पान:महाबळेश्वर.djvu/214

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १७९ )

 खेडेगांव असतें तर त्यांतील माणसें वारुळावर मुंग्या फिरल्याप्रमाणें दिसलीं असतीं. त्याचप्रमाणें सावित्री नदीच्या पाण्याचा प्रवाह अगदीं जवळच्या अस्मान उंचीच्या कडयावरून खालीं पडून ठिकऱ्या ठिकऱ्या झालेला असा दृष्टीस पडून लागलीच दिसेनासा होतो तो पुनः फार दूरच्या अंतरावर पर्जन्यकाळअखेर दृष्टीस पडेल.

 समोरचे बाजूस कोंकण पट्टीकडे खालीं सावित्रीच्या खोऱ्यामध्यें व पलीकडे अजमासें पन्नास पाऊणशे पर्वतांची पंक्ती उभी आहे तिच्या भयंकर व अक्राळ विक्राळ स्वरूपाकडे पाहिलें ह्मणजे काय होते व काय दिसतें त्याचें वर्णनच करवत नाहीं. दहा दहा पर्वतांची एक एक ओळ याप्रमाणें कित्येक ओळी बसल्या आहेत. त्यांतील प्रत्येक डोंगर एकमेकांपासून भिन्न असून, त्याच्या मस्तकाचा नीट अणकुचीदार सुळा वर गेलेला आहे. शिवाय दोन्ही बाजवा करवताच्या धारेसारख्या खालपावेतों पोचल्या आहेत. या ठिकाणीं वनस्पतीचा लेश देखील नाहीं. या पर्वतपंक्तीचीं