या सर्व बाजूनी जास्त खडतर असे. कोवळ्या वयात लगन म्हणजे काय हे नीट समजायच्या आधीच तिचे लग्न झालेले असे. गृहस्थाश्रमाच्या सर्व जबाबदारीची जाणीव नसली, शरीरसुखाची कल्पना नसली तरी दागदागिने, कपडेलते वगैरे सौभाग्यश्रृंगार करण्याची, मंगळागौरीसारखी गोड व्रते पाळण्याची, सासरमाहेर, माहेरसासर अशा फेच्या घालण्याची तर तिची खासच कल्पना असणार. अशा वेळी विधवा होणे म्हणजे केवढा आघात! गृहस्थाश्रमाची पहिली पायरी चढतानाच जबरदस्तीने बिचारीला संन्यासाची दीक्षा मिळे. लगेच मुंडण, कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे हे विधी होऊन तांबडे वस्त्र मिळे. नाही अभ्यास, नाही लिहिणेवाचणे. नाही मननध्यानकेवळ शारीरिक कष्ट मात्र तिच्या नशिबी असत. समाजात मान-सन्मान तर दूरच, पण ती म्हणजे एक चालताबोलता अपशकुन असे. लग्न, मुज५ मंगळागौर, डोहाळजेवण, बारसे, असे गृहस्थाश्रमाचे सुखसोहाळे घरी चालले म्हणजे मरमर काम करायचे, पण कुणाला आपले तोंड दाखवावयाचे नाही, अशी शिस्त असे. जैन साधु निदान गृहस्थापासून चार हात लांब राहतात; पण बिचान्या विधवेला गृहस्थाश्रमी होणान्या पूर्वीच्या काळच्या, अत्यंत सूचक अशा सोहळ्यात राहून संन्यासी राहणे भाग होते. त्यांना त्यागमूर्ती म्हणावे, की कारुण्यमूर्ती म्हणावे, की समाजाच्या कठोरतेची चालती बोलती निदर्शने म्हणावे हे ज्याचे त्याने ठरवावे .
विधवांच्या वागण्याचे चार प्रकार
आमची संस्कृती / १३३
मनोवृत्ती हळूहळू मरून जातात, मन धर्माचरणाकडे लागते. घरची मंडळी सात्विक वृत्तीची असतील तर घरात मान मिळतो. प्रेम मिळते व अशा बाया त्यागमय व प्रेममय होऊन राहतात. त्यागाची सुरुवात जुलमाने असली तरी तो अंगी बाणतो-पण त्यांच्या त्यागावर व प्रेमावर पोसून त्यांचे गुणगान करणारे कुटुंबीय मात्र स्वार्थी किंवा स्वार्थी नसल्यास आंधळे असे मला खचित वाटते. लहानपणी अशा व्यक्तींच्या सहवासात मन उदात्त बनेल, ह्या व्यक्तींच्या त्यागाची मुळे कशात आहेत ते कळणार नाही. पण मोठेपणी तरी त्यावर विचार सुचून निदान करुणा तरी उत्पन्न झाली पाहिजे. तीही उत्पन्न न होणारे व स्वत:च्या विधवा बहिणी, भावजया, मावशा, आत्या, ह्यांच्याकडून कुटुंबाची विनामूल्य यथेच्छ सेवा करून घेणारे व समाजात मानसन्मान असलेले कितीतरी पुरुष व स्त्रिया मी पाहिल्या
आहेत. अशा त-हेच्या त्यागाने त्या विशिष्ट व्यक्तीचा काय गुणविकास होत असेल तो होवो, पण कुटुंबावर व समाजावर होणारा परिणाम खात्रीने इष्ट नाही.
दुस-या काही स्त्रिया एकत्र कुटुंबातील काही पुरुषांच्या कामवासनेला बळी पडतात. व्यवहारांतही खुषीपेक्षा जुलूमजबदरस्ती जास्त असे. संन्यास जसा जुलमाचा, तशाच जुलमाने घरातील भोगदासी होऊन काहींना राहावे लागते. ह्या दु:खाला वाचा फोडता येत नाही. घरातल्या ब-याच जणांना हा प्रकार माहीत असूनही प्रतिकार करण्याची छाती नसे.
