Jump to content

स्वर्गांतील आत्मे ! (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून

<poem> कंटाळा आला बोवा आपल्याला इथचा ! - हो तर काय ? रोज तेंच, तेंच ! अग, काडीइतकासुद्धां फरक नसावा ? - उठल्या - बसल्या तें अमृत ढोसावें, आणि खुशाल टोळासारखें आपलें भटकावें ! कांहीं उद्योग दुसरा ? - छे छे छे !! ओकारी आली बोवा आपल्याला येथची ! असार ! असार आहे हा स्वर्ग निव्वळ ! - तेंच कीं ! सदा म्हणे आपला आनंद ! एक वृत्ति ! केव्हां संपते आहे कुणास ठाऊक ! - आतां थोडी कां वर्षे झाली असतील इथें येऊन ? - पण कांहीं आहे का फरक ? हें आपलें नंदनवन, होतें तस्सें आहे ! - नादीं लागलों ! आणि फुकट इथें तडफडायला आलों ! - चोर कुठले ! म्हणे ' स्वर्गात जा म्हणजे शांति मिळेल ! ' - वा ! काय छान शांति मिळते आहे इथें ! एकाला म्हणून करमत असेल तर शपथ ! नकोसें झालें आहे अगदीं ! - हें ग काय ? तूं तर रडायलाच लागलीस ! उगी ! - जाऊं ! लवकरच आपण मृत्युलोकांत जाऊं बरें ! तिथें मग आपल्याला सुंदर सुंदर देह मिळतील ! आणि मग काय महाराज ! - हंसली रे हंसली ! - अग तें कांहीं पुसूं नकोस ! देहलोकची मजा कांहीं और आहे ! घटकेंत आनंद आहे, तर घटकेंत दुःख आहे ! चाललें आहे ! शेंकडों वृत्तींत जिवाला बागडायला सांपडतें ! आणि हें कशामुळें ? - तर हें सगळें देहामुळें बरें का ! - आणि हो ! सगळेंच तिथें अस्थिर ! त्यामुळें अश्शी माणसाची परीक्षा होते कीं, ज्याचें नांव तें ! चांगला तावून सुलाखूनच निघतो ! उगीच नाहीं मृत्युलोक ! - बरें का ? - म्हटलें खरी मुक्ति तिथें आहे माझे बाई ! - नाहीं तर इथें ! पडा सदा आनंदांत कुजत ! - मृत्युलोकाशिवाय नाहींच तें ! सुख खरें तिथें ! अग आपलेंच काय, कंटाळा आला कीं देवसुद्धां जातो तिथें ! उगीच नाहीं अवतार घेत ! ....

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.