पान:महाबळेश्वर.djvu/323

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २८८ )


तें सन १६५५ सालीं शिवाजी महाराजांनीं घाटमाथा काबीज केला त्यावेळीं घेतलें तेव्हां हा किल्ला महाराजांकडे आला. ह्या डोगरांची उंची ४५११ फूट आहे. ही टेकडी केटपाईंंटाच्या उत्तरेस आहे. या टेकडीवर जावयाचे असल्यास केटपाईंटपर्यंत टांग्यानें किंवा घोडयावरून जावें. तेथून पुढें शिडीदारें घाटाच्या पाऊलवाटेने पायी डोंगराखाली उतरून वैगांवावरून कृष्णानदीचे पलीकडे जावें. तेथून नांदगणें आणि परतवडी ही गांवे डावे बाजूस सोडून डोंगरावर चढावयास लागावें. हा चढ तीन मैल आहे. चालणारा खंबीर असल्यास दोन तासांत गडावर जाऊन पोहोंचतो. ह्या डोंगराचे योगानें एका खोऱ्याचे दोन भाग झाले आहेत. ते एक कृष्णाखोरें व दुसरें जांबूळखोरें; कृष्णाखोऱ्यांंत कृष्णानदी वाहत चालली आहे व जांबूळखोऱ्यांंत वळखीनदी वाहत चालली आहे. आणि दोघींचा संगम कमलगडाचे पूर्व सोंडेकडे वेलंग गांवाजवळ झाला आहे. या डोंगरावरील माथ्याचा पठार १० किंवा १२ च एकर असेल. या किल्ल्याला भोंवता-