पान:महाबळेश्वर.djvu/371

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३३६ )

 गेलें आहे. या लोकांमध्यें थडग्यावर लेख लिहून ठेवण्याची पद्धति प्रचुर असल्यामुळे त्या मृत मनुष्याचें नांव व त्याची बाहदुरकी जिज्ञासु लोकांस चिरकाल पाहण्यास मिळतात. तसा प्रकार इतर जातींमध्यें मुळींच नसल्यामुळे एकदा मेल्यावर त्याची आठवणसुद्धां होण्यास ज्ञातीला मार्ग नसतो. या स्मशानांत विशेष पाहण्यासारखे पराक्रमी पुरुषांचे नमुन्याकरितां थोडे लेख आहेत ते असे:-

 चवथे घोडेस्वाराच्या पलटणींतील एक शूर व तरुण शिपाई लेफ्टनेंट हिंद साहेब याचें थडगें आहे याच्या मरणाची अशी हकीकत आहे कीं, हा येथील रानांत शिकारी करितां गेला असतांना बैलाने शिंगावर घेऊन ता. १९ एप्रिल सन १८३४ मध्ये ठार मारिलें. हा बैल आपल्या गुराच्या कळपांतून त्याचा अगदीं पाटलाग करीत सुटला होता तेंव्हा यानें त्याच्या तडाक्यांतून निसटण्याची बरीच खटपट केली होती. परंतु अखेरीस तिचा उपयोग झाला नाहीं. दुसरें थडगें अमेरिकेतून आलेल्या पाद्री लोंकांपैकी ग्रेव्ह साहेबाच्या जोडप्याचें आहे. तिसरी