तिस-या प्रकारच्या विधवा स्त्रिया फशी पडत. घरात कोणीच त्राता नसल्याने घर सोडून जावे लागे व त्या धंद्यांत पडत. अशा स्त्रियांचे अतिवास्तव चित्रण कै. हरिभाऊ आपट्यांनी आपल्या कादंब-यांतून केलेले सर्वांनी वाचलेच असेल.
चौथ्या त-हेच्या बाया वडीलधारे माणूस असेल तोवर ताटाखालचे मांजर असतात. एखादा मुलगा असेल तर तो मोठा होऊन मिळवू लागेपर्यंत गुलामगिरीत राहतात. पण त्यांच्या नशिबाने तो मिळवता झाला तर त्याचे लग्न लावून देऊन सुनेला यथेच्छ छळून काढतात. ह्या स्वत: संसारातून अशा वेळी उठलेल्या असतात की, त्यांच्या सर्व वासना अपु-या राहिलेल्या असतात व त्या त्या सुनेच्या संसारातून पुरवू बघतात. मुलाचे १३४ / आमची संस्कृती
स्वत:च्या बायकोवर प्रेम असलेले ह्यांना बघवत नाही, नातवंडे आपल्या
आईभोवती पिंगा घालताना बघवत नाही, कोणी काय खावे, कसे खावे, किती खावे, काय ल्यावे वगैरे सर्व गोष्टींवर त्या हुकूमत ठेवू पाहतात. अपु-या वासनांचे हे जिवंत भूत ज्या संसारात असेल तो संसार किती भयानक असेल हे सांगणे नकोच.
त्यागाचे स्वरूप बदलून गेले
अशा चारी त-हेच्या स्त्रिया आजही पुष्कळ ठिकाणी दिसतात. पण समाजाच्या ज्या परिस्थितीमध्ये त्या निर्माण झाल्या ती परिस्थितीच पांढरपेशा वर्गात बदलली असल्यामुळे प्रत्येक कुटुंबातून त्या दिसत नाहीत. किंवा त्यागाचे स्वरूपच बदलून गेले आहे असे म्हणणे जास्त बरोबर होईल. आपण अविवाहित राहन भावांचे किंवा बापाचे संसार करणारे स्त्री-पुरुष माझ्या पाहण्यात आहेत. अशांचा त्याग गतकालीन विधवांपेक्षाही जास्त सरस वाटतो. आपल्या भावंडांकडे किंवा आपल्या आईबापांकडे दुर्लक्ष करून स्वत:चा संसार थाटणारे कितीतरी असतातथोडा स्वार्थ, थोडा परार्थ करणारेही असतात. पण स्वत:चे सुख बाजूस सारून परार्थ आयुष्य झिजवणारे खरोखर विरळा. समाजाने अशान" स्वार्थाचा मार्ग मोकळा ठेवला असूनही ते तो टाळतात. दुसरा मार्ग मोकळा नसल्याने संन्यस्त जीवन कंठणाच्यांपेक्षा हा हल्लीच्या युगात का कधी दिसणारा संन्यास मला जास्त मोलाचा वाटतो.
दोन पिढ्यांत बदललेले जीवन
आमची संस्कृती / १३५
मोठ्यांचे विश्व संकुचित असे. आपले कुटुंब हेच विश्व कित्येक वर्षे मुलांचे असे. मुलगे व मुली हल्लीइतक्या लहानपणी शाळेत जात नसत. त्याचप्रमाणे घराबाहेरचे मोठे विश्व म्हणजे शाळा होती. ती नुसती शिक्षणाचे साधन नसून करमणुकीचेही साधन असे. आई-बाप मुलांवर करडी देखरेख ठेवीत, असेही म्हणवत नाही. मुली शाळेत जात नसल्यामुळे बहुतेक घरीच असत. आता घरचे व बाहेरचे जग बदलले आहे. घरची शिस्त व आईबापांची देखरेख नुसती जास्त पाहिजे असे नव्हे, तर समजून पाहिजे व जितकी मुलांवर हवी तितकीच स्वत:वरही हवी. हल्लीच्या पिढीत जीवन कितीतरी गुंतागुंतीचे व अवघड झाले आहे.
