विज्ञान-प्रणीत समाजरचना/मलपृष्ठ

विकिस्रोत कडून



विज्ञान -प्रणीत समाजरचना-

  कै. डॉ. प्रा. पु. ग. सहस्रबुद्धे विज्ञानवादी होते. हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी विज्ञानाच्या आधारे नवसमाजरचना करण्याविषयी त्यांनी या पुस्तकात जे विवेचन केले आहे ते आजही उपयुक्त ठरेल असे वाटते.... त्यांची भूमिका शास्त्रशुद्ध असून त्यांनी समाजशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांचा विचार आपल्या सामाजिक इतिहासाच्या आधारे केला आहे.

 गेल्या वीस पंचवीस वर्षांत विज्ञानाच्या योगाने जीवनाला नवे वळण लावण्याकडे समाजाचा कल दिसू लागला आहे. त्या संदर्भात या पुस्तकातील विचार आधारभूत ठरतील अशी अपेक्षा आहे.

- व. ग. सहस्रबुद्धे


 या ग्रंथाला भोर संस्थानचे "श्रीमंत शंकराजी नारायण पारितोषिक" मिळाले. भोर येथे कै. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचा सत्कार करून ते देण्यात आले.



मधुवन ग्रंथ प्रकाशन, मुंबई ६९.