अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/उत्तम व्यवस्थापनाचं रहस्य
र पुरातन काळची गोष्ट आहे. एक राजा होता. स्वभावानं अत्यंत विक्षिप्त. कोठेही गेला तरी आपल्या पायाला धूळ किंवा माती लागलेली त्याला खपायचं नाही.
त्यामुळंं तो जिथं जाणार असेल तिथले रस्ते किंवा माती असणारी कोणतीही जागा त्याच्या सेवकांना
घासून पुसून साफ करावी लागत असे. हे मोठे अवघड काम होतं. या स्वच्छतेच्या
तडाख्यातून प्रजाजनही सुटत नसत. राजा तसा प्रजाहितदक्ष होता. कुणाच्याही घरात जाऊन
त्याची विचारपूस करणंं आणि त्याच्या अडचणी सोडवणं त्याला आपलं कर्तव्य वाटत असे. त्यामुळे तो एखाद्या नागरिकाच्या घरात जाणार असं त्याच्या सेवक - शिपायांना समजलं की ते त्या व्यक्तीच्या घराचा स्वच्छतेसाठी ताबा घेत. त्यातील सामानसुमानाची कशीही हवालहलव करीत. घर अक्षरश: ‘धुऊन’ काढीत, जेणे करून राजेसाहेबांच्या पायाला धूळ लागू नये. याचा प्रजेला आत्यंतिक त्रास होई.राजा आपल्या घरी येणार हे समजलं की आनंद होण्याऐवजी त्यांंना संकट वाटे. राजाच्या सेवकांनाही ही रोजची कटकट असह्य होत असे. पण राजाज्ञेेसमोर कुणाची काय टाप चालणार ?
असं एक संस्कृत वचन आहे. म्हणजेच अनुभवी व्यक्तीची वर्तणूक ही इच्छ मार्गदर्शक ठरते. मात्र, खच्या अर्थाने या व्यवसायाची भरभराट औद्योगिक क्रांतीनंतर झाली. या क्रांतीनंतर या व्यवसायाचं स्वरूपही बदललं. औद्योगिक क्रांती जशी बाहेरून आली, तसं व्यवस्थापकीय सल्लागार व्यवसायाचं आधनिक स्वरूपदेखील बाहेरूनच येथे आलंपण काही पायाभूत तत्त्वं मात्र समानच आहेत.
१९३७ मध्ये भारतात 'इस्टर्न बेडॉक्स' या नावाने पहिली व्यवस्थापकीय सल्ला एजन्सी सुरू झाली. बेडॉक्स या बेल्जियन तज्ज्ञानं स्थापन केलेल्या या एजन्सीनं भारताता कामगारांच्या क्षमतेचा अभ्यास करून त्यांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठा ‘इन्सेंटिव्ह देण्याची पध्दत सुरू केली. त्या काळी वस्त्रोद्योग जादा कामगारांच्या ओझ्यामुळे तोट्यात जात होता. त्याला या पध्दतीचा मोठा फायदा झाला. अशा तर्हेने सुरुवातीच्या काळात व्यवस्थापकीय सल्लागार कंपन्यांनी कर्मचाच्यांच्या उत्पादनक्षमतेवर लक्ष केंद्रित केले होत. जर्मनीच्या नाझी राजवटीशी संबंध आल्यानं बेडॉक्स यांना १९४३ मध्ये फाशी देण्यु
आलं. मात्र त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे कार्य जॉन मूर यांच्या नेतृत्वाखाली 'इन्का (इंडस्ट्रियल अँँड बिझनेस कन्सल्टन्टस्) या नावाने सुरू राहिलं.
इब्कॉन युग :दुसच्या महायुध्दाच्या कालावधीत इकॉननं ब्रिटिश सरकारला युद्ध व्यवस्थापनामध्ये मोलाची मदत केली. इशापूर येथील रायफल कारखाना, लष्करी लेखापालन कार्यालय, लष्करी मालाची रेल्वेमार्फत ने - आण करण येथील बाबतीत ब्रिटिश सरकारला इब्कॉननं सल्ला दिला.