मुलींच्या वागणुकीतील फरक
कोकणातले खेडे राहिलेच, पण पुण्यासारख्या शहरांतसुद्धा मुलाचे लक्ष वेधेल अशा गोष्टी किती कमी होत्या! फर्गुसनपासून हुजूरपागेपर्यंत चालत गेले तर ‘वामन गोपाळ यांचा सार्सापरिला' व कधी कधी ‘संगीत सौभद्र' संगीत मानापमान' या जाहिराती दिसत. दुकानांना मोठमोठ्या काचेच्या खिडक्या व त्यांत आकर्षक रीतीने मांडून ठेवलेले जिन्नस कधीच दिसत नसत. इराणी लोकांची चहा-फराळाची दुकाने तर मुळीच नव्हती. मुख्य म्हणजे निरनिराळ्या सिनेमांतील रंगीत दृश्ये, व त्यांत काढलेले वास्तवापेक्षा आकाराने कितीतरी मोठे व रंगाने कितीतरी जास्त भडक स्त्री-पुरुष तर डोळ्यापुढे नसतच. घरचे गरिबीचे वातावरण, क्वचित एखाद्या लहान बोळांतल्या मोठ्या वाड्यात तीन चार खोल्यांचे बिहाड, सर्व चुली पेटल्या म्हणजे वाडाभर धूर, या सर्वांतून बाहेर जाऊन शाळेत चारपाच तास घालवावयाचे म्हणजे एक त-हेची पर्वणीच वाटावयाची. शाळेत काय किंवा घरी काय, वाचावयास जे वाङ्मय मिळे ते हल्लीच्या मानाने अतिशय कमी व अतिशय निराळ्या त-हेचे असे. घरात मुलींना किंवा मुलांना कसे वागावयाचे याचे धडे सारखे केव्हाही मिळत नसतच. पण विशेषत: मुलींना घरात लहानसहान कामे असत. आपले, क्वचित एखाद्या लहानसहान भावंडाचे कपडे धुणे, थोडे पाणी भरणे, पाटपाने करणे, उष्टी काढणे व खालच्या भावंडांना खेळवणे ही कामे तर नेहमी असत. पण त्याशिवाय आई बाहेरची झाल्यावर तीन दिवस स्वयंपाक १३६ / आमची संस्कृती
करून शाळेत येणाच्या मुलीही कितीतरी होत्या. त्या वेळी रंगीबेरंगी छापील पातळे मिळत नसत. शाळेतल्या मोठ्या मुलींचा पोषाखं म्हणजे हिरवे, काळे, बैंगणी, अशा मळखाऊ रंगांची लुगडी, व पांढरे किंवा चिटाचे पोलके असा असे व लहान मुलींचा खणाचे किंवा चिटाच परकरपोलके असा असे. कोकणात तर रत्नागिरीसारख्या शहरांतसुद्धा मुली क्वचित शाळेत जात व मुले चांगली मोठी होईपर्यंत लंगोटी व सदरा यांखेरीज, शाळेत जाताना काही घालत नसत.
घरी वडील माणसांचा पोषाखही अगदी साधा असे. परीटघडाच कपडे त्या वेळी माहीतच नव्हते म्हटले तरी चालेल. हल्ली खादा पांघरणाच्या माणसाला सुद्धा परीटघडीचे स्वच्छ पांढरे कपडे घातल्यामुळे जी ऐट येते ती त्या वेळी भलेमोठे रेशमीकाठी धोतरवाल्यालासुद्धा नसे.
