पान:महाबळेश्वर.djvu/229

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १९४ )


उंची ४६४४ फूट आहे. याचा रस्ता लिलीकाटेज बंगल्यानजीक महाबळेश्वर रस्त्यापासून पेटिटरोडनेंं सुमारे ८०० पावले गेलेवर फुटतो व नागमोडीनेंं वर जाऊन भिडतो, तसेच दुसरा रस्ता महाबळेश्वर रस्त्यानेंंही वर जातो. या पाइंटावरून चोहोकडील प्रदेश फार रमणीय दिसतो. या पाइंंटावर साफ जागा आहे त्याचे मध्यावर उच्चस्थानी हल्ली एक चबुतरामात्र आहे, व त्या लगत एक लहान झाड आहे. या शिखरावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पहाण्याची फार मजा असते. याचा रस्ता गाड्या येण्यासारखा आहे. परंतु काही ठिकाणी चढ बराच असल्यामुळेंं गाड्यांतून हिंडणारे लोक इकडे फार कमी येतात. मुंबईच्या सैन्याचा नायक आणि राजकुलोत्पन्न ड्युक आफ क्यानाटसाहेबसुद्धांं येथे आल्याची निरंतरची स्मृति देण्याकरितां त्यांचेंं नांव या पाइंटाला देऊन डिमॉक सुपरिंटेंडंटसाहेब यांनी या पाइंटास चिरंजीव करून ठेविले आहे. पूर्वी कामावर असलेवेळींं ह्यांनींं आपल्या आगमनानेंं हे ठिकाण मंडित केले असलेमुळे त्यांचेंं नांव निघण्याची ही