महायुध्दानंतर इब्कॉनने वस्त्रोद्योगापासून सिमेंट, इंजिनिअरिंग वस्तू, स्थानिक प्रशासन, महापालिका, टाइम्स ऑफ इंडिया, आयकर खात , टिस्को, टेल्को इत्यादि कंपन्यांना सल्ला देण्याचे काम या कंपनीने बरीच वर्षे केलं. इकॉनमधून बाहेर पडलेल्या अनेक तज्ज्ञांनी नंतर स्वतःच्या कंपन्या स्थापन केल्या. बिकन्स,कोबिन इम्देस्को,सिग्मा या प्रसिध्द सल्लागार कंपन्या इकॉनमधूनच तयार झाल्या.
१९५३ मध्ये इब्कॉननं आंतरराष्ट्रीय कंपनीची स्थापना केली. कंपनीला इराक, मेक्सिको, पनामा, ब्रह्मदेश, श्रीलंका इत्यादी देशांत कामं मिळाली. अशा तर्हेनं ती पहिली भारतीय बहुराष्ट्रीय सल्लागार कंपनी ठरली. १९६२ नंतर या
इकॉनचे सर्व परदेशी अधिकारी भारत सोडून गेले व ती पूर्णपणे भारतीयांच्या हातात
आली. १९६० च्या दशकात तिची प्रगती चांगली झाली, मात्र १९७० पासून पासून
तिला उतरती कळा लागली.
१९७० ते २००० या तीस वर्षात व्यवस्थापकीय सल्लागार व्यवसायात आमूलाग्र बदल झाले आहेतइतके दिवस केवळ उत्पादन व उत्पादकता यांच्यावर लक्ष केंद्रित कलेल्या या व्यवसायाने या कालावधीत कर्मचारी भरती, कर्मचारी नियुक्ती, सेवाक्षेत्र, व्यावसायिक सर्वेक्षण आणि व्यवस्थापन विकास चर्चासत्र आदी क्षेत्रांमध्ये यशस्वी पदार्पण व प्रगती केली आहेमिनू मसानी व सोली पारूख ही नावं याच काळात सर्वपरिचित झाली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मिनिस्ट्रेटेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया व सरकारने स्थापन केलेल्या उत्पादकताविषयक संस्था यांनीही व्यवस्थापनाच्या शिक्षणाबरोबरच सल्लागाराच्या व्यवसायातही नाव कमावलं आहे.
संगणकाचा उदय : भारतात पहिला संगणक १९६१ मध्ये एस्सो कंपनीनं आणला. तर युनियन काबइड, बाटा, डनलॉप, भारतीय आयुर्विमा महामंडळ आदी संस्थांनी वापर सुरू केला. त्यानंतर संगणक व त्याच्या वापराबद्दल सल्ला देणाच्या सुरुवात झाली. टाटा कन्सल्टन्सी सव्हिंसेस या कंपनीनं सर्वाधिक फायदा सोफ्टवेअर व्यवसायात कमावला. या कंपनीतून बाहेर पडलेल्या डॉ. कनोरिया यांनी डाटामिकस कंपनी स्थापन केली. विसाव्या शतकाच्या अखेरीस संगणक सॉफ्टवेअर व माहिती तत्रज्ञान यांनी व्यवस्थापकीय सल्ला व्यवसायात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. याच कालावधीत एमसीएआय (मॅनेजमेंट कन्सल्टंट असोसिएशन ऑफ इंडिया) ही संस्था उदयास आली.नंतर तिचं नामांतर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टन्टस इन इंडिया असं करण्यात आल.सरकार व उद्योग यांच्यातील दुवा बनण्याचं महत्वााचं काम या संस्थेने केलं. व्यावसायिक प्रशिक्षण व व्यवस्थापकीय सल्लागार होण्यासाठी पात्रता मिळवून देण्याची सुुविधा या संस्थेनं प्राप्त करून दिली. या संस्थेचे विदेशी व्यवस्थापकीय संस्थांशी संबंध भारतातून ‘व्यवस्थापकीय सल्ल्या’ची निर्यात करण्याची संधी भारतीय तज्ज्ञांना मिळाली.
या सर्व संस्थांची कार्यक्षेत्रे व कार्य करण्याची पध्दत वेगवेगळी असली तरी मूळ तत्व एकच आहे.ते म्हणजे लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या गोष्टीतील साधूप्रमाणे सोपे,अभिनव पण परिणामकारक उपाय शोधून काढून कमीत कमी खर्चात अधिकाधिक वबहुआयामी फायदा उद्योगधंदे तसेच संस्थांना मिळवून देणं, उत्तम व्यवस्थापनाचं गमक तर हेच आहे.