पान:महाबळेश्वर.djvu/305

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २७० )

 व आंगावरील अलंकार पाहून विलक्षण मौज वाटते. हें पाहण्यास येथें आरसा मुद्दाम ठेविला आहे.

 प्रतापगडच्या लढाईनंतर राजकार्यामुळे आपली कुलस्वामिनी जी तुळजापुरची भवानी, इचे दर्शनास जाण्यास शिवाजीमहाराजांस सवड मिळेना म्हणून देवीचें स्थान संनिध, असल्यानें नेहमीं दर्शन होत जाईल, या हेतूनें सन १६६१ मध्यें त्यांनीं ह्या देवालयाची स्थापना केली. शिवाय आफजुलखान हा शिवाजीचा सूड उगवण्यासाठीं संधि पहात होता. हें शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांना समजलें होते; ह्मणून महाराज भेटीस जाणार असें कळलें, त्या वेळीं त्यांची मातोश्री जिजाबाई इणें तुळजापुरच्या देवीस नवस केला कीं, माझा शिवाजी यशस्वी झाला म्हणजे मी लोटांगण घालीत तुझ्या दर्शनास येईन. त्याप्रमाणें यश मिळाल्यावर प्रतापगडास देवीची स्थापना करून तिनें तो नवसही फेडला, याशिवाय येथें केदारेश्वर नांवाचें शंकराचें देवालय पुरातनचें आहे.