पान:महाबळेश्वर.djvu/370

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३३५ )


यांचा संस्कारविधि नाहीं. यांचा विधि अगदींच निराळा आहे. ते करण्यास येथें टावर आफ सायलेन्स बांधिलेला नसलेमुळे व साताऱ्याखेरीज दुसरे ठिकाणीं पाठवून भागण्यासारखे साधनांचा अभाव असलेमुळे त्यांचा नाइलाज आहे.

साहेब लोकांचें स्मशान.

बाजारापासून महाडरस्त्याचे सडकेच्या डावे बाजूस पावमैलावर हें टायगर पाथ रस्त्याचे अलीकडे आहे. यांत मुसलमानांच्या थडग्याप्रमाणेंच थडगीं आहेत, परंतु हीं फार व्यवस्थितपणें एका मोठया दगडी कपौंडांचे मर्यादेंत आणून ठेविलीं आहेत. हें कपौंड काळ्या घडीव दगडांनीं कमानीवजा खण करून बांधलें आहे. त्यांत जाण्यास एक फाटक ठेविलें आहे. आंत गेल्यावर सर्व थडगीं संगमरवरी दगडांनीं व दुसऱ्या घोटीव आरशाप्रमाणें स्वच्छ काळ्या पाषाणांनीं नानाकृतींचीं बनविलेली आहेत. तीं पाहून प्रेक्षकांच्या मनांतील स्मशानाच्या वेदना विसरून जातात. या थडग्यावर पुष्कळ झाडाचा विस्तार पसरून जाऊन सावलीचें छतच होऊन