सिनेमा मासिकांनी लावलेले वळण
हल्ली सर्वच राहणी बदलली आहे. घरात बाहेर पूर्वी कधी पाहिल्या नाहीत त्या गोष्टी दिसत आहेत. मागच्या पिढीचा पांढरपेशा वर्ग पूर्वीच्या गरिबीतून चांगलाच वर आल्यामुळे त्यांची मुले सुखवस्तू घरातून ना लागली आहेत. त्यांची राहणी पूर्वीसारखी कशी असणार? पूर्वी शिक्षण फळ म्हणजे चांगली नोकरी मिळे किंवा तिची आशा सोडली तर समाज राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातं चटदिशी पुढारीपण मिळत असे. हल' पैसा व मान या दोन्ही गोष्टींनी बी.ए. डिग्रीपर्यंतचे शिक्षणाला आत कमी किंमत आहे. व वरचे शिक्षण घेण्याची ऐपत, पात्रता व स्वार थोड्यांनाच आहे. त्या काळी शाळा-कॉलेजांतील शिक्षण एवढाच एक उन्नतीचा मार्ग लोकांपुढे होता. आता हळूहळू दुसरे मार्ग उत्पन्न होऊ लागले आहेत. पण त्यावर जाण्यास लोकांची मने तयार नाहीत. * पाढरपेशा वर्गातून शिक्षणाला अतिशय मान असे. शाळेच्या मास्तरा तुच्छ उद्गार सहसा ऐकू येत नसत. हल्ली पुढारी म्हणविणारे लोकच अवेळी सकारण अकारण शिक्षणाबद्दल अतिशय अनुदार उदगार का पूर्वी मुलगा नापास झाला तर आईबाप हळहळत असत. हल्ली मु' तिमाही सहामाही किंवा आठवड्याच्या परीक्षांचे वृत्तांत कळवून त्याची दखल घेणारे आईबाप मिळत नाहीत. आपला मुलगा किंवा काढतात.
आमची संस्कृती / १३७
शाळेत किंवा कॉलेजात नेमाने जातात का? दिवसाचा किती वेळ अभ्यासात घालवतात? ती कोणत्या विषयात कच्ची आहेत? या साध्या गोष्टींकडे लक्ष पुरविणारे आईबाप किती आहेत? कर्तव्यतत्परतेचे धडे घरी किंवा बाहेर किती प्रमाणात मिळतात?
मुख्य शिक्षण, अव्याहत मुलांचे हवे
पूर्वी मुलींना शिक्षण म्हणजे मोठा लाभ वाटत असे. कॉलेजातील शिक्षण तर वडील माणसांशी भांडून भांडून मिळवलेले असे. इतरांना नाही असे काहीतरी आपल्याला मिळाले आहे व त्याचे चीज करून दाखविले पाहिजे, ही जाणीव घरची मंडळी व समाज यांजकडून सारखी मिळत असे. आता मुलींना मुलांच्या बरोबरीने शाळेत घालतात. त्यात काही विशेष असे आपल्याला मिळते असे त्यांना वाटले नाही तर त्यात काही नवल नाही. प्रत्येकीने शाळेत गेलेच पाहिले का गं!' असे विचारणाच्या काही मुलीही मी पाहिल्या आहेत.
मुलींच्या वागणुकीतही फरक पडला आहे. मुलीचा पाय वाजता कामा नये, हसताना आवाज ऐकू येता कामा नये, रस्त्याने जाताना उजव्या भुजेवरील पदर ढळता कामा नये, असे कितीतरी नियम होते. असे हल्लीचे वागणे नाही. त्यावरून हल्लीच्या मुली मर्यादशील नाहीत असे म्हणता येईल का? मुसलमानी मुलखात स्त्रियांच्या शरीराचे कोणतेही भाग दिसत नाहीत म्हणून त्या स्त्रिया जास्त मर्यादशील असे म्हणता येईल का? बाह्य वागणुकीच्या तन्हा, देशकालसापेक्ष असतात. केवळ पूर्वीची तहा आज नाही यावरून मर्यादा कमी झाली, असे म्हणता येत नाही.
बिनबाह्याचे पोलके, कापलेले केस, तोंडाला थोडीबहुत पावडर अशी वेषभूषा व केशभूषा देशांतील सर्वमान्य स्त्रिया- उदाहरणार्थ विजयालक्ष्मी पंडित- करतात. त्या स्त्रियांनी देशासाठी त्याग केला नाही असे कोणी म्हणेल का? त्यांचे अनुकरण इतरांनी केले तर नवल काय? कोणी म्हणेल, बाह्य स्वरूपाच्या सजावटीत अनुकरण होते, इतर गोष्टींत होत नाही. पण हा सर्वसाधारण नियमच आहे.
