पान:महाबळेश्वर.djvu/373

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३३८ )



सार्वजनिक भक्तीचीं ठिकाणें.

 हिंदुस्थानांतील पाहिजे तें रमणीय स्थान घ्या, तेथें आमच्या लोकांनीं एखाद्या देवालयाची स्थापना करून परमेश्वराच्या सर्वव्यापित्वाची, सर्वशक्तिमत्वाची आठवण मनुष्यमात्रास दिली नाहीं असें सहसा होत नाहीं. निर्जन अरण्य, ओसाड माळ, किर्र झाडी, खोल दरी, उंच डोंगर, असल्या सर्व ठिकाणीं कोणीना कोणी तरी देव अथवा देवी यांच्या मूर्तीची स्थापना झालेली असावयाचीच ! महाबळेश्वर डोंगरावरही अनेक देवतांचीं देवालयें आहेत.

 हल्लीं या वस्तीला आमचीं पांच देवळे झालीं आहेत. मारूतीचीं तीन, श्रीराम व विठोबा यांचें एक व शंभूचें एक. यांपैकीं बहुतेक देवळे मुख्य पेठेतच आहेत. ह्या देवळांना सालिना किंवा एकदम अशी सरकारांतून कांहीं मदत मिळालेली नाही. यांचा नेहमींचा खर्च येथील पेठकरी व्यापाऱ्यांच्या शिरावर आहे. कधी कधीं कोणीं हिंदु बडे लोक कांहीं देवाच्या उत्सवास हातभार लावितात. या सर्व देवळांपैकीं रामाचें देऊळ अगदीं अली-