अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापकीय ‘धर्मांतर’

विकिस्रोत कडून

णूस कितीही मोठा झाला तरी तो पिढ्यान् पिढ्या चालत आलेले संस्कार (कुणी बळजबरी किंवा युक्तीनं विसरायला लावल्याखेरीज) विसरू शकत नाही असं म्हणतात. या संस्कारांचा त्याच्या कार्यपध्दतीवर कळत - नकळत परिणाम होत असतो. उद्योग व्यवसाय व व्यवस्थापन यांच्या बाबबतही असं होत असत.
 पाश्चिमात्य व्यवस्थापनावर चर्च संस्कृती व रोमन कालखंडातील लष्करी यंत्रणा यांचा मोठा प्रभाव आहे.खिश्चन धर्माची स्थापना झाल्यानंतर काही दशकांतच रोमन कॅथॉलिक चर्च संस्था प्रबळ व सस्थिर बनल्या. जगभर खिश्चन धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणं आणि इतर संस्कृतीमधील अधिकाधिक लोकांचं धर्मातर करून आपले धर्माची लोकसंख्या वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट बनलं. याकरिता व्हॅटिकन सर्वोच्च धर्मपीठ ते भारत किंवा आफ्रिकेमधल्या घनदाट जंगलातील दुर्गम खेड्यात धर्मप्रसाराचं काम करणारा पार्टी अशी एक भक्कम साखळी बनविण्यात आली. सर्वोच्च धर्मपीठाच्या अधिपतीनं आदेश द्यायचा आणि तो त्यांच्या अधिकाराखाली काम करणाच्या सर्वांनी प्राणपणाने अंमलात आणावयाचा, अशी एक शिस्तबध्द व रचना तयार करण्यात आली.
 या साखळीमुळे तळागाळात कार्य करणाच्या मिशनऱ्यांच्या कामगिरीची माहिती सर्वोच्च धर्मपीठापर्यत पोहचू लागली आणि अशा मिशनऱ्यांना आर्थिक मदत साधनसामुग्री, संरक्षण व इतर आवश्यक पाठिंबा ‘वरून मिळू लागला. या बळकट संपर्क व्यवस्थेचा परिणाम म्हणून ख्रिश्चन धर्माचा जगभर प्रसार झपाट्यानं झाली.
 इतिहासकाळात पाश्चिमात्य सैन्य यंत्रणाही चर्चच्याच धर्तीवर बनविण्यात आली होती. अधिकाधिक भूमी जिंकून साम्राज्यविस्तार करणं हे रोमन कॅथॉलिक राजाचंं ध्येय होतं. त्याला अनुसरून सन्य यंत्रणा व सैन्यातील अधिकाऱ्यांची उतरंड तयार करण्यात आली होती. 'व्यावसायिक सैन्य' ही मूलतः एक पाश्चिमात्य संकल्पनाच आहे: युद्ध करणं आणि जिंकणं याखेरीज सैनिकांना अन्य व्यवधान नसे. राजाची आणि नव्या जिंकलेल्या प्रदेशाची संस्कृती एक नसेल तर अशा प्रदेशावर फार काळ सत्ता गाजवता येत नाही हे राजांच्या लक्षात आलं होतं.त्यामुळे जिंकलेल्या प्रदेशात धर्मातर मिशनरी कार्य व चर्चसंस्था बलशाली करण्याला प्राधान्य दिलं. त्यामुळे पूर्वी अन्य संस्कृती मानणारे अनेक भूूप्रदेश खिश्चन बहजन झाले व रोमन राजांशी एकनिष्ठ राहू लागले.
 अशा तऱ्हेनं धर्मप्रसार व साम्राज्य विस्तार ही दोन्ही उद्दिष्टे धर्मसंस्था व राजसत्ता यांनी संघटीतरीत्या पूर्ण केली. रोमन साम्राज्य व खिश्चन धर्म यांचा प्रसार जगातील प्रत्येक खंडात झाला. धर्मप्रसारामुळं राजसत्ता मजबूत झाली. राजसत्तेच्या पाठिंब्यामुळं धर्मप्रसार वेगानं झाला. या यशामळे संघटित आक्रमण व शिस्तबध्दता हा पाश्चात्य संस्कृतीचा स्वभाव बनला.
 दोनशे वर्षांपूर्वी युरोपात झालेल्या व नंतर जगभरात पोचलेल्या औद्योगिक क्रांतीमध्ये याच स्वभावाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. आज युरोप किंवा अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्या 'तिसऱ्या जगा'त आपलं जाळं पसरविताना याच ऐतिहासिक चर्च आणि सैन्य संकृतीचा उपयोग करतात. फक्त फरक एवढाच की, साम्राज्य विस्ताराची जागा उद्योगाांंनी घेतली आहे. तर धर्मप्रसाराची जागा जाहिरात बाजीनं घेतली आहे.म्हणजे नेमकं काय, हेे एका उदाहरणावरून समजूून घेऊ. मागच्या पिढीतील लोकांची रोजची पेयं कोणती होती, तर कैरीचं पन्हं, त्या त्या त्या मोसमात मिळणाऱ्या फळांचा रस,दूध,लस्यी इत्यादी घरी तयार केली जाणारी पेयं. थोड्या फार प्रमाणात चहा व कॉफी या दोनच पाश्चिमात्य पदार्थांनी त्यांच्या 'पेयजीवनात’ शिरकाव केला होता.
 आजच्या पिढीची प्रमुख पेयं कोणती आहेत, तर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तयार केलेली पेेप्सी, कोला, मिरांडा इत्यादी बाटलीबंद पेयं. परिस्थिती अशीच चालू राहिली तर पुढच्या पिढीतील ‘सुनां'ना पन्हं कसं तयार करतात हे माहीत नसलं तरी कुणाला आ२चर्य वाटणार नाही. अवघ्या एका पिढीत हा फरक कसा पडला असेल?
 इतिहास काळात नवीन प्रदेशांवर आपल्या राजसत्तेची पकड मजबूत करण्यासाठी तिथल्या प्रजेला तिची जुनी संस्कृती विसरायला लावली गेली. यासाठी धर्मांतराची मदत घेण्यात आली. धर्मातर झालेली व्यक्ती आपल्या मूळ धर्माला पारखी होते. साहजिकच नव्या धर्माशी अधिक एकनिष्ठ बनते. त्याच धर्तीवर आजच्या काळात जुन्या खाण्यापिण्याच्या सवयी विसरायला लावण्यासाठी पध्दतशीर जाहिरातबाजीचा उपयोग बहुराष्ट्रीय कंपन्या करतात. विशेष म्हणजे जाहिरातींसाठी स्थानिक लोकप्रिय व्यक्तींचा वापर केला जातो. (सचिन,गांगुली वगैरे) त्यामळे त्या भावनात्मकदृष्ट्या प्रभावी बनतात. टीव्ही, रेडिओ, वृतपत्र इत्यादी माध्यमांचा वापर करून त्या सतत लोकांच्या कानाडोळ्यांवर आदळवल्या जातात हळूहळू त्या भिनतात. सचिनही पेप्सी पितो मग आपण चव बघायला काय हरकत आहे अशा भावनेनं पहली बाटली तोंडाला लावली जाते. तिची चव (केवळ नवी असते म्हणून) आवडते. माणसाला नावीन्याची आवड असतेच. नंतर काही दिवसांत जुनी पेयसंस्कृती या बाटलीत विरघळून जाते. पेप्सीच्या औद्योगिक ‘साम्राज्या'चा पाया मजबूत होतो. आपण ‘पेप्सीनिष्ठ' बनतो.
 वास्तविक शरीरप्रकृती, चव आणि किफायतशीरपणा यांचा विचार करता, आपली घरगुती पेयं अनेक पटींनी श्रेष्ठ आहेत. पण लक्षात कोण घेतो? 'घर की मुर्गी दाल बराबर'या न्यायानं नवं ते चांगलं वाटू लागतं. नव्या साम्राज्यवादाची सुरुवात होते.
 या उदाहरणांचा सारांश असा की, पाश्चात्य उद्योगांच्या आक्रमक व्यवस्थापनाचा पाया त्यांच्या चर्च आणि सैन्य संस्कृतीत आहे. (जाहिरातबाजी हा विक्री व्यवस्थापनाचा एक भाग आहे.) त्यामुळे नव्या नव्या देशात घुुसूून तिथं आपलं साम्राज्य उभं करणंं त्यांना शक्य होतं. या उलट स्थिती भारतीय व्यवस्थापनाची आहे. त्याचा पायाही असाच सांस्कृतिक व आध्यात्मिक आहे. पण विरुध्द अर्थानं साहजिकच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या झंझावातासमोर आपलं ‘टैलेंटेड' व्यवस्थापनही फिकं पडतं. इतकं की कालांतराने स्वतःचं स्वातंत्र्य आस्तित्त्व विसरून ते बहुराष्ट्रीय कंपन्यांचा एक भाग बनतं,किंवा त्यांना विकलं जातं. म्हणूनच पेप्सी किंवा कोलाइतकी, किंबहुना त्यापेक्षा चांंगली शीतपेयं बनविणारी 'पालें' कंपनी विकली गेली. थम्स अप,टॉप ऑरेंज इत्यादी ब्रँँण्ड काळाच्या पडद्याआड गेले.
 या वावटळीसमोर ‘शुध्द भारतीय' उद्योगांचा व व्यवस्थापनाचा पाडाव होणार की पाड लागणार हा कळीचा मुद्दा आहे. खाद्यपेयांबाबत आपण जुने संस्कार विसरलो पण,कार्यपध्दतीच्या दृष्टीनं मात्र आपण संस्कृती टिकवून आहोत. अशा स्थितात बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर टिकाव धरायचा असेल तर काय करावे लागणार आहे आणि कसंं याचा विचार पुढील लेखात करू.