पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/310

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २६९ ) सोळासहस्र अंतःपुर । सहित रुक्मिणी रहिवासली ॥ १० ॥ निळा ह्मणे यात्रेसी येती । पुण्या त्यांचीया नाहीं पिती ।। पाउला पाउलीं यज्ञ चि घडती । प्रत्यक्ष भेटती परब्रह्मा ॥ ११ ॥ ॥ १३०० ॥ अचळ धरा तैसे पीठ । पायातळी मिरवे ईट ॥ १ ॥ दोन्ही पाउले समान । जैसे योगीयाचे नयन ॥ २॥ जानु जंघ ते स्वयंभ । जैसे कर्दळीचे स्तंभ ।। ३ ।। कसीयेलें पीत वसन । झळके विद्युल्लते समान ॥ ४ ॥ शेप वैसला वेदाळां । तैमा कटिबंध मेखळा ॥ ५॥ समुद्र खोलीये विशाळ । तैमें नाभीचे मंडळ ।। ६ ।। तुळशी मंजरिया गळां । नैशी सुटल्या मेघमाला ॥ ७ ॥ दिग्गजाचे शंडादेड । तैसे कटीं कर प्रचंड ॥ ८ ॥ पूणि- मेचा उदो केला । तैसा मुखचंद्र शोभला ।। ९ ।। जैसी नक्षत्रे झमकती । तैसी कैडलें चमकती ॥ १० ॥ मूर्य मिरवे नभमंडळा । तेसा केशराचा टिळा ॥ ११ ॥ क्षीराब्धीचे चंचल मन । तैसे नेत्री अवलोकन ॥ १२॥ जैसे मेरूचे शिखर । तैसा माथां मुगुट स्थिर ॥ १३ ॥ इंद प्रकाशें बेदिला । तैसा क्षीरोदकें वष्टिला ॥ १४ ॥ तृप्तीलागीं चातक पक्षी । निळा तैमा ध्यान लक्षी ॥ १५ ॥ ॥ १३०१ ॥ निर्गुण निरामय मंचलें । गुणातीत रुपा आलें । परात्परातें सगुण झालें। उभे ठाकलें इटेवरी ॥ १।। कोटी कंदर्पाचीं दीप्ति । विराजली अंगकांति ॥ गुण लावण्याची संपत्ती । विठ्ठलमूर्ती गोजिरी ॥ २ ॥ पहातां चि प्रवेशे अंतरीं । मनीं मनाने मोहरी ॥ चित्तीं चैतन्यातें भारी । देह- भावा उरी उरों भेदी ॥ ३ ॥ जीवाचें हरुनियां जीवपण । नेदी उरों म- तूंपण । वंदितां चि याचे चरण । करी बोळपण अहंकारा ॥ ४ ॥ निळा ह्मणे भक्तपती । आला पुंडलिकाचिये आर्ती ॥ अवधी जाणती नेणती ।। केली सरती पायांपें ॥५॥ | ॥ १३०२ ।। रूप गुंतलीं मानसें । ध्यानीं मुनिजना ज्याचें पिसें । तें चि हे सुंदर स्वरूप कैसें । धरिलें भक्त कैवारा ॥ ५ ॥ अंगीं चंदनाची उटी । तुळसीमाळा हार कंठीं ॥ बुका शोभला लल्लाटीं । रत्ने मुगुटीं झळकती ॥ २ ॥ कण कुंडलें सुदालें । नेत्र उत्फुल्लित जैमी कमळे । दंत हिरियाची द्विदलें । सोलींव तैसे झळकती ॥ ३॥ कंठी कौस्तुभ आणि पदकें । श्री-