पान:महाबळेश्वर.djvu/213

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( 178 )


कड्याचे कांठांवरील पुढेंं झुकलेल्या खडकाच्या बैठकीवर जो कोणी छाती करून जाऊन बसेल व तेथून पुढल्या व खालच्या पांच हजार फूट खोलीच्या प्रदेशावर नजर फेंकून नीट न्याहाळन काही वेळ पाहील, त्याच्या अंतःकरणांत भीति व आश्चर्य यांचा अननुभूत संकर झाल्यावांचून राहणार नाही. तसेच एक वेळ मागे वळून पाहिल्यावर डोंगराच्या मुख्य भागास सोडून अंतराळी असलेल्या कड्यावर आपण आहोंं, असे त्यास दिसतांच, त्यास चक्कर येऊन डोळे मिटून स्वस्थ बसावें, आणि बसल्याजागींंच पालथेंं पडून खालच्या खडकास घट्ट धरावेंं असे वाटेल.

 थोडा वेळ दम खाऊन भीति थोडी कमी झाली आणि आजुबाजूस नजर टाकतांं येऊ लागली ह्मणजे विचार आणि विकार यांची त्याचे मनांत एकच गर्दी होऊन जाईल.

 या बसलेल्या जाग्यावरून पुढील अंगास तो वांकून पाहील तर इतका कांहीं खोल खड्डा दिसेल की, कड्याच्या अगदी पायथ्याला जर एखादेंं