पान:महाबळेश्वर.djvu/247

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




लोकसंख्या.

 सन १९०१ सालाचे खानेसुमारीप्रमाणें खुद्द मालकमपेठेत कायमचे राहणाऱ्या लोकांची संख्या ५३४७ आहे. याशिवाय जंगलांत चार ठिकाणी धावड लोकांची वस्ती आहे, ती मालकमपेठ गांवांतच मोडली जाते. येथील मूळ रहिवाशी लोकांच्या चार जाती आहेत. त्या कोळी, कुळवाडी, धनगर आणि धावड ह्या होत. परंतु ह्या ठिकाणाची रानटीपणाची स्थिति जाऊन त्यास मैदानांतील शहराप्रमाणें व्यवस्थितपणाचें स्वरूप आल्याबरोबर व्यापारी वर्गाला लोभ उत्पन्न होऊन ते येथें येऊन दुकानें थाटून राहिले. यामुळे आतां सर्व जातीचे व सर्व धंद्याचे लोक निरंतरचे येयें राहणारे बनून गेले आहेत. जेथें जीवितास व वित्तास धक्का पोचण्याचें भय नाहीं त्या ठिकाणों हवापाणी वगैरेविषयीं कोणत्याही प्रतिकूळ व