कबर मुंबईच्या टाकसाळेचा मास्तर व मुंबईच्या जिआग्राफिकल मंडळीचे उत्पादक जेमस् फ्रेझर हेडलसाहेब यांची आहे. चौथी कबर मद्रासच्या २३ वे पलटणीचा कपतान व हैद्राबाद येथील असिस्टंट रेसिडेंट थामस जान न्यूबोल्ड हा येथें २६ मे सन १८५० रोजीं मेला त्याची आहे. पांचवीं मुंबईच्या सैन्याचा आडव्होकेट जनरल मेजर वुलियम मिलर साहेब यांची कबर आहे. त्याचा आकार खांबासारखा असून वर चंबूवजा डेरा केलेला आहे. शिवाय ब्राथवेटबाईसाहेब बोरबाईसाहेब, फेनेल, कारनेजी, विसेल कॅरोल्सकुक, गोठ क्केन्स वगैरे साहेब लोकांचीं थडगी आहेत.
या मालकमपेठेला लागूनच दक्षिण आंगास चिनी लोकांच्या स्मशान कपौंडाची लांबलचक एक भिंत आहे. त्यांची कांहीं कांहीं थडगीं आहेत. परंतु त्यावर लेख वगैरे कांहीं लिहिला नसल्यामुळे त्यांजबद्दल माहिती मिळत नाहीं. हल्लीं याठिकाणीं चिनी लोकांचा गंधसुद्धां नाहीं. यामुळे हें स्मशान रद्द झालें आहे.