( १७२ )
स्थिति । खंडण करिती भजनाचें ॥ ३॥ निळा म्हणे राहो ठायीं । विश्वास
पायीं तुमचिये ॥ ४ ॥
॥६७१॥जिहीं भाव धरिला ठायीं । बुडी दिधली तुमच्या पायीं । त्यासी
करुणेची करुनी सोई । आपणापासीं बैसविलें ॥ १ ॥ प्रल्हादा संकट
क्षिलें । धुवासी अक्षयपदी बैसाविलें ॥ उपमन्या नेउनियां क्षिलें । क्षीराब्धी
वैभव देउनी ॥ २ ॥ उद्धवासी ब्रह्मरस पाजिला । अर्जुना निजबोध
अपिला । द्रौपदीचा लळा पाळिला । वस्त्राभरणे पुरविली ॥ ३ ॥ गौळ
णींचे प्रिय संवाद । नित्य भक्षणे त्यांचे दुग्ध ॥ गोवळासवें मुंवरी साद
हमामा हुतुतु खेळणे ॥ ४ ॥ जिहीं तुमचे धरिले प्रेम । आवडी वदनी
गाइलें नाम ॥ त्यांचा करुनियां संभ्रम । निजानंदा पात्र केलें ॥ ६ ॥
नामदेवा ज्ञानदेवा । निवृत्तिनाथा चांगदेवा ॥ एकोबा तुकोबाचिया भावा
तैसे चि वर्ता श्रीहरी ।। ६ ॥ निळा म्हणे मी तों दीन । सकल संतांचा
चरणरेण ॥ तुमच्या स्तवने ठेविले मन । येईल उचिता तैसें करा ॥ ७ ॥
॥ ६७२ ॥ नाहीं कोणा उपेक्षिलें । सकळां सन्मानें स्थापिलें । आपु-
लिये पदी बसविलें । देणे दिधलें अपार ॥ १ ॥ चुळा एका दुधासाठीं ।
स्तवितां चि उपमन्ये जगजेठी । करूनियां क्षीराब्धीची वाटी । लाविली ओठी
तयाचिये ॥२ ।। बापा अंकी बैसावया । धुवानें स्तविलें विनवूनियां ॥
निश्चलपद त्यास देउनियां । अक्षयपदीं वैसविलें ॥ ३ ॥ सुदामदेव तो
वरासाठीं । आला मागावया द्वारके भेटी । त्यासी रचुनियां गोमटी :
सुवर्ण नगरी समर्पिली ॥ ४ ।। पक्षियासी पाचारिलें । तिये गणिकेश
विमानीं वाहिलें ॥ नका भेणे हांकारिलें । त्यो गजेंद्रा नेले निजधामा ॥५॥
विभीषण भेटी धांवोनी आला । लंकेचे राज्य दिधलें त्याला ॥ चिरंजीव
करुनियां वैसविला । आपुला शरणांगत म्हणजनी ॥ ६ ।। पहा हो वनींचीं
ते वनचरें । निळा ह्मणे रिसे आणि वानरें । आलिंगुनियां रघुवीरें ।
आपुले पंगती जेवविलीं ॥ ७ ॥
॥ ६७३ ॥ खग मृग राक्षस वानर । दैत्य दानव निशाचर ॥ सिद्धा-
रण विद्याधर । नागनी खार कीटकादी ॥ १ ॥ चतुष्पदं जळचरें मनुष्य-
याती । दासी वेश्या भिल्लिणी किती ॥ कोळी अंयज अधम जाती । उद्ध-
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/213
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
