श्रीकृष्णाष्टकम्‌

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतार  ·नारायण
वेदांग
शिक्षा · चंड
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
इतिहास
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत
भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं
स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनम्‌ ।
सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं
अनङ्‌गरङ्‌गसागरं नमामि कृष्णनागरम्‌ ॥ १ ॥

वज्रभूमीचा एकमेव अलंकार असलेल्या, सर्व पापांचा नाश करणाऱ्याआपल्या भक्तजनांच्या चित्ताचे सदैव रंजन करणाऱ्या, नन्दनन्दन श्रीकृष्णाला मी भजतो, ज्याच्या मस्तकावर सुन्दर मोरपिसांचा मुकुट शोभत आहे, ज्याच्याहातात मधुर सुर काढणारी बासरी आहे, जो कामदेवाच्या कान्तीचा सागर आहे अशा श्रेष्ट (नागर) श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. ॥ १ ॥

मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं
विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनम्‌ ।
करारविंदभूधरं स्मितावलोकसुंदरं
महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणम्‌ ॥ २ ॥

कामदेवाचा गर्व हरण करणाऱ्या, विशाल व चंचल (सुंदर) नेत्र असलेल्या,ब्रजवासी गोप-गोपिकांचा शोक दूर करणाऱ्या, कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या श्रीकृष्ण भगवन्ताला मी नमस्कार करतो. ज्याने आपल्या कमलाप्रमाणे कोमल असणाऱ्या हातांवर गोवर्धन सहज लीलेने धारण केला, ज्याचे स्मित (गालातल्या गालात हसणें) व मिस्किल दृष्टिनेपाहणे अतिशय मोहक आहे, ज्याने देवांचा राजा जो इन्द्र, त्याच्या अहंकाराचे खंडण केले अशा श्रीकृष्णरुपी गजराजाला मी नमस्कार करतो. ॥ २ ॥

कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं
व्रजाङ्‌गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभम्‌ ।
यशोदया समोदया सगोपया सनन्दया
युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकम्‌ ॥ ३ ॥

ज्याच्या कानात कदम्बाच्या फुलांचीं कुंडले आहेत, ज्याचेकपोल-मण्डल-गाल अतिशय सुंदर आहेत, गोपीजनांचा जो एकमात्र प्राणाधार आहे, अभक्तांना ज्याचे दर्शन अतिशय दुर्लभ आहे अशा भगवान श्रीकृष्णालामी नमस्कार करतो. जो गोपांच्या समुदायात नन्दासह विराजमान असलेल्या अतिशय आनंदित अशा यशोदेच्या सान्निध्यात उभा आहे व ज्याच्याकडे पाहून खूपच आनंदवाटतो अशा गोपनायक श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. ॥ ३ ॥

सदैव पाद्पङ्‌कजं मदीयमानसे निजं
दधानमुत्तमालकं नमामि नंदबालकम्‌ ।
समस्तदोषशोषणं नमामि समस्तलोकपोषणं 
समस्तलोपमानसं नमामि नंदलालसम्‌ ॥ ४ ॥

ज्याने माझ्या मानस-सरोवरात आपल्या चरणकमलांची नित्य स्थापना केलेली आहे, ज्याचे कुरळे केस अतिशयच सुंदर आहेत अशा नन्दकुमाराला मी नमस्कार करतो. भक्तजनांच्या अन्तःकरणातील सर्व दोष नाहीसे करणाऱ्या, सर्व लोकांचेपोषण करणाऱ्या, सम्पूर्ण गोकुळांतील जनांचे मूर्तिमन्त मन असलेल्या, नंदाच्या लालसेचा विषय असलेल्या अशा श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. ॥ ४ ॥

भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं
यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकम्‌ ।
द्दगन्तकान्तभङ्‍गिनं सदासदालसङ्‍गिनं
दिने दिने नवं नवं नमामि नन्दसंभवम्‌ ॥ ५ ॥

दुष्टजनांचा संहार करून पृथ्वीचा भार हलका करणाऱ्या, भवसागरातील कर्णधार, भक्तांचे चित्त हरण करणाऱ्या अशा यशोदानन्दनाला मी नमस्कार करतो. अत्यन्त कमनीय (सुंदर) नेत्र कटाक्ष असलेल्या, सदासर्वकाळ उत्तम अलंकारांनी भूषित असलेल्या, प्रत्येक दिवशीं नवीन म्हणजे अपूर्व दिसणाऱ्या नन्दकुमाराला मी नमस्कार करतो. ॥ ५ ॥

गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं
सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनंदनम्‌ ।
नवीनगोपनागरं नवीनकेलिलंपटं
नमामि मेघसुंदरं तडित्प्रभालसत्पटम्‌ ॥ ६ ॥

सर्व सद्गुणांचे भांडार, सुखाचा सागर, दयेचा समुद्र, भक्तांवर सदैव कृपा करण्यासाठीं तत्पर, देवांच्या शत्रुंचा नाश करणारा अशा गोपाळकृष्णाला मी नमस्कार करतो. नित्य नव्या नव्या बाललीला करणारा, गोप बालकांच्या मध्यें अत्यन्त चतुर असलेला, विद्युल्लतेप्रमाणे ज्याच्या अंगावर पीतांबर झळकत आहे अशा घनश्याम भगवन्ताला मी नमस्कार करतो. ॥ ६ ॥

समस्तगोपनन्दनं ह्रदम्बुजैकमोदनं
नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनम्‌ ।
निकामकामदायकं द्दगन्तचारुसायकं
रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकम्‌ ॥ ७ ॥

सर्व गोपालांना आनन्द देणारा, त्यांच्या ह्रदयरुपी कमळांना विकसित करणारा, प्रसन्न आणि सूर्यासारखा शोभायमान, अशा कुंजविहारी गोपाळ कृष्णाला मी नमस्कार करतो. भक्तजनांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारा, ज्याचे सुन्दर नेत्र कटाक्ष बाणाप्रमाणें चित्ताचा वेध करणारे आहेत, जो अत्यन्त रसाळ मुरली वाजवणारा आहे अशा वृन्दावनातील कुंजवनाच्या अधिनायकाला मी नमस्कार करतो. ॥ ७ ॥

विदग्धगोपिकामनोमनोज्ञतल्पशयिनं
नमामि कुञ्जकानने प्रवृध्दवह्निपायिनम्‌ ।
यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा
मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयताम्‌ ।
प्रमाणिकाष्टकव्दयं जपत्यधीत्य यः पुमान
भवेत्स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्‌ ॥ ८ ॥

चतुर गोपीजनांच्या अन्तःकरणरुपी कोमल शय्येवर शयन करणारा, कुंजवनात भडकलेल्या दावाग्नीला गिळुन टाकणारा अशा भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. केव्हांही व कोणत्याही परिस्थितीत मी असलो तरी श्रीकृष्णाच्या सत्कथांचे वर्णन माझ्या मुखाने होवो अशी कृपा भगवान श्रीकृष्ण माझ्यावर करो. जे लोक ह्या अष्टकद्वयाचा (दोन दोन ओळींचा एकेक क्ष्लोक म्हणून अष्टक द्वय) प्रामाणिक पाठ किंवा जप करतील ते जन्मोजन्मीं नन्दनन्दन श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होतील.

       ॥ इति श्रीमत्‌ शंकराचार्यविरचितं श्रीकृष्णाष्टकं संपूर्णम्‌ ॥