पान:महाबळेश्वर.djvu/299

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
पाहण्यासारखीं प्रसिद्ध ठिकाणें.
----------------------------------------

 महाबळेश्वरापासून दहापांच मैलांत पाहण्यासारखीं जीं ठिकाणें आहेत तीं पाहण्याचीं तखलीफ घेतली असतां धर्मश्रद्धा, सृष्टिसौंदर्यावलोकनाकांक्षा, व ऐतिहासिकस्थानदर्शनेच्छा तृप्त झाल्यावांचून रहाणार नाहीं. पृथ्वीवरील अशा भव्य वस्तु पाहून मनुष्याच्या चित्तास इतका आनंद व इतकें समाधान कां होते, अशी एका कवीस शंका येऊन त्यानें पुष्कळ विचार केल्यावर त्या शंकेचें असें समाधान केलें कीं, भव्य वस्तूंच्या निरीक्षणापासून विश्वास उत्पन्न करणारी मनुष्याच्या चित्तांत असलेली अगम्य शक्ति तिचा प्रेक्षकांच्या मनास क्षणभर बोध झाल्यासारखा होऊन तें एक प्रकारच्या अनिर्वचनीय आनंदसुखांत गढून जातें. तेव्हां ज्यास अनुकूल असेल, व ज्याला अशा वस्तूंच्या प्रेक्षणापासून होणाऱ्या आनंदाचा अनुभव घेण्याची योग्यता आली असेल