पान:महाबळेश्वर.djvu/230

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १९५ )

 करामत करून ठेविली आहे. यास ड्यूक पाइंट किंवा क्यानाट शिखर म्हणतात.

गव्हमेंट हौस किंवा प्रास्पेक्ट पाइंट.

 गव्हरमेंट हौसचे दुसरें नांव बेलाव्हिस्टा आहे. ही इमारत पश्चिम बाजूस अगदीं डोंगराच्या शुंडेवर आहे. येथून थोडीं कदमें गेलें ह्मणजे एक छोटेखानीं पाइंट लागतो त्याच नांव " प्रास्पेक्ट ” असें ठेविलें आहे. ही इमारत उंच जोतें देऊन भरपूर दोन मजली उठविली आहे. ही अष्टपैलु आकाराची मुंबईधरतीच्या इमारतीप्रमाणें बांधलेली असलेमुळे मालकमपेठेला एक मोठे प्रेक्षणीय ठिकाण आहे. दुसऱ्या मजल्याला बहुतेक बाजूंना ग्यालरी केली असल्यामुळे तर ही सुरेख दिसते. येथे स्वस्थ बसून लांबलांबचे देखावे पाहण्याची फारच मजा आहे. कंपौंंडांत आणखी लहान लहान सोईस्कर इमारती आहेत, व आराम घेण्याकरितां जागा केली आहे. येथे पियानोचे दालन आहे, बिलियर्ड हाल आहे व येथील विहिरीला पाणी काढण्याकरितां एक हातपंप लावून सर्व ठिकाणीं पाणी खेळविलें आहे. येथें नामदार