पान:महाबळेश्वर.djvu/300

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २६५ )

 त्यानें केव्हांतरी त्या पाहण्यास चुकू नये, असें आमचें सांगणें आहे. महाबळेश्वराच्या आसपास असलेल्या या प्रेक्षणीय स्थळांचीं नांवें अशीं आहेत:- प्रतापगड, मकरंदगड किंवा सॅॅडलब्याक्, पारूत, चंद्रगड, कमलगड, चोराची घळ, राजपुरी, पांडवगड, दुतोंडी घळ, गायदरा किंवा गुलेरा घळ."

प्रतापगड.

 प्रतापगड हें गांव महाबळेश्वराप्रमाणेंच घाटमा-

थ्यावर आहे. हें महाबळेश्वरच्या पश्चिमेस सुमारें १० मैलांवर आहे. प्रतापगड किल्ला समुद्राचे पृष्ठभागापासून ३५४३ फूट उंच आहे. जावली प्रांत व निरा आणि कोयना यांचे कांठचा प्रदेश हस्तगत केल्यावर, तेथें जाणे येणें सुलभ व्हावें ह्मणून आणि पारघाटाचें नाकें आपल्या माऱ्यांंत रहावें या हेतूनें या पारघाटानजीकचे टेंकडीवर हा नवीन किल्ला शिवाजीमहाराजांनीं बांधिला. हें काम सातारच्या पिंगळे घराण्यांतील मोरो-