पान:महाबळेश्वर.djvu/208

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १७३ )

 प्रदेश उत्तरोत्तर अफाट पसरत जाऊन क्षितिजाशीं मिळाला ह्मणजे आकाशाचे भिंतीला अपरिपार गलथा मारल्याप्रमाणें दिसतो. व नभस्थलापासून ह्या गलथ्याचा फुगीरभाग किंचित् पुढे येऊन त्याचा रंग नीलवर्ण, पांडुर व कोठे कोठे गुलाली झाकीचा असतो. हा गलथा समुद्राच्या पाण्याचा होय. समुद्र व घाटमाथा यांजमध्ये तीस पस्तीस मैलांचें अंतर असल्यामुळे समुद्राचें पाणी नलिकायंत्रानें पाहिल्याखेरीज ओळखतां येत नाहीं. शिवाय ऊन असल्यास रवेिकिरणें मध्यें आल्यानें, परावर्तनादि व्यापार मेघमिश्रित वातावरणांत होऊन समुद्राच्या पाण्याचा विस्तीर्ण ढीग कांहीं एक विलक्षण रंगाचा दिसतो व या उदकाची लंबायमान रेखा पश्चिमेचे आभाळामध्यें ढळढळीत दिसत असते.

एलफेिनस्टन पाइंट आणि आर्थरसीट पाहण्याला नेहमीं बराच वेळ लागतो. या पाइंटाच्या वरील बाजूस मजेखातर बाहेर भटकणारे किंवा वनभोजनाचे भोक्ते अशा लोकांकरितां मुनेिसिपालिटीनें एक लहानसा बंगला बांधिला आहे. त्यांत फर्निचर (सामान)