पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७३ ) शरण येतां चि ते निश्चिती । निजधामाप्रती पाठविले ॥ ३॥ न ह्मणोनी नरनारी बालकें । उत्तम अधम कनिष्ट लोके ॥ नामें चि पाचारितां मुखें । नेले ते निजसुखें वैकुंठा ॥ ४ ॥ निळा ह्मणे ब्रीदें चरणीं । वागवी ऋणबी भक्तांचा ऋणी ॥ ऐसी आख्या जे वेद पुराणीं । ते चि राहाडी चालवीं ॥६॥ | ॥ ६७४ । नामें आळवितां ओठीं । तुम्हां पोटीं भय वाटे ।। १ । नेणों कांहीं मागतील किंवा येतील वैकुंठा ॥ २॥ काय वांद्रे किती देऊ। म्हणोनियां जिऊ निर्बुजला ॥ ३ ॥ ऐसें जाणोनी लपालेती । घेतलें चित्तीं भय वाटे ॥ ४॥ याचि लागी उत्तर न द्या । कळलें गोविंदा मनोगत ।। ५ ।। निला म्हणे सुखी असा । न मागों सहसा आण तुमची ॥ ६ ॥ | ॥ ६७५ ॥ ऐकोनि संत हांसतील । तुम्हांसी येइल मग लाज ।। १ ।। कौल दिला राहे सुखें । न म्हणों मुखें हैं ऐसे ॥ २ ।। मागावें ते आम्हां चि जवळी । अहे नामावली पदों सुखें ।। ३ ।। आणिखी तुमची नाही अशा । ठेवा कैशा मुक्तिहि त्या ॥ ४ ॥ निळा म्हणे आपुल्या चि सुखें । असों हरिखें अखंडित ॥ ६ ॥ | ॥ ६७६ ॥ ऐसें ऐकोनियां उत्तर । देव म्हणे उदार धीर तुम्ही ॥ १ ॥ तुमच्याचि काजा रूपासी येणें । मजलागीं धरणे अवतार ॥ २॥ तुम्ही माझे मी तुमचा । आहे चि ठायींचा ऋणानुबंध ॥ ३ ॥ निळा म्हणे देवा- भक्तां । ऐसी एकात्मता हो सुरळी ॥ ४ ॥ ॥६७७॥ देव म्हणे भक्तराजा । अव्हेर माझा न करावा ॥ १ ॥ भोज- नकाळी पाचारावें । मज ही घ्यावे सांगावें ॥ २ ॥ भोजन तुमच्या तृप्ती मज । काजें काज तुम चिया ।। ३ ॥ निळा म्हणे अंतर नका। अभो एक- एका माझारी ॥ ४ ॥ | ॥ ६७८ ॥ राहेन आता तुमच्या संगें । हें चि मागें भक्तासीं ।।१॥ हैं चि द्या आत उदारपणें । माझे करणे रूप नांव ॥ २ ॥ विश्रांतीचे माझे घर । तुह्मी जे शरीर धरिलें तें ॥ ३ ॥ निळा ह्मणे भक्तांपासीं । भाकीं ऐशी कवि देव ॥ ४ ॥ ॥ ६७९ ॥ तुह्मी दिधलें वैकुंठभुवन । शेषशयने मजलागीं ॥ १ ॥ नाहीं तरी जाणता कोण ? होतों निर्गुण निराभास ॥ २॥ नामरूप कैंचें मज ।