पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७२ ) स्थिति । खंडण करिती भजनाचें ॥ ३॥ निळा म्हणे राहो ठायीं । विश्वास पायीं तुमचिये ॥ ४ ॥ ॥६७१॥जिहीं भाव धरिला ठायीं । बुडी दिधली तुमच्या पायीं । त्यासी करुणेची करुनी सोई । आपणापासीं बैसविलें ॥ १ ॥ प्रल्हादा संकट क्षिलें । धुवासी अक्षयपदी बैसाविलें ॥ उपमन्या नेउनियां क्षिलें । क्षीराब्धी वैभव देउनी ॥ २ ॥ उद्धवासी ब्रह्मरस पाजिला । अर्जुना निजबोध अपिला । द्रौपदीचा लळा पाळिला । वस्त्राभरणे पुरविली ॥ ३ ॥ गौळ णींचे प्रिय संवाद । नित्य भक्षणे त्यांचे दुग्ध ॥ गोवळासवें मुंवरी साद हमामा हुतुतु खेळणे ॥ ४ ॥ जिहीं तुमचे धरिले प्रेम । आवडी वदनी गाइलें नाम ॥ त्यांचा करुनियां संभ्रम । निजानंदा पात्र केलें ॥ ६ ॥ नामदेवा ज्ञानदेवा । निवृत्तिनाथा चांगदेवा ॥ एकोबा तुकोबाचिया भावा तैसे चि वर्ता श्रीहरी ।। ६ ॥ निळा म्हणे मी तों दीन । सकल संतांचा चरणरेण ॥ तुमच्या स्तवने ठेविले मन । येईल उचिता तैसें करा ॥ ७ ॥ ॥ ६७२ ॥ नाहीं कोणा उपेक्षिलें । सकळां सन्मानें स्थापिलें । आपु- लिये पदी बसविलें । देणे दिधलें अपार ॥ १ ॥ चुळा एका दुधासाठीं । स्तवितां चि उपमन्ये जगजेठी । करूनियां क्षीराब्धीची वाटी । लाविली ओठी तयाचिये ॥२ ।। बापा अंकी बैसावया । धुवानें स्तविलें विनवूनियां ॥ निश्चलपद त्यास देउनियां । अक्षयपदीं वैसविलें ॥ ३ ॥ सुदामदेव तो वरासाठीं । आला मागावया द्वारके भेटी । त्यासी रचुनियां गोमटी : सुवर्ण नगरी समर्पिली ॥ ४ ।। पक्षियासी पाचारिलें । तिये गणिकेश विमानीं वाहिलें ॥ नका भेणे हांकारिलें । त्यो गजेंद्रा नेले निजधामा ॥५॥ विभीषण भेटी धांवोनी आला । लंकेचे राज्य दिधलें त्याला ॥ चिरंजीव करुनियां वैसविला । आपुला शरणांगत म्हणजनी ॥ ६ ।। पहा हो वनींचीं ते वनचरें । निळा ह्मणे रिसे आणि वानरें । आलिंगुनियां रघुवीरें । आपुले पंगती जेवविलीं ॥ ७ ॥ ॥ ६७३ ॥ खग मृग राक्षस वानर । दैत्य दानव निशाचर ॥ सिद्धा- रण विद्याधर । नागनी खार कीटकादी ॥ १ ॥ चतुष्पदं जळचरें मनुष्य- याती । दासी वेश्या भिल्लिणी किती ॥ कोळी अंयज अधम जाती । उद्ध-