मुलामुलींच्या आयुष्यात आणखी काही गोष्टी या काळात प्रामुख्याने वळण लावणाच्या असतात. त्या म्हणजे सिनेमा व दर महिन्याला निघणारी १३८ / आमची संस्कृती
आमची संस्कृती / १३९
नायिकेच्या जागी कल्पून घेता येते. या क्रियाहीन करमणुकीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे तीमुळे करमणूक होत राहण्यास ती जास्त जास्त भडक असावी लागते. स्वत: चालले, कुस्ती खेळले, पोहले म्हणजे मनुष्य दमतोच. मनुष्याची कामवासना कितीही तीव्र असली तरी तीही काही मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही. पण क्रियाहीन करमणुकीच्या प्रकारांत इद्रिये दमण्याचा प्रश्नच नसतो. तेच तेच पाहून बेचव वाटू लागते. म्हणून शृंगार जास्त जास्त उत्तान, विनोद जास्त जास्त बोचक, हाणामारी जास्त जास्त भयंकर करावी लागते. इतके सगळेही करून सिनेमा जिवंत राहण्याची खात्री न पटल्यामुळे हल्ली प्रचंड मोठ्या पडद्यावर, वास्तवापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावर व सृष्टीतील घनता व खोली दाखवता येईल अशा त-हेचे चित्रपट दाखवितात. या चित्रपटात गोष्ट, भावनांचे आविष्करण वा प्रसंगांचे चित्रण यांपैकी कशांतही हळुवारपणा, कौशल्य, सूक्ष्म व सूचक स्वभावरेखन, ध्वनित केलेल्या छटा यांपैकी काहीही नसते. सर्व प्रसंग असे निवडलेले असतात की, त्यांत भयानक समरप्रसंग व स्त्रीच्या उघड्या अंगाचे जास्तीत जास्त प्रदर्शन व्हावे. हल्लीच्या युगात स्त्रीच्या अंगप्रत्यंगाचे जेवढी बाजारी प्रदर्शन चालते तसे पूर्वी कधीही नव्हते.
अशा परिस्थितीत व्यायाम, खेळ, शारीरिक कष्ट यांची गरज पूर्वीपेक्षा जास्त आहे. एका बाजूला गरिबी, तर दुस-या बाजूला पूर्वी पाहिली नाही अशी चैन दिसते. त्यांपैकी काही चैन पैशाने स्वस्तात पडते. पण मुलांना घातक ठरते. अशा परिस्थितीत मुलांपेक्षा मोठ्या माणसांचीच जबाबदारी वाढलेली आहे. आई, बाप, शिक्षक, नगरपालिका, राज्यकर्ते सर्वानीच ही जबाबदारी ओळखून मुलांना राहावयास योग्य असे जग निर्माण केले पाहिजे. वागणुकीच्या बाह्य स्वरूपात कालमानाप्रमाणे फरक पडेल, पण काही मर्यादा सर्वकालीन असतात. धर्म, अर्थ, काम हे. साधताना नातिचरामि' हे ब्रीदवाक्य सर्वांनी ध्यानात बाळगले पाहिजे. माझा अर्थकाम साधताना, इतरांना न दुखवता, इतरांचे हरण न करता मी तो साधीन हे मुलांना व मोठ्यांना सगळ्यांनाच कळले पाहिजे. रस्त्यात जाताना इतर चालत आहेत व वाहने धावत आहेत, रस्ता सोयीने वापरला तर सगळ्यांना सुख होईल, बसमधून जाताना जोरजोराने हसून बोलून १४० / आमची संस्कृती
उत्तानपणे वागून आपण इतरांना घृणा उत्पन्न करीत आहोत, इतकी की, बिचारा कंडक्टरसुद्धा या कॉलेज मुला-मुलींमध्ये चाललेल्या प्रकाराला कंटाळून गेला आहे, हे लक्षात आल्यास तसे वागणे होणार नाही. या लहानसहान गोष्टींचा अपहार व मोठ्या सामाजिक आयुष्यात मोठा अपहार, मोठेपणाची तृष्णा व सदैव असंतुष्टता या सर्वांनाच आळा बसेल. नि:स्वार्थी, त्यागी स्त्री-पुरुष आजही समाजात आहेत, पण त्यांच्या उदाहरणाने भागत नाही. समाजाची मूल्ये काय व ती कशी आत्मसात करावी याचे अव्याहत शिक्षण मुलांना मिळाले पाहिजे.
- १९५५