पान:महाबळेश्वर.djvu/378

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



पांचगणी.
---------------

 हें ठिकाण महाबळेश्वर आणि वांई यांच्या बहुतेक मध्यावर आहे. तथापि हवापाण्यासंबंधानें हे प्रति महाबळेश्वरच आहे. पुण्याहून महाबळेश्वरीं येतांना वाटेनें या गांवांतूनच यावें लागतें. महाबळेश्वरपेक्षां याची उंची २०० फूट कमी आहे. महाबळेश्वर डोंगराची जी शाखा वांई बावधनपर्यत जाऊन पसरली आहे त्या शाखेवर तांबडे मातीच्या जमिनीचा जेथें शेवट होतो त्या ठिकाणावर अर्ध मैलाच्या अंतरांत दोन खेडेगांवें आहेत त्यांपैकीं पूर्वेकडील गांवाचे नांव धांडेघर व पश्चिमेकडील बाजूस सपाटीवर आहे तें पांचगणी. हे गांव महाबळेश्वरापेक्षा सखलांत असल्यामुळे महाबळेश्वरचा कहरी पाऊस व धुके यांचा या गांवावर भडिमार होत नाही. हा कहरी पाऊस उत्तर व दक